Revised Common Lectionary (Semicontinuous)
इस्राएल परमेश्वराला विसरला आहे
11 परमेश्वर म्हणाला, “इस्राएल लहान बालक असताना, मी (परमेश्वराने) त्यांच्यावर प्रेम केले.
आणि मी माझ्या मुलाला मिसरबाहेर बोलाविले.
2 पण मी जितके अधिक इस्राएलींना बोलाविले,
तितके जास्त ते मला सोडून गेले.
त्यांनी बआलाना बळी अर्पण केले.
मूर्ती पुढे धूप जाळला.
3 “एफ्राईमला चालावयाला शिकविणारा मीच होतो.
मी इस्राएलींना हातांवर उचलून घेतले.
मी त्यांना बरे केले.
पण त्यांना त्याची जाणीव नाही.
4 मी त्यांना दोऱ्यांनी बांधून नेले.
पण त्या प्रेमाच्या दोऱ्या होत्या.
मी त्यांना मुक्त करणाऱ्या माणसाप्रमाणे होतो.
मी खाली वाकून त्यांना जेवू घातले.
5 “परमेश्वराकडे परत येण्यास इस्राएल लोकांनी नकार दिला म्हणून ते मिसरला जातील अश्शूरचा राजा त्यांचाही राजा होईल. 6 त्यांच्या गावांवर टांगती तलवार राहील. त्यांच्या सामर्थ्यवान पुरुषांना ती मारील त्यांच्या नेत्यांचा ती नाश करील.
7 “मी परत यावे अशी माझ्या लोकांची अपेक्षा आहे. वरच्या परमेश्वराला ते बोलवतील पण देव त्यांना मदत करणार नाही.”
इस्राएलचा नाश करण्याची परमेश्वराची इच्छा नाही
8 “एफ्राईम, तुला सोडून देण्याची माझी इच्छा नाही.
इस्राएल, तुझे रक्षण करावे असे मला वाटते.
अदमाह किवा सबोईम यांच्यासारखी
तुझी स्थिती करावी असे मला वाटत नाही.
माझे मनःपरिवर्तन होत आहे.
तुझ्याबद्दलचे माझे प्रेम अतिशय उत्कट आहे.
9 मी, माझ्या भयंकर क्रोधाचा,
विजय होऊ देणार नाही.
मी पुन्हा एफ्राईमचा नाश करणार नाही.
मी मानव नसून परमेश्वर आहे.
मी तुमच्यामधला एकमेव पवित्र आहे मी तुमच्याबरोबर आहे.
मी माझा क्रोध प्रकट करणार नाही.
10 मी सिंहासारखी डरकाळी फोडीन.
मी डरकाळी फोडताच,
माझी मुले माझ्यामागून येतील
ती पश्चिमेकडून भयाने थरथर कापत येतील.
11 ती मिसरमधून घाबरलेल्या पाखरंाप्रमाणे येतील.
मग मी त्यांना घरी परत नेईन.”
परमेश्वर असे म्हणाला आहे.
भाग पांचवा
((स्तोत्रसंहिता 107-150)
107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
कारण तो चांगला आहे.
त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
2 परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
3 परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.
4 त्यांतले काही वाळवंटात फिरले.
ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
5 ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
आणि अशक्त होत होते.
6 नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
7 देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
8 परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि
तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
9 देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो.
देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
43 जर एखादा माणूस शहाणा असला तर त्याला या गोष्टी आठवतील
नंतर त्याला देवाचे प्रेम म्हणजे खरोखर काय ते कळून येईल.
ख्रिस्तातील तुमचे नवे जीवन
3 म्हणून जसे तुम्हांला ख्रिस्ताबरोबर मेलेल्यामधून उठविले गेले आहे तर, स्वर्गातील म्हणजे ज्या वरील गोष्टी आहेत त्यासाठी प्रयत्न करा. जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. 2 ज्या वरील (स्वर्गातील) गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करु नका. 3 कारण तुम्ही मेलेले आहात आणि तुमचे नवे जीवन देवामध्ये ख्रिस्ताबरोबर लपलेले आहे. 4 जेव्हा ख्रिस्त. जो आमचे जीवन आहे. त्याच्या दुसऱ्या येण्याच्या वेळेस प्रगट होईल. तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट व्हाल.
5 म्हणून तुमच्यामध्ये पृथ्वीतलावरील जे काही आहे ते सर्व जिवे मारा. जारकर्म, अशुद्धता, लोभ, दुष्ट इच्छा, अधाशीपणा, जी एक प्रकारची मूर्तिपूजा आहे. 6 कारण या गोष्टींमुळे देवाचा राग ओढवणार आहे. [a] 7 तुम्हीसुद्धा असेच जीवन जगत होता जेव्हा तुम्ही अशा गोष्टी करीत होता.
8 पण आता, तुम्ही या सर्व गोष्टी बाजूला केल्या पाहिजेतः राग, क्रोध, दुष्टता, निंदा आणि तुमच्या मुखातील लज्जास्पद बोलणे, या सर्व गोष्टी तुम्ही दूर केल्याच पाहिजेत. 9 एकमेकाशी लबाडी करु नका. कारण तुम्ही जुना मनुष्य त्याच्या कृतीसह काढून टाकला आहे. 10 आणि तुम्ही नवीन मनुष्य धारण केला आहे. हे नवे रुप त्याच्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेप्रमाणे सतत नवे होत जाते. यासाठी की या नव्या मनुष्याला देवाचे पूर्ण ज्ञान मिळावे. 11 परिणाम म्हणून यहूदी व विदेशी असा कोणताही फरक नाही. एखाद्याची सुंता झालेला किंवा एखाद्याची सुंता न झालेला, बेताल, व असंस्कृत, गुलाम आणि स्वतंत्र मनुष्य असा कोणताही फरक नाही, पण ख्रिस्त हाच सर्व काही आहे आणि तो सर्व विश्वासणाऱ्यात आहे.
येशू स्वार्था विरुद्ध सूचना देतो
13 नंतर लोकसमुदायातील एक जण त्याला म्हणाला, “गुरुजी, माझ्या भावाला वतन विभागून माझे मला द्यायला सांगा!”
14 परंतु येशू त्याला म्हणाला, “मनुष्या, मला तुमच्यावर मध्यस्थ किंवा न्यायाधीश म्हणून कोणी नेमले?” 15 मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतःला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”
16 नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली: “कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले. 17 तो स्वतःशी विचार करुन असे म्हणाला, ‘मी काय करु, कारण धान्य साठवायला माझ्याकडे जागा नाही?’
18 “मग तो म्हणाला, ‘मी असे करीन की धान्याची कोठारे पाडून मोठी बांधीन, मी माझे सर्व धान्य व माल तेथे साठवीन. 19 आणि मी माझ्या जिवाला म्हणेन, जिवा, तुझ्यासाठी पुष्कळ चांगल्या गोष्टी अनेक वर्षे पुरतील इतक्या आहेत. आराम कर, खा, पी आणि मजा कर.’
20 “पण देव त्याला म्हणतो, ‘मूर्खा, जर आज तू मेलास तर तू मिळविलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’
21 “जो कोणी स्वतःसाठी संपत्ती जमा करतो परंतु देवाच्या दृष्टीने जो धनवान नाही, अशा मनुष्यासारखे हे आहे.”
2006 by World Bible Translation Center