Revised Common Lectionary (Semicontinuous)
71 परमेश्वरा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
त्यामुळे माझी कधीही निराशा होणार नाही.
2 तुझ्या चांगुलपणात तू मला वाचवशील.
तू माझी सुटका करशील, माझ्याकडे लक्ष दे आणि मला वाचव.
3 माझा किल्ला हो, सुरक्षित ठिकाणी धावत जाण्याचे माझे घर तू हो,
तू माझे सुरक्षित ठिकाण माझा खडक आहेस.
तेव्हा मला वाचवण्याची आज्ञा दे.
4 देवा, तू मला दुष्ट लोकांपासून वाचव.
मला वाईट, पापी लोकांपासून वाचव.
5 प्रभु, तू माझी आशा आहेस मी तरुण मुलगा असल्यापासूनच
तुझ्यावर विश्वास टाकला आहे.
6 जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे
मी माझ्या आईच्या शरीरात होतो
तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीच तुझी प्रार्थना केली.
1 हे यिर्मयाचे संदेश आहेत, यिर्मया हिल्कीयाचा मुलगा होता. तो अनाथोथ शहरातील याजकांच्या कुळातील होता. [a] हे शहर बन्यामीनच्या कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीवर वसले आहे. 2 योशीया यहूदाचा राजा असताना देवाने यिर्मयाशी बोलायला आरंभ केला. योशीया आमोनचा मुलगा होता. योशीयाच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षापासून देवाने यिर्मयाशी बोलायला सुरवात केली. 3 यहूदाचा राजा यहोयाकीम याच्या कारकिर्दीतही परमेश्वर यिर्मयाशी बोलत राहिला. यहोयाकीम हा योशीयाचा मुलगा होय योशीयाचा दुसरा मुलगा सिद्कीया हा यहूदाचा राजा झाल्यावर त्याच्या कारकिर्दीच्या अकरा वर्षे पाच महिने एवढ्या काळापर्यंत परमेश्वर यिर्मयाशी बोलला. सिद्कीयाच्या अकरा वर्षाच्या कारकिर्दीच्या नंतर पाचव्या महिन्यात यरुशलेममधील लोकांना दूर नेऊन हद्दपार केले गेले.
दोन दृष्टान्त
11 मला परमेश्वराचा संदेश मिळाला. तो असा होता. “यिर्मया, तुला काय दिसते?”
मी परमेश्वराला सांगितले, “मला बदामाच्या झाडापासून केलेली एक काठी दिसते.”
12 परमेश्वर मला म्हणाला, “तुला उत्तम दिसत आहे. तुला पाठविलेले माझे शब्द खरे आहेत की नाही हे नक्की करण्यासाठी मी लक्ष ठेवत आहे.” [a]
13 मग मला पुन्हा परमेश्वराचा संदेश मिळाला तो असा: “यिर्मया, तुला काय दिसते?”
मी परमेश्वराला उत्तरादाखल म्हणालो, “मला उकळते पाणी असलेले एक भांडे दिसत आहे. ते उत्तरेकडे कलत आहे.”
14 परमेश्वर मला म्हणाला, “उत्तरेकडून काहीतरी भयंकर आपत्ती येईल.
ती ह्या देशातील सर्व लोकांवर येईल.
15 काही काळाने मी उत्तरेकडील राज्यातील सर्व लोकांना बोलवीन.”
परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या:
“त्या देशातील राजे येतील
आणि यरुशलेमच्या वेशीजवळ आपली सिहांसने स्थापन करतील.
ते शहराच्या तटबंदीवर हल्ला करतील.
ते यहूदातील सर्व शहरांवर चढाई करतील.
16 आणि मी माझ्या लोकांविरुद्ध निकाल घोषित करीन.
ते लोक वाईट आहेत. ते माझ्याविरुद्ध् फिरले आहेत.
म्हणून मी असे करीन माझ्या लोकांनी माझा त्याग केला.
त्यांनी दुसऱ्या देवतांना बळी अर्पण केले.
त्यांनी स्वतःच्या हातांनी घडविलेल्या मूर्तीची पूजा केली.
17 “यास्तव, यिर्मया, तयार हो,
उभा राहा आणि लोकांशी बोल.
मी तुला सांगितलेली
प्रत्येक गोष्ट तू त्यांना सांग.
लोकांना घाबरु नकोस, जर तू त्यांना घाबरलास,
तर तू त्यांना घाबरावेस म्हणून मी सबळ कारण काढीन.
18 माझ्या विषयी म्हणशील तर, आज मी तुला भक्कम शहराप्रमाणे
वा लोखंडी खांबाप्रमाणे
अथवा जस्ताच्या भिंतीप्रमाणे करीन.
तू ह्या भूमीवरच्या सर्वांविरुद्ध् यहूदाच्या राजाविरुध्द्,
यहूदाच्या नेत्यांविरुध्द्,
तेथील याजकांविरुध्द् आणि
लोकांविरुद्ध समर्थपणे उभा राहशील.
19 ते सर्व लोक तुझ्याविरुद्ध् लढतील,
पण ते तुझा पराभव करणार नाहीत.
का? कारण मी तुझ्याबरोबर आहे.
मी तुझे रक्षण करीन.”
हा परमेश्वराचा संदेश आहे.
येशू हा शब्बाथाच्या दिवसाचा प्रभु आहे(A)
6 नंतर असे झाले की, शब्बाथ दिवशी येशू शेतामधून जात होता. आणि त्याचे शिष्य धान्याची कणसे मोडून हातावर चोळून खात होते. 2 मग परुश्यांपैकी काही म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करण्यास मना आहे, ते तुम्ही का करता?”
3 येशूने त्यांना म्हटले, “जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले हे तुम्ही वाचले नाही काय? 4 तुम्ही हे ऐकले नाही का की, तो देवाच्या मंदिरात गेला आणि अर्पणाची भाकर त्याने खाल्ली व त्याच्याबरोबर जे होते त्यांना दिली. जी भाकर फक्त याजकच खाऊ शकत असे ती त्यांनी खाल्ली.” 5 येशू त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभु आहे.”
2006 by World Bible Translation Center