Revised Common Lectionary (Semicontinuous)
11 माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस?
तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”
2 दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात.
ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात.
ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्रदयात सरळ सोडतात.
3 त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा [a] असा नाश केला तर काय होईल?
मग चांगली माणसे काय करतील?
4 परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो.
तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो
आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो
ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
5 परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो.
दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.
6 तो त्यांच्यावर जळते निखारे आणि तप्त गंधक ओतेल.
दुष्टांना फक्त तप्त आणि चटका देणारा वाराच मिळेल.
7 परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात.
चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.
14 वाचलेले लोक आरडाओरड सुरू करतील.
त्यांचा आवाज महासागराच्या गर्जनेपेक्षा मोठा असेल.
परमेश्वराची महानता पाहून ते आनंदित होतील.
15 ते लोक म्हणतील, “पूर्वेकडच्या लोकांनो, परमेश्वराचे स्तवन करा.
दूरच्या देशांतील लोकांनो,
इस्राएलच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा.”
16 जगाच्या कानाकोपऱ्यातून देवाचे स्तुतिस्तोत्र आपल्याला ऐकायला येतील.
ह्या गीतांतून खऱ्या देवाची स्तुती असेल.
पण मी म्हणतो, “पुरे पुष्कळ झाले.
मी ज्या गोष्टी पाहतो त्या भयानक आहेत.
लोकांच्या विरूध्द् विश्वासघातकी उठले आहेत.
व त्यांना त्रास देत आहेत.”
17 ह्या देशात राहणाऱ्या लोकांवर येणारे संकट मला दिसत आहे.
त्यांची भीती, त्यांच्या पुढे असलेले खाचखळगे व सापळे मला दिसतात.
18 लोकांना संकटाची चाहूल लागून
ते घाबरून जातील.
काही लोक सैरावैरा पळतील.
पण ते खाचखळग्यात पडतील आणि सापळ्यात अडकतील.
त्यातील काही खड्ड्यातून चढून बाहेर येतील.
पण ते दुसऱ्या सापळ्यात अडकतील,
आकाश फाटेल आणि प्रलय होईल.
पृथ्वीचा पाय कापू लागेल.
19 धरणीकंप होऊन जमीन दुभंगेल.
20 पृथ्वीला पापांचा भार झाला आहे.
म्हणून ती त्या ओझ्याखाली दबून जाईल.
पृथ्वी एखाद्या खिळखिळ्या झालेल्या घरासारखी उगमगेल.
एखाद्या मद्यप्याप्रमाणे कोसळेल
आणि पुन्हा उठणार नाही.
21 त्या वेळी, परमेश्वर, स्वर्गातील सैन्यांचा स्वर्गात
व पृथ्वीवरील राजांचा पृथ्वीवर,
न्यायानिवाडा करील.
22 खूप राजे एकत्र जमतील
आणि त्यांना तुरूंगात टाकले जाईल.
पण शेवटी, बऱ्याच काळानंतर,
त्यांना न्याय दिला जाईल.
23 यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल.
त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल.
त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल
आणि सूर्याला लाज वाटेल.
विश्वासू नोकर कोण आहे(A)
41 मग पेत्र म्हणाला, “प्रभु, तुम्ही ही बोधकथा आम्हांलाच सांगत आहात की सर्वांना?”
42 तेव्ह प्रभु म्हणाला, “असा कोण शहाणा व विश्वासू कारभारी आहे की, ज्याला प्रभु त्याच्या नोकरांना त्याचे धान्य योग्य वेळी देण्यासाठी त्याची नेमणूक करील? 43 त्याचा मालक येईल त्यावेळी असे करताना जो नोकर आढळेल तो धन्य. 44 मी तुम्हांला खरे सांगतो, मालक त्या नोकराला त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील.
45 “पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार विलंब लावतो.’ व तो त्याच्या स्त्री व पुरुष नोकरांना मारहाण करतो व खाण्यापिण्यास सुरुवात करतो. 46 ज्या दिवसाची तो वाट पाहत नाही त्या दिवशी त्या नोकराचा मालक येईल व अशा वेळी येईल की ती वेळ त्याला माहीत असणार नाही. आणि तो त्याचे वाभाडे वाभाडे काढील व तो त्याला अविश्वासू लोकांबरोबर ठेवील.
47 “ज्या नोकराला आपल्या मालकाची इच्छा माहीत असते व जो तयार राहत नाही, किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल. 48 परंतु कसलाही वाईट हेतू न बाळगता मालकाला न आवडणारे जर त्याने केले असेल तर त्याला कमी मार बसेल. ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्याकडून पुष्कळाची अपेक्षा केली जाईल. ज्यांच्याजवळ जास्त ठेवले आहे त्यांच्याकडून जास्त मागितले जाईल.
2006 by World Bible Translation Center