Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तुतिगीत
67 देवा, मला दया दाखव, आणि आशीर्वाद दे.
कृपाकरुन आमचा स्वीकार कर!
2 देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो.
तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
3 देवा, लोक तुझी स्तुती करु देत,
सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
4 सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे.
का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस
आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
5 देवा, लोक तुझी स्तुती करोत,
सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे.
आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
7 देव आम्हाला आशीर्वाद देवो
आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.
6 परमेश्वर ज्ञान देतो. ज्ञान आणि समज त्याच्या मुखातून येते. 7 तो चांगल्या आणि प्रामाणिक माणसांना मदत करतो. सरळ मार्गावर चालणाऱ्या लोकांसाठी तो ढालीसारखा आहे. 8 जे लोक इतरांशी न्यायाने वागतात त्यांचे तो रक्षण करतो. त्याच्या पवित्र लोकांचे तो रक्षण करतो.
तीमथ्य पौल व सीला यांच्यासह जातो
16 पौल दर्बे व लुस्त्र या शहरांमध्ये गेला. तेथे रिव्रस्ताचा एक शिष्य ज्याचे नाव तीमथ्य, तो होता. तीमथ्याची आई एक यहूदी विश्वासणारी स्त्री होती. त्याचा पिता एक ग्रीक मनुष्य होता. 2 तीमथ्याविषयी लुस्त्र व इकुन्या येथील बंधुजनांचे फार चांगले मत होते. 3 तीमथ्याला आपल्याबरोबर प्रवासाला घेऊन जावे अशी पौताची इच्छा होती. पण त्या भागात राहणाऱ्या यहूदी लोकांना माहीत होते की, तीमथ्याचे वडील ग्रीक (यहूदीतर) आहेत. म्हणून पौलाने यहूदी लोकांचे समाधान होण्यांसाठी तीमथ्याची सुंता केली.
4 मग पौल व त्याच्याबरोबर असलेले लोक इतर शहरांमधून प्रवास करीत निघाले. यरुशलेममधील प्रेषितांनी व वडीलजनांनी दिलेले नियम व त्यावरचे निर्णय ते विश्वासणाऱ्यांना देत गेले. त्यांनी विश्वासणाऱ्यांना त्या नियमांचे पालन करण्यास सांगितले. 5 मग मंडळ्या विश्वासात भक्कम होत गेल्या व संख्येतदेखील त्या वाढत गेल्या.
पौलाला आशियातून बोलावतात
6 पौल व त्याच्याबरोबर असलेले बंधू फ्रुगिया व गलतीया या प्रदेशातून गेले. आशिया देशात पवित्र आत्म्याने त्यांना सुवार्ता सांगण्यास मना केले. 7 पौल व तीमथ्य मिसिया देशाच्या जवळ गेले. त्यांना बिथनीया प्रांतात जायचे होते. पण येशूच्या आत्म्याने त्यांना आत जाऊ दिले नाही. 8 म्हणून ते मिसियाजवळून जाऊन त्रोवस येथे गेले.
2006 by World Bible Translation Center