Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाने परमेश्वरापाशी गायलेले स्तोत्र हे स्तोत्र बन्यामीनी कुटुंबातील कुशाचा मुलगा शौल याच्या संबंधी आहे.
7 परमेश्वरा, माझ्या देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे.
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांपासून मला वाचव मला सोडव.
2 तू जर मला मदत केली नाहीस तर सिंहाच्या तावडीत सापडलेल्या एखाद्या प्राण्यासारखी माझी अवस्था होईल
मला दूर नेले जाईल आणि कुणीही मला वाचवू शकणार नाही.
3 परमेश्वर देवा मी काहीही चूक केलेली नाही.
मी चूक केली नसल्याबद्दल खात्रीपूर्वक सांगतो.
4 मी माझ्या मित्रांशी दुष्टावा केला नाही
आणि मी मित्रांच्या शत्रूंना मदतही केली नाही.
5 जर हे खरे नसेल तर मला शिक्षा कर.
शत्रू माझा पाठलाग करो, मला पकडो व मला मारो.
त्याला माझे जीवन जमिनीत तुडवूदे आणिमाझा जीव मातीत ढकलू दे.
6 परमेश्वरा ऊठ, आणि तुझा क्रोध दाखव माझा शत्रू रागावलेला आहे
म्हणून तू त्याच्या पुढे उभा राहा आणि त्याच्या विरुध्द् लढ.
परमेश्वरा ऊठ आणि न्यायाची मागणी कर.
7 परमेश्वरा लोकांचा निवाडा कर.
सगळे देश तुझ्याभोवती गोळा कर आणि लोकांचा निवाडा कर.
8 परमेश्वरा, माझा निवाडा कर.
मी बरोबर आहे हे
सिध्द् कर मी निरपराध आहे हे सिध्द् कर.
9 वाईटांना शिक्षा कर आणि चांगल्यांना मदत कर.
देवा तू चांगला आहेस आणि तू लोकांच्या ह्रदयात डोकावून बघू शकतोस.
10 ज्याचे ह्रदय सच्चे आहे अशांना देव मदत करतो
म्हणून तो माझे रक्षण करेल.
11 देव चांगला न्यायाधीश आहे
आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.
12-13 देवाने एकदा निर्णय घेतल्यानंतर
तो त्याचे मन बदलत नाही.
देवाकडे लोकांना शिक्षा करायची शक्ती आहे. [a]
14 काही लोक सतत वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखत असतात.
ते गुप्त योजना आखतात आणि खोटे बोलतात.
15 ते दुसऱ्यांना जाळ्यात पकडतात आणि त्यांना इजा करतात.
परंतु ते स्वत:च्याच जाळ्यात अडकतील आणि त्याना कुठली तरी इजा होईल.
16 त्यांना योग्य अशी शिक्षा मिळेल.
ते इतरांशी फार निर्दयपणे वागले.
त्यांनाही योग्य अशीच शिक्षा मिळेल.
17 मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे
मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो.
6 “तुम्ही माझ्याकडे यावे म्हणून मी खूप प्रयत्न केले. मी तुम्हाला अन्न दिले नाही. तुमच्या कोणत्याही गावात अन्न नव्हते. पण तुम्ही माझ्याकडे परत आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.
7 “कापणीच्या हंगामाच्या तीन महिने आधीच मी पाऊस थांबविला. म्हणून पीक वाढलेच नाही मग मी एका गावात पाऊस पडू दिला पण दुसऱ्या भागातील जमीन अतिशय कोरडी झाली. 8 म्हणून दोन-तीन गावांतील लोक दुसऱ्या एका गावाकडे पाण्यासाठी धडपडत गेले. पण प्रत्येकाला पुरेल एवढे पाणीच नव्हते. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
9 “उष्णता व रोग ह्यांनी मी तुमची पिके मारली. मी तुमच्या बागांचा व द्राक्षमळ्यांचा नाश केला. टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे फस्त केली. पण तरीही तुम्ही मदतीसाठी माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर ह्या गोष्टी बोलला.
10 “मिसरला मी पाठविली होती, तशीच रोगराई मी तुमच्यावर पाठविली. तुमच्यावर पाठविली. तुमच्या तरुणांना मी तलवारीने मारले. मी तुमचे घोडे काढून घेतले. मी तुमच्या तळांवर प्रेतांची दुर्गंधी पसरविली. पण तरीसुध्दा मदत मागायला तुम्ही माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वर हे सर्व बोलला आहे.
11 “सदोम आणि गमोरा यांचा मी जसा नाश केला. तसाच मी तुमचा नाश केला; आगीत ओढून काढलेल्या जळक्या काटकीप्रमाणे तुमची स्थिती होती. पण तरीही तुम्ही मदत मागायला माझ्याकडे आला नाहीत.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
12 “म्हणून, इस्राएल, मी तुझ्याबाबत पुढील गोष्टी करीन. मी तुझ्याशी असेच वागेन. इस्राएल, तुझ्या परमेश्वराला भेटण्यास सज्ज हो!”
13 मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव!
मी तुमच्या मनाची निर्मिती केली.
मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले.
मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो.
मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे?
माझे नाव याव्हे मी सैन्याचा परमेश्वर आहे.
आम्ही एकमेकांवर प्रीति केली पाहिजे
11 आपण एकमेकांवर प्रीति करावी, ही शिकवण आपण सुरुवातीपासून ऐकली आहे. 12 काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा) होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसे केले कारण त्याची स्वतःची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.
13 बंधूनो, जर जग तुमचा द्वेष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीति करतो. जो प्रीति करीत नाही तो मरणात राहतो. 15 जो कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो, तो खुनी आहे. आणि तुम्हांला माहीत आहे की, खुनी माणसाला त्याच्या ठायी असलेले अनंतकाळचे जीवन मिळत नाही.
16 अशा रीतीने ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रेम काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपण देखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. 17 जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजेत आहे हे तो पाहतो पण तरीही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते असे आपण कसे म्हणू शकतो?
2006 by World Bible Translation Center