Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तुतिगीत
67 देवा, मला दया दाखव, आणि आशीर्वाद दे.
कृपाकरुन आमचा स्वीकार कर!
2 देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो.
तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
3 देवा, लोक तुझी स्तुती करु देत,
सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
4 सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे.
का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस
आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
5 देवा, लोक तुझी स्तुती करोत,
सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे.
आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
7 देव आम्हाला आशीर्वाद देवो
आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.
9 म्हणून परमेश्वर तुला त्याचे ज्ञान देईल. नंतर तुला चांगल्या न्यायाच्या आणि योग्य गोष्टी कळतील. 10 ज्ञान तुझ्या हृदयात येईल. आणि तुझा आत्मा ज्ञानामुळे आनंदित होईल.
11 ज्ञान तुझे रक्षण करील. आणि समज तुला सांभाळेल. 12 ज्ञान आणि समज तुला दुष्ट लोकांसारखे चुकीचे जीवन जगण्यापासून परावृत्त करतील. ते लोक बोलतानाही दुष्टपणा करतात. 13 त्यांनी चांगुलपणा सोडला आणि आता ते पापाच्या अंधकारात राहात आहेत. 14 त्यांना चूक करण्यात आनंद वाटतो. आणि त्यांना पापाचे वाईट मार्ग आनंदित करतात. 15 त्या लोकांवर विश्वास टाकणे शक्य नाही. ते खोटं बोलतात आणि फसवतात. पण तुझे ज्ञान आणि तुझी समज तुला या सर्व गोष्टींपासून दूर ठेवेल.
जक्कय
19 येशूने यरीहोत प्रवेश केला आणि यरीहोतून जात होता. 2 तेथे जक्कय या नावाचा मनुष्य होता. तो मुख्य जकातदार होता आणि खूप श्रीमंत होता. 3 येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता. परंतु गर्दीमुळे त्याला काही दिसेना, कारण तो बुटका होता. 4 तेव्हा तो सर्वांच्या पुढे पळत गेला आणि त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कारण तो त्याच रस्त्याने पुढे जाणार होता.
5 येशू जेव्हा त्या ठिकाणी आला तेव्हा वर पाहून जक्कय याला म्हणाला, “जक्कया त्वरा कर आणि खाली ये. कारण आज मला तुझ्याच घरी राहायचे आहे.”
6 मग तो घाईघाईने खाली उतरला आणि आनंदाने त्याचे स्वागत केले. 7 सर्व लोकांनी ते पाहिले, ते कुरकूर करु लागले. व म्हणू लागले की, “तो पापी माणसाचा पाहुणा होण्यास गेला आहे.”
8 परंतु जक्कय उभा राहिला व प्रभूला म्हणाला, “गुरुजी, जे माझे आहे त्यातील अर्धे मी गरिबांना दिले असे समजा व मी कोणाला फसवून काही घेतले असेल तर ते चौपट परत करीन.”
9 येशू त्याला म्हणाला, “आज या घराला तारण मिळाले आहे. कारण हा मनुष्यसुद्धा अब्राहामाचा पुत्र आहे. 10 कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधावयास व तारावयास आला आहे.”
2006 by World Bible Translation Center