Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुक गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तुतिगीत
85 परमेश्वरा, तुझ्या देशाला दया दाखव.
याकोबाचे लोक परदेशात कैदी आहेत.
कैद्यांना त्यांच्या देशात परत आण.
2 परमेश्वरा, तुझ्या माणसांना क्षमा कर.
त्यांची पापे पुसून टाक.
3 परमेश्वरा, रागावणे सोडून दे.
क्रोधित होऊ नकोस.
4 देवा, तारणहारा, आमच्यावर रागावणे सोडून दे.
आणि आमचा पुन्हा स्वीकार कर.
5 तू आमच्यावर कायमचा रागावणार आहेस का?
6 कृपा करुन आम्हाला पुन्हा जगू दे.
तुझ्या लोकांना सुखी कर.
7 परमेश्वरा, आम्हाला वाचव आणि
तू आमच्यावर प्रेम करतोस ते दाखव.
8 परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले.
तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल,
जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
9 देव लवकरच त्याच्या भक्तांना वाचवील.
आम्ही परत मानाने आमच्या जमिनीवर राहू.
10 देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल.
चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील.
11 पृथ्वीवरचे लोक देवाशी प्रामाणिक राहातील
आणि स्वर्गातला तो देव त्यांच्याशी चांगला वागेल. [a]
12 परमेश्वर आपल्याला खूप चांगल्या गोष्टी देईल.
जमीन खूप चांगली पिके देईल.
13 देवाच्या समोर चांगुलपणा जाईल
आणि त्याच्यासाठी मार्ग तयार करील.
नेत्यांनी इस्राएलला व यहूदाला पाप करायाला भाग पाडले
5 “यायकांनी, इस्राएल राष्ट्रा आणि राजाच्या घराण्यातील लोकांनो, माझे म्हणणे ऐका. कारण हा निवाडा तुमच्यासाठी आहे.
“तुम्ही मिस्पातील सापळ्याप्रमाणे आहात. 2 तुम्ही पुष्कळ वाईट कृत्ये केली आहेत, म्हणून मी तुम्हा साऱ्याना शिक्षा करीन. 3 एफ्राईमला मी ओळखून आहे. इस्राएलची कृत्ये मला महीम आहेत. एफ्राईम, आता, यावेळी तू वश्येप्रमाणे वागत आहेस. इस्राएल पापाने बरबटली आहे. 4 इस्राएलच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या वाईट गोष्टी त्यांना परमेश्वराकडे परत येण्यास अडथळा करतात. ते नेहमी दुसऱ्या दैवतांच्या मागे मागे जाण्याच्या मार्गाचाच विचार करतात. ते परमेश्वराला ओळखत नाहीत. 5 इस्राएलचा अहंकार त्यांच्याविरुध्द पुरावा आहे. म्हणून इस्राएल आणि एफ्राईम त्यांच्या पापांना अडखळतील. त्याच्याबरोबर यहूदाही अडखळेल.
6 “लोकांचे नेते परमेश्वराचा शोध घेतील. ते त्यांच्याबरोबर त्यांच्या ‘मेंढ्या’ व ‘गायी’ घेतील. पण त्यांना परमेश्वर सापडणार नाही. का? कारण त्यांने त्या लोकांचा त्याग केला आहे. 7 ते परमेश्वराशी प्रामाणिक राहात नाहीत. त्यांची मुले परक्यांपासून झालेली आहेत. आता परमेश्वर त्यांचा आणि त्यांच्या देशाचा पून्हा नाश करील”
इस्राएलच्या नाशाचे भविष्य
8 “गिबात शिंग फुंका,
रामात तुतारी फुंका.
बेथ-आवेनमध्ये इषारा द्या.
बन्यामीन, तुझ्यामागे शत्रू लागला आहे.
9 शिक्षेच्या वेळी एफ्राईम ओसाड होईल
ह्या गोष्टी नक्की घडून येतील,
असा खात्रीपूर्वक इषारा मी (परमेश्वर)
इस्राएलच्या घराण्यांना देतो.
10 दुसऱ्यांची मालमत्ता चोरणाव्या
चोरांसारखे यहूदाचे नेते आहेत.
म्हणून मी (परमेश्वर) माझ्या रागाचा
त्यांच्यावर पाण्याप्रमाणे वर्षाव करीन.
11 एफ्राईमला शिक्षा होईल.
द्राक्षांप्रमाणे तो चिरडला व दाबला जाईल. का?
कारण त्याने ओंगळाला अनुसरण्याचे ठरविले.
12 कसर ज्याप्रमाणे कापडाच्या तुकड्याचा नाश करते,
तसाच मी एफ्राईमचा नाश करीन.
लाकडाचा तुकडा सडून नष्ट होता,
तसेच मा यहूदाला नष्ट करीन.
13 एफ्राईमने स्वतःचा आजार व यहूदाने स्वतःची जखम पाहिली. म्हणून मदतीसाठी ते अश्शुरकडे गेले.
त्यांनी सम्राटाला त्यांच्या समस्या सांगितल्या.
पण तो सम्राट तुम्हाला बरे करु शकत नाही.
तो तुमची जखम भरून काढू शकत नाही.
14 का? एफ्राईमच्या दृष्टीने मी सिंहाप्रमाणे होणार आहे.
यहूदा राष्ट्राला मी तरुण सिंहासारखा होणार आहे.
मी, हो मी, त्यांचे फाडून तुकडे तुकडे करीन.
मी त्यांचे हरण करीन.
आणि कोणीही त्यांना माझ्यापासून वाचवू शकणार नाही.
15 लोक त्यांचा अपराध कबूल करे पर्यंत
आणि माझा शोध घेईपर्यंत
मी माझ्या जागी परत जाईन. हो!
त्यांच्या अडचणीच्या वेळी ते माझी कसून शोध करतील.”
22 “माझ्या यहूदी बांधवानो, हे शब्द ऐका: नासरेथचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता. देवाने तुम्हांला हे स्प्टपणे दाखविले आहे. देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अदुभुत गोष्टी तुमच्यामध्ये करुन हे सिद्ध केले. तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या. म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे. 23 तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जिवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता, ती देवाचीच याजना होती. फार पूर्वीच देवाने ही योजना तयार केली होती. 24 येशूने मरणाचे दु:ख सहन केले. परंतु देवाने त्याला मुक्त केले, देवाने येशूला मरणातून उठविले, मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही. 25 येशूविषयी दावीद असे म्हणतो:
‘मी प्रभूला नेहमी माइयासमोर पाहिले आहे;
मला सुरक्षित ठेवण्यासाठी तो माइया उजवीकडे असतो
26 म्हणून माझे हृदय आनंदात आहे
आणि माझे तोंड आनंदात बोलते.
होय, माझे शरीरदेखील आशा धरुन राहील
27 कारण तू माझा जीव मरणाच्या जागेत [a] राहू देणार नाहीस
तू तुइया पवित्र लोकांच्या शरीराला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस.
28 तू मला कसे जगायचे ते शिकविलेस.
तू माइयाजवळ येशील.
आणि मला मोठा आनंद देशील.’ (A)
29 “माझ्या बांधवांनो, खरोखर आपला पूर्वज दाविद याच्याविषयी मी तुम्हांला सांगू शकतो. तो मेला आणि पुरला गेला. आणि त्याची कबर आजच्या ह्या दिवसापर्यत आपल्यामध्ये आहे. 30 दावीद हा संदेष्टा [b] होता. आणि देव जे काही बोलला ते त्याला माहीत होते. दावीदाला देवाने अभिवचन दिले की, तो त्याच्याच घराण्यातून एका व्यक्तीला त्याच्या राजासनावर बसवील. 31 ते घडण्यापूर्वीच दावीदाला हे माहीत होते. यासाठीच दावीद त्या व्यक्तीबद्दल असे म्हणतो:
‘त्याला मरणाच्या जागेत राहू दिले नाही.
त्याचा देह कबरेमध्ये कुजला नाही.’
दावीद ख्रिस्ताच्या मरणातून पुन्हा उठविण्याविषयी म्हणत होता. 32 म्हणून येशूला देवाने मरणातून उठविले, दाविदाला नाही! आम्ही सर्व ह्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. आम्ही त्याला पाहिले! 33 येशूला स्वर्गात उचलून घेण्यात आले. आता येशू देवाच्या उजवीकडे देवाबरोबर आहे. देवाने येशूला आता पवित्र आत्मा दिलेला आहे. हाच पवित्र आत्मा देण्याचे वचन देवाने दिले होते. म्हणून आता येशू तो आत्मा ओतीत आहे. हेच तुम्ही पाहत आहात व ऐकत आहात! 34 दावीद वर स्वर्गात उचलला गेला नाही, तर येशूला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले. दावीद स्वतः म्हणाला,
‘प्रभु (देव) माझ्या प्रभुला म्हणाला:
मी तुझे वैरी
35 तुझ्या सामर्थ्याखाली घालीपर्यंत [c] माझ्या उजवीकडे बैस.’ (B)
36 “म्हणून, सर्व यहूदी लोकांना खरोखर हे समजले पाहिजे की देवाने येशूला प्रभु व रिव्रस्त [d] असे केलेले आहे. तुम्ही वधस्तंभावर खिळून मारलेला हाच तो मनुष्य!”
2006 by World Bible Translation Center