Revised Common Lectionary (Semicontinuous)
धन्यवाद स्तोत्र.
100 हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा.
2 परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा.
परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या.
3 परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या.
त्यानेच आपल्याला निर्माण केले.
आपण त्याची माणसे आहोत.
आपण त्याची मेंढरे आहोत.
4 त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या.
त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या.
त्याला मान द्या.
त्याच्या नावाचा जयजयकार करा.
5 परमेश्वर चांगला आहे.
त्याचे प्रेम चिरंजीव आहे.
आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.
पवित्र वापरासाठी जमिनीची विभागणी
45 “ज्या वेळी इस्राएली वंशाच्या लोकांसाठी तुम्ही, चिठृ्या टाकून, जमिनीची वाटणी कराल, तेव्हा जमिनीचा काही भाग वेगळा काढाल तो परमेश्वराचा पवित्र भाग असेल. ती जमीन 25,000 हात (8.12 मैल) लांबीची व 20,000 हात (8.12 मैल) लांबीची व 20,000 हात (6.6 मैल) रुंदीची असेल. ती सर्व जमीन पवित्र असेल. 2 जमिनीचा 500 हाताचा (875 फूटाचा) चौरस हा मंदिरासाठी असेल. मंदिराभोवती 50 हात (87 फूट 6 इंच) रुंदीची मोकळी जागा असेल. 3 पवित्र प्रदेश 25,000 हात (8.3 मैल) लाब व 10,000 हात (3.3 मैल) रुंद असेल. मंदिर ह्याच भागात असेल. मंदिराची जागा अती पवित्र जागा मानली जाईल.
4 “परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराजवळ जाणाऱ्या, मंदिरात काम करणाऱ्या सेवकांसाठी, याजकासाठी हा जमिनीचा पवित्र भाग असेल. ती जागा याजकांची घरे व मंदिर यांच्यासाठी असेल. 5 जमिनीचा 25,000 हजार हाताचा (8.3 मैल लांबीचा) व 10,000 हात (3.3 मैल) रुंदीचा भाग हा मंदिरात सेवा करणाऱ्या लेवींसाठी असेल. लेवींची गावेसुद्धा याच भागात वसतील.
6 “गावासाठी तुम्ही 5,000 हात (1.6 मैल) रुंदीचा व 25,000 हजार हात (8.3 मैल) लांबची जागा द्याल. ती पवित्रे प्रदेशाच्या बाजूला असेल. इस्राएलच्या सर्व लोकांसाठी ही जागा असेल. 7 पवित्र प्रदेशाच्या आणि गावाच्या मालकीच्या जमिनीच्या बाजूची जमीन राजसाठी असेल. म्हणजेच पवित्र प्रदेश व गावाच्या मालकीची जमीन या दोन्ही मधील ही जमीन असेल. ती लोकांना दिलेल्या जमिनीएवढीच असेल. ती पश्र्चिमेच्या सीमेपासून पूर्वेच्या सीमेपर्यंत पसरलेली असेल. 8 ही जमीन म्हणजे राजाची इस्राएलमधील मालमत्ता असेल. त्यामुळे, यापुढे, राजा माझ्या लोकांना कष्ट देणार नाही उलट इस्राएलांना ते त्यांच्या वंशजांसाठी जमीन देईल.”
9 परमेश्वर, माझा प्रभू, पुढे म्हणतो, “इस्राएलच्या राजांनो, आता पुरे! लोकांशी क्रूरपणाने वागण्याचे सोडून द्या, लोकांची लुबाडणूक करु नका. न्यायाने वागा. सत्कृत्ये करा. माझ्या लोकांना सक्तीने घराबाहेर काढण्याचे सोडून द्या.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
यापो येथे पेत्र
32 पेत्र यरुशलेमच्या सभोवतालच्या गावामध्ये फिरला. लोद या गावामध्ये जे विश्वासणारे होते, त्यांना भेटला. 33 लोद येथे त्याला ऐनेयास नावाचा माणूस आढळला. त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. 34 पेत्र त्याला म्हणाला, “ऐनेयास. येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे. ऊठ, आपले अंथरुण नीट कर!” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. 35 लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनाच्या पठारावर राहणाऱ्यांनी त्याला पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.
2006 by World Bible Translation Center