Revised Common Lectionary (Semicontinuous)
आसाफाचे स्तोत्र
82 देव देवांच्या सभेत उभा राहातो.
तो देवांच्या सभेत न्यायाधीश आहे.
2 देव म्हणतो, “तू किती काळपर्यंत लोकांना विपरीत न्याय देणार आहेस?
दुष्टांना तू आणखी किती काळ शिक्षा न करताच सोडून देणार आहेस?”
3 “गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे.
त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
4 त्या गरीब, असहाय्य लोकांना मदत कर.
त्यांचे दुष्टांपासून रक्षण कर.”
5 “काय घडते आहे ते त्यांना [a] कळत नाही.
त्यांना काही समजत नाही.
ते काय करीत आहेत ते त्यांना कळत नाही.
त्यांचे जग त्यांच्या भोवती कोसळत आहे.”
6 मी (देव) म्हणतो, “तुम्ही देव आहात
तुम्ही सर्वशक्तिमान देवाची मुले आहात.”
7 परंतु तुम्ही मरणार आहात इतर लोक मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल,
इतर पुढारी मरतात त्याप्रमाणे तुम्ही मराल.
8 देवा, ऊठ! तू न्यायाधीश हो.
देवा, तू सर्व देशांचा पुढारी हो.
1 आमोस तकोवा नगरीतील मेंढपाळ होता. यहूद्यांचा राजा उज्जीया आणि इस्राएलचा राजा यराबाम यांच्या कारकिर्दीत आमोसला दृष्टांन्त झाले. यराबाम योवाशाचा मुलगा होता हे दृष्टांन्त भूकंपाच्या आधी दोन वर्षे झाले त्याचा हा संदेश.
अरामाला शिक्षा
2 आमोस म्हणाला:
“परमेश्वर सियोनच्या सिंहाप्रमाणे गर्जना करतो.
त्याची प्रचंड गुरगुर यरुशलेमपासून ऐकू येते;
मेंढपाळांची कुरणे सुकलीत.
कर्मेल पर्वतसुध्दा सुकला आहे.”
3 परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या, “दिमीष्कच्या लोकांनी पुष्कळ अपराध केल्यामुळे मी त्यांनी खात्रीने शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादला धान्य मळण्याच्या लोखंडी अवजाराने मारले. 4 मी हजाएलच्या घराला (आरामला) आग लावीन आणि ती आग बेन-हदादच्या उंच मनोव्यांचा नाश करील.
5 “मी दिमिष्काच्या प्रवेशद्वाराचे बसणाऱ्याचा मी नाश करीन. बेथ-एदेन राजदंडधारी राजाला मी नष्ट करीन. अरामाच्या लोकांचा पराभव होईल लोक त्यांना कीर देशात नेतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
पलिष्ट्यांना शिक्षा
6 परमेशवर असे म्हणाला, “मी गज्जाच्या लोकांना नक्कीच शिक्षा करीन कारण त्यांनी फार अपराध केले आहेत. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्रावर ताबा मिळवून लोकांना गुलाम म्हणून अदोमला पाठविले. 7 म्हणून मी गज्जाच्या कोटाला आग लावीन. ही आग गज्जाचे उंच मनोरे नष्ट करील 8 अश्दोदच्या गादीवर बसणाव्याचा मी नाश करीन. अष्कलोनच्या राजदंड धारी राजाला मी नष्ट करीन. एक्रोनच्या लोकांना मी सजा देईन. मग अजूनही जिवंत असलेले पलिष्ट्यांचे लोक मरतील.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
फोनेशियासाठी शिक्षा
9 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “सारेच्या पुष्कळ अपराधांबद्दल मी त्यांना नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी संपूर्ण राष्ट्र आपल्या ताब्यात घेऊन लोकांना गुलाम करून अदोमला पाठविले. त्यांच्या भावांबरोबर (इस्राएलबरोबर) केलेल्या कराराचे स्मरण त्यांना राहिले नाही. 10 म्हणून सोरच्या तटबंदीला मी आग लावीन. सोरचे उंच मनोरे त्यामुळे नष्ट होतील.”
अदोमींना शिक्षा
11 परमेश्वर असे सांगतो, “अदोमच्या लोकांनी खूप अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच का? कारण अदोमने तलवारीने त्याच्या भावाचा (इस्राएलचा) पाठलाग केला. अदोमला अजिबात दया आली नाही अदोमचा राग कायम राहिला. तो हिंस्त्र पशूप्रमाणे इस्राएलला फाडत राहिला 12 म्हणून मी तेमानला आग लावीन. त्यात बस्राचे मनोरे नष्ट करीन.”
