Revised Common Lectionary (Semicontinuous)
118 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा.
त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
2 इस्राएल, म्हण
“त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे.
परमेश्वर मला वाचवतो.
15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता.
परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत.
परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
17 मी जगेन आणि मरणार नाही
आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
18 परमेश्वराने मला शिक्षा केली
परंतु त्याने मला मरु दिले नाही.
19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा.
मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि
केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता
तो कोनाशिला झाला.
23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे
आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे.
आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
17 पण सीसरा पळून गेला होता. तो हेबेरची बायको याएल हिच्या तंबूकडे आश्रयाला गेला. केनी हेबेर आणि हासोरचा राजा याबीन यांच्यात सलोख्याचे संबेध होते. म्हणून सीसरा तेथे गेला. 18 याएलने त्याला येताना पाहिले, तेव्हा त्याला भेटायला ती पुढे झाली व म्हणाली, “आत या, व निर्धास्त राहा.” सीसरा आत आला. तिने त्याच्यावर जाजम टाकून त्याला लपवले.
19 सीसरा याएलला म्हणाला, “मला खूप तहान लागली आहे. आधी मला थोडे पाणी प्यायला दे.” याएलने त्याला, चामड्याच्या बुधल्यात ती दूध भरुन ठेवत असे ते प्यायला दिले. मग तिने त्याला पुन्हा लपवले.
20 तो तिला म्हणाला, “तू तंबूच्या दारात जाऊन उभी राहा आणि ‘आत कोणी आहे का?’ असे कोणी विचारले तर ‘नाही’ म्हणून सांग.”
21 मग याएलने तंबू ठोकायची मोठी मेख व हातोडी घेतली. व हळूच त्याच्याजवळ गेली. सीसरा खूप थकून गाढ झोपला होता. तिने ती मेख त्याच्या कानशिलाजवळ ठेवून हातोडीने ठोकली. त्याच्या डोक्यातून ती आरपार घुसून पार जमिनीत रुतली. सीसरा मरण पावला.
22 तेवढ्यात सीसराला शोधत बाराक याएलच्या तंबूपाशी पोहोंचला. याएल त्याला पाहून बाहेर गेली व म्हणाली, “आत या तुम्हाला हवा असलेला माणूस मी दाखवते.” तेव्हा याएल बरोबर बाराक आत शिरला तेथे त्याला मेख मारलेल्या अवस्थेत मरुन पडलेला सीसरा दिसला.
23 त्या दिवशी परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी कनान्यांचा राजा याबीन याचा पराभव केला.
24 याएल ही केनी हेबेरची पत्नी सर्व
स्त्रियांमध्ये तिचा धन्यवाद होईल.
25 सीसराने पाणी मागितले
याएलने त्याला दूध दिले
राजाला साजेशा पात्रात
तिने त्याला साय दिली
26 मग याएलने आपला हात पुढे केला आणि तंबूची मेख घेतली.
कारागिराची हातोडी उजव्या हातात घेतली.
सीसरावर तिचा प्रयोग केला.
त्याच्या डोक्यावर आरपार घाव घातला.
27 याएलच्या पायांमध्ये तो कोसळला.
तो पडला तिथेच तो राहिला याएलच्या पायाशी
तो कोसळला तिथेच तो पडला.
तेथे तो आडवा झाला तिथेच गतप्राण झाला.
28 “सीसराच्या आईने खिडकीतून पाहिले आणि तिने आकांत केला.
सीसराची आई पडद्याआडून पाहू लागली
‘सीसराच्या रथाला एवढा उशीर का?
त्याच्या रथांचा आवाज कसा ऐकू येत नाही?’
29 “तिच्या चाणाक्ष दासीने,
होय दासीने, तिला उत्तर दिले.
30 ‘माझी खात्री आहे.
त्यांनी युध्द जिंकले.
आता ते पराभूत लोकांकडून लूट गोळा करत आहेत ती आपसात वाटून घेत आहेत.
प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत.
बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली.
होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे,
पराक्रमी सीसराला पांघरण्यासाठी.’
31 “परमेश्वरा, तुझ्या शत्रूंची अशीच अखेर होवो!
आणि तुझ्यावर प्रेम करणारे लोक उगवत्या सूर्याप्रमाणे उत्तरोत्तर सामर्थ्यवान होवोत!”
अशाप्रकारे त्या प्रदेशात चाळीस वर्षे शांतता नांदली.
स्त्री आणि प्रचंड साप
12 आणि मग एक अदभुत महान चिन्ह आकाशात दिसले. तेथे एक स्त्री होती. ती सूर्याचा पेहराव केलेली होती. चंद्र तिच्या पायाखाली होता. तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुगुट होता. 2 ती स्त्री गरोदर होती. ती (बाळाला) जन्म देणार असल्याने वेदनांनी ओरडली.
3 मग दुसरे एक चिन्ह आकाशात दिसले: तेथे फार मोठा तांबडा साप होता. त्या सापाला सात डोकी होती व त्या सातही डोक्यांवर एक एक मुगूट होता. त्या सापाला दहा शिंगे सुद्धा होती. 4 त्या सापाने आपल्या शेपटीच्या फटकाऱ्याने एक तृतीयांश तारे झटकून पृथ