Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 79:1-9

आसाफाचे स्तोत्र

79 देवा, काही लोक तुझ्या माणसांशी लढायला आले.
    त्या लोकांनी तुझ्या पवित्र मंदिराचा नाश केला.
    त्यांनी यरुशलेम उध्वस्त केले.
शत्रूंनी तुझ्या सेवकांची प्रेते रानटी पक्ष्यांना खाण्यासाठी ठेवली
    त्यांनी तुझ्या भक्तांची प्रेते रानटी पशूंना खाण्यासाठी ठेवली.
देवा, शत्रूंनी तुझी इतकी माणसे मारली की रक्त पाण्यासारखे वाहायला लागले.
    प्रेते पुरायला एखादा माणूसही उरला नाही.
आमच्या भोवतालच्या लोकांनी आमचा पाणउतारा केला
    आमच्या भोवतालची माणसे आम्हाला पाहून हसली आणि त्यांनी आमची चेष्टा केली.
देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का?
    देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?
देवा, तू तुझा राग ज्या देशांना तू माहीत नाहीस अशा देशांकडे वळव.
    जे देश तुझी उपासना करीत नाहीत अशा देशांकडे तुझा राग वळव.
त्या देशांनी याकोबाचा नाश केला
    त्यांनी याकोबाच्या देशाचा सर्वनाश केला.
देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस.
    आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव.
    आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे.
देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर.
    आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल.
    आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.

यिर्मया 8:14-17

14 “आपण येथे नुसतेच का बसलो आहोत?
    या भक्कम शहराकडे पळून जाऊ या,
जर परमेश्वर आपला देव, आपल्याला मारणारच असेल तर आपण तेथेच मरु या.
आपण परमेश्वराविरुद्ध वागून पाप केले.
    म्हणून देवाने आपल्याला विषारी पाणी प्यायला दिले.
15 आम्ही शांतीची आशा केली
    पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही.
तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले
    पण अरिष्टच आले.
16 दानच्या कुळाच्या मालकीच्या भूमीवरुन
    येणाऱ्या शत्रूंच्या घोड्यांच्या फुरफुरण्याचा आवाज आम्ही ऐकतो.
    त्यांच्या खुरांच्या दणदणाटाने जमीन हादरते.
ते ही भूमी व त्यावरील प्रत्येक गोष्टीचा
    नाश करण्यासाठी आले आहेत.
ते नगराचा व त्यात राहणाऱ्या सर्व लोकांना
    नाश करण्यासाठी आले आहेत.

17 “यहूदाच्या लोकांनो, मी विषारी सर्प तुमच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवीत आहे.
    त्यांना आवरणे अशक्य आहे.
    ते तुम्हाला दंश करतील.”
हा देवाकडून आलेला संदेश आहे.

यिर्मया 9:2-11

जर वाळवंटात माझी धर्मशाळा असती
    तर मी माझ्या लोकांना सोडून त्यांच्यापासून खूप दूर जाऊ शकलो असतो.
का? कारण त्यांनी सर्वांनी देवाचा विश्वासघात केला आहे.
    ते देवाच्या विरुद्ध गेले आहेत.

“ते त्यांच्या जिभा धनुष्यासारख्या वापरतात.
    त्यातून खोट्याचे बाण उडतात.
ह्या भूमीवर, सत्य नव्हे, तर असत्य, खोटे बलवान झाले आहे,
हे लोक एका पापाकडून दुसऱ्या पापाकडे जातात.
    त्यांना माझे ज्ञान नाही.”
परमेश्वर असे म्हणाला आहे.

“तुमच्या शेजाऱ्यावर नजर ठेवा.
    तुमच्या स्वतःच्या भावावरसुध्दा विश्वास ठेवू नका का?
कारण प्रत्येक भाऊ लबाड आहे.
    प्रत्येक शेजारी चहाडखोर आहे.
प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याशी खोटे बोलतो,
    कोणीही खरे बोलत नाही.
यहूदाच्या लोकांनी आपल्या जिभांना
    खोटे बोलण्यास शिकविले आहे
त्यांना परत येणे अशक्य होईपर्यंत
    त्यांनी पाप केले.
एका वाईट गोष्टीमागून दुसरी वाईट गोष्ट आली.
    खोट्यामागून खोटे आले.
    लोकांनी मला जाणून घ्यायचे नाकारले.”
परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.

म्हणून, सर्वशाक्तिमान परमेश्वर म्हणतो:
“धातू शुद्ध आहे की नाही हे बघण्यासाठी कामगार तो तापवितो.”
त्याप्रमाणे मी यहूदाच्या लोकांची परीक्षा घेईन.
    मला दुसरा पर्याय नाही.
    माझ्या लोकांनी पाप केले.
यहूदाच्या लोकांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत.
    ते खोटे बोलतात.
प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो.
    पण गुप्तपणे तो शेजाऱ्यावर हल्ला करण्याचा बेत आखत आहे.
“मी आता यहूदाच्या लोकांना शिक्षा करावी.”
हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
“मी शिक्षा करावी अशा प्रकारचे ते लोक आहेत हे तुम्हाला माहीत आहे.
    त्यांना योग्य ती शिक्षा मी करावी.”

10 मी, यिर्मया, डोंगरासाठी आकांत करीन.
    मी वैराण शेतांसाठी शोकगीत गाईन.
    का? कारण सजीव सृष्टी नाहीशी केली गेली आहे.
तेथून आता कोणीही प्रवास करीत नाही.
    गुरांचे हंबरणे ऐकू येत नाही.
पक्षी दूर उडून गेले आहेत.
    प्राणी निघून गेले आहेत.

11 “मी, परमेश्वर, यरुशलेम नगरी म्हणजे कचऱ्याचा ढीग करीन.
    मी कोल्ह्यांचे वसतिस्थान होईल.
मी यहूदातील नगरे नष्ट करीन.
    मग तेथे कोणीही राहणार नाही.”

मार्क 12:41-44

विधवा दान देण्याचा अर्थ दाखविते(A)

41 येशू दानपेटीच्या समोर बसला असता लोक पेटीत पैसे कसे टाकतात हे पाहत होता. आणि पुष्कळ श्रीमंत लोक भरपूर पैसे टाकीत होते. 42 नंतर एक गरीब विधवा आली. तिने तांब्याची दोन लहान नाणी टाकली, ज्याची किंमत शंभरातील एका पैशाएवढी होती.

43 येशूने आपल्या शिष्यांना एकत्र बोलावले आणि म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, की सर्वांनी त्या पेटीत जे दान टाकले त्या सर्वांपेक्षा या विधवेने अधिक टाकले आहे. 44 मी असे म्हणतो कारण त्यांच्याजवळ जे भरपूर होते त्यामधून त्यांनी काही दान दिले, परंतु ती गरीब असूनही तिच्याजवळ होते ते सर्व तिने देऊन टाकले. ती सर्व तिच्या जीवनाची उपजीविका होती.”

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center