Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी तंतुवाद्यावरचे दावीदाचे स्तुतिगीत
67 देवा, मला दया दाखव, आणि आशीर्वाद दे.
कृपाकरुन आमचा स्वीकार कर!
2 देवा, पृथ्वीवरील प्रत्येक माणूस तुझ्या मार्गाविषयी समजून घेईल अशी मी आशा करतो.
तू लोकांना कसा तारतोस ते प्रत्येक देशाला बघू दे.
3 देवा, लोक तुझी स्तुती करु देत,
सर्व लोक तुझी स्तुती करु देत.
4 सगळ्या राष्ट्रांना हर्ष होऊ दे आणि ते सुखी होऊ दे.
का? कारण तू लोकांचा योग्य रीतीने न्याय करतोस
आणि तू प्रत्येक देशावर राज्य करतोस.
5 देवा, लोक तुझी स्तुती करोत,
सर्व लोक तुझी स्तुती करोत.
6 देवा, आमच्या देवा, आम्हाला आशीर्वाद दे.
आमची जमीन आम्हाला खूप पीक देवो.
7 देव आम्हाला आशीर्वाद देवो
आणि पृथ्वीवरील सर्व लोक देवाला घाबरोत आणि त्याला मान देवोत.
ज्ञानाचे ऐका
2 मुला, मी ज्या गोष्टी सांगतो त्याचा स्वीकार कर. माझ्या आज्ञा लक्षात ठेव. 2 ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. 3 ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव. 4 ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे. 5 जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.
पौल व बर्णबा वेगळे होतात
36 काही दिवसांनंतर पौलाने बर्णबाला सांगितले, “आपण पुष्कळ गावात प्रभूचा संदेश दिला. आपण पुन्हा या गावांमध्ये तेथील बंधुभगिनींना भेट देण्यासाठी आणि त्यांचे कसे काय चालले आहे हे पाहण्यासाठी जायला हवे.”
37 बर्णबाला त्याच्यासोबत योहान (मार्क) यालाही घ्यायचे होते. 38 पण ज्याने पंफुलिया येथे त्याची साथ सोडली व आपले काम पूर्ण केले नाही, त्याला आपल्यासोबत घेऊ नये असे पौलाचे म्हणणे होते 39 पौल आणि बर्णबा यांच्यात यावरुन मोठा वाद झाला. ते विभक्त झाले व वेगळ्या मार्गांनी गेले. बर्णबा योहानासह कुप्र येथे समुद्रमार्गे गेला.
40 पौलाने सीलाला आपल्यासोबत नेण्यासाठी निवडले. अंत्युखियातील बांधवांनी, पौलाला देवाच्या कृपेवर सोपवले आणि मग त्यांना रवाना केले. 41 पौल, सीरीया व किलकीया भागातील मंडळ्यांना स्थैर्य देत गेला.
2006 by World Bible Translation Center