Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 60

प्रमुख गायकासाठी “कराराची लिली” या चालीवर बसवलेले शिकवण्यासाठी लिहीलेले दावीदाचे मिक्ताम, अराम नहराईम आणि अराम सोबा याच्याशी तो लढला आणि क्षाराच्या खोऱ्यात परत गेल्यावर 12,000 अदोमातील सैनिकांचा त्याने पराभव केला तेव्हाचे स्तोत्र

60 देवा, तू आमच्यावर रागावला होतास म्हणून तू आमचा त्याग केलास
    आणि आमचा नाश केलास.
    कृपाकरुन आमच्याकडे परत ये.
तू पृथ्वी हादरवलीस आणि तिला दुभंगवलेस,
    सारे जग कोलमडून पडले.
    आता ते पुन्हा एकत्र आण.
तू तुझ्या लोकांना खूप त्रास दिलास.
    आम्ही दारु पिऊन झोकांड्या खाणाऱ्या आणि खाली पडणाऱ्या लोकांप्रमाणे आहोत.
जे तुझी उपासना करतात त्यांना तू इशारा दिला होतास,
    त्यामुळे आता ते शत्रूंपासून सुटका करुन घेऊ शकतील.

तू तुझी महान शक्ती वापर आणि आम्हाला वाचव.
    माझ्या प्रार्थनेला उत्तर दे आणि तू ज्यांच्यावर प्रेम करतोस त्या लोकांना वाचव.

देव त्याच्या मंदिरात म्हणाला
    “मी युध्द जिंकेन आणि विजयामुळे आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या लोकांबरोबर वाटून घेईन.
    मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
गिलाद आणि मनश्शे माझे असेल,
    एफ्राईम, माझे शिरस्त्राण असेल
    आणि यहुदा माझा राजदंड असेल.
मवाब माझे पाय धुण्याचे पात्र असेल,
    अदोम माझा जोडा नेणारा गुलाम असेल.
    मी पलिष्टी लोकांचा पराभव करीन आणि माझ्या विजयाबद्दल ओरडून सांगेन.”

9-10 मला त्या शक्तिशाली आणि सुरक्षित शहरात कोण नेईल?
    अदोमाशी लढायला मला कोण नेईल?
देवा, हे करण्यासाठी मला फक्त तूच मदत करु शकतोस परंतु तू आम्हाला सोडून गेलास.
    तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
11 देवा, तू आम्हाला शत्रूचा पराभव करण्यासाठी मदत कर.
    कारण लोक आम्हाला मदत करु शकत नाहीत.
12 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो
    देव आमच्या शत्रूचा पराभव करु शकतो.

होशेय 11:12-12:14

12 “एफ्राईमच्या दैवतांनी मला घेरून टाकले.
    इस्राएलच्या लोकांनी माझ्याकडे पाठ फिरविली.
म्हणून त्यांचा नाश झाला पण यहूदा अजून एल बरोबरच चालत आहे.
    यहूदा पवित्रांशी निष्ठावंत आहे.”

परमेश्वर इस्राएलच्याविरुध्द आहे

12 एफ्राईम त्याचा वेळ वाया घालवीत आहे-इस्राएल दिवसभर “वाऱ्याचा पाठलाग करतो.” लोक अधिकाधिक खोटे बोलतात. ते जास्तीतजास्त चोव्या करतात. त्यांनी अश्शूरशी करार केले आहेत. आणि ते जैतून तेल मिसरला नेत आहेत.

परमेश्वर म्हणतो, “माझे इस्राएलशी भांडण आहे. याकोबला त्याच्या कर्मांबद्दल सजा मिळालीच पाहिजे. त्याने केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. याकोबने आईच्या गर्भात असल्यापासूनच त्याच्या भावाला फसवायला सुरवात केली. याकोब शक्तिशाली तरुण होता. त्या वेळी तो परमेश्वराविरुध्द लढला. याकोबने देवदूताशी मल्लयुध्द खेळले आणि तो जिंकला तो रडला व त्याने कृपा करण्याची याचना केली. हे बेथेलमध्ये घडले. तेथे तो आमच्याशी बोलला. हो, खरेच, यहोवा सैन्यांचा परमेश्वर आहे. त्याचे नाव यहोवा (परमेश्वर)असे आहे. म्हणून आपल्या परमेश्वराकडे परत या त्याच्याशी निष्ठा ठेवा. योग्य तेज करा. तुमच्या परमेश्वरावर नेहमी विश्वास ठेवा.