अम्मोनी लोकांना सजा
13 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “अम्मोनींच्या अनेक अपराधांबद्दल मी अमोनला नक्कीच शिक्षा करीन. का? कारण त्यांनी गिलादमध्ये गर्भवतींना ठार मारले. तेथील प्रदेश बळकावून आपल्या देशाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी हे केले. 14 म्हणून मी राब्बाच्या तटबंदीला आग लावीन. ती राब्बाचे उंच मनोरे भस्मसात करील त्यांच्यावर युध्दाच्या दिवशी होत असताना होणाऱ्या आरडाओरडीप्रमाणे आणि वावटळीप्रमाणे संकटे येतील. 15 मग त्यांचा राजा व नेते पकडले जातील. त्यांना बरोबरच दूर नेले जाईल.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
मवाबसाठी सजा
2 परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “मवाबच्या लोकांनी पुष्कळ अपराध केले आहेत म्हणून मी त्यांना शिक्षा करणारच. का? कारण त्यांनी अदोमच्या राजाची हाडे जाळून त्याचा चुना केला. 2 म्हणून मी मवाबमध्ये आग लावीन. ती आग करीयोथचे उंच मनोरे नष्ट करून टाकील. तेथे भयंकर आरडाओरड होईल, रणशिंगाचा आवाज होईल आणि मवाब नष्ट होईल. 3 अशारीतीने, मवाबच्या राजांचा शेवट करीन. मी मवाबच्या नेत्यांना ठार करीन.” परमेश्वर असे म्हणतो.
विश्वास व चांगली कामे
14 माझ्या बंधूंनो, जर एखादा म्हणतो की, मी विश्वास धरतो पण तशी कृती करीत नाही तर त्याचा काय उपयोग? तो विश्वास त्याला तारू शकणार नाही. शकेल का? 15 जर एखादा बंधु किंवा भगिनी यांना कपड्यांची आवश्यकता असेल व त्यांना रोजचे अन्रसुद्धा मिळत नसेल 16 आणि तुमच्यापैकी एखादा त्यांना म्हणतो, “देवबाप तुम्हांला आशीर्वाद देवो! उबदार कपडे घाला आणि चांगले खा.” पण तुम्ही त्यांच्या शरीराला जे आवश्यक ते देत नाही, तर तो काय चांगले करतो? 17 त्याचप्रमाणे विश्वासाबरोबर जर कृतीची जोड नसेल तर तो केवळ एक मृत असाच विश्वास असेल.
18 पण एखादा म्हणेल, “तुझ्याकडे विश्वास आहे तर माझ्याकडे काम आहे.” कृतीशिवाय तुझा विश्वास दाखव, आणि माझा विश्वास मी माझ्या कृतीने दाखवीन. 19 तुम्ही असा विश्वास धरता का की, फक्त एकच देव आहे? उत्तम! भुतेदेखील असा विश्वास धरतात व थरथर कापतात.
20 अरे मूढ माणास, कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे याचा तुला पुरावा पाहिजे काय? 21 आपला पूर्वज अब्राहाम याने त्याचा पुत्र इसहाक याला वेदीवर परमेश्वराला अर्पण करण्याची तयारी दर्शविली, तेव्हा त्याच्या या कामामुळे तो देवाच्या दृष्टीत नीतिमान ठरला नाही काय? 22 तू पाहतोस की त्याच्या कृतीमध्ये विश्वाससुद्धा बरोबरीने कार्यरत होता व त्याचा विश्वास त्याच्या कृतीमुळे पूर्ण झाला. 23 आणि अशा रीतीने पवित्र शास्त्र जे सांगते, ते परिपूणे झाले की, “अब्राहामाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास हा त्याचे नीतिमत्त्व मोजला गेला.” [a] आणि त्या कारणामुळे त्याला “देवाचा मित्र” असे म्हटले गेले. 24 केवळ विश्वासामुळे नव्हे, तर त्याच्या कृतीमुळे मनुष्य देवासमोर नीतिमान ठरविला जातो, हे तुम्ही पाहता.
25 त्याचप्रमाणे राहाब वेश्येने इस्राएली हेरांना आसरा देऊन, काही वेळानंतर निराळया वाटेने तेथून निसटून जाण्यासाठी मदत केली. तेव्हा ही कृती तिचे नीतिमत्त्व मानले गेले नाही काय?
26 म्हणून, ज्याप्रमाणे शरीर हे आत्म्याशिवाय मेलेले आहे, त्याचप्रमाणे विश्वास हा कृत्यांवाचून मेलेला असा आहे.
2006 by World Bible Translation Center