“याकोब, हा खरा व्यापारी आहे. तो त्याच्या मित्रांनासुध्दा फकवितो त्याचे तराजू सुध्दा खोटे आहेत. एफ्राईम म्हणाला, ‘मी श्रीमंत आहे. मला खरी संपत्ती सापडली आहे. माझे अपराध कोणालाही कळणार नाहीत. कोणालाही माझी पापे समजणार नाहीत.’

“पण तुम्ही मिसरमध्ये असल्यापासून, मी परमेश्वर तुमचा परमेश्वर आहे. सभामंडपाच्या वेळेप्रमाणे तुम्हाला तंबूत राहायला भाग पाडीन. 10 मी संदेष्ट्यांशी बोललो मी त्यांना पुष्कळ दृष्टांन्त दिले. माझी शिकवण तुम्हाला शिकविण्यासाठी मी त्याना अनेक मार्ग दाखविले. 11 पण गिलादाच्या लोकांनी पाप केले आहे. तेथे पुष्कळ भयानक मूर्ता आहेत. गिल्गालमध्ये लोक बैलांना बळी अर्पण करतात. त्यांच्या अनेक वेदी आहेत. नांगरलेल्या शेतात ज्याप्रमाणे ढेकळांच्या रांगा असतात, त्याप्रमाणे त्यांच्या वेदींच्या रंगाच्या रांगा आहेत.

12 “याकोब अरामला पळून गेला. त्या जागी, इस्राएलने पत्नीसाठी सेवा केली. दुसरी पत्नी मिळावी म्हणून त्याने मेंढ्या पाळल्या. 13 पण परमेश्वराने संदेष्ट्यांच्या उपयोग करून देवाने इस्राएलला सुरक्षित ठेवले. 14 पण एफ्राईम परमेश्वराच्या रागास कारणीभूत झाला एफ्राईमने अनेक लोकांना ठार केले. म्हणून त्याला त्याच्या अपराधांबद्दल शिक्षा होईल. त्याचा प्रभू (परमेश्वर) त्याला अपमान सहन करायला लावील.”

कलस्सैकरांस 3:18-4:1

लोकांबरोबर तुमचे जीवन

18 पत्नींनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे तसे तुम्ही आपल्या पतींच्या अधीन राहा.

19 पतींनो, आपल्या पत्नीवर प्रेम करा आणि त्यांच्याबरोबर कठीणतेने वागू नका.

20 मुलांनो, सर्व गोष्टीत आपल्या आईवडिलांची आज्ञा पाळा. कारण प्रभूच्या अनुयायांचे असे वागणे देवाला आनंद देणारे आहे.

21 वडिलांनो, आपल्या मुलाला चिडवू नका, म्हणजे ते निराश होणार नाहीत.

22 गुलामांनो, तुमच्या जगिक मालकाच्या सर्व आज्ञा पाळा आणि मनुष्याला संतोषविणाऱ्या, डोळ्यांनी देखरेख करण्यासाठी नव्हे तर त्याऐवजी पूर्ण मनाने प्रभूला भिऊन आज्ञा पाळा. कारण तुम्ही प्रभूचा आदर करता. 23 तुमच्या अंतःकरणापासून काम करा. जणू काय तुम्ही प्रभूसाठी काम करीत आहात, मनुष्यांसाठी नव्हे असे काम करा. 24 लक्षात ठेवा, प्रभू तुम्हांला तुमच्या स्वर्गीय वारशाचे बक्षीस देईल. ख्रिस्त जो तुमचा खरा धनी त्याची सेवा करीत राहा. 25 कारणे जो कोणी वाईट करतो, त्याचेसुद्धा तसेच होईल. देव असेच वागवील कारण त्याच्याकडे पक्षपात नाही.

मालकांनो, आपल्या गुलामांना जे न्याय्य व योग्य ते द्या.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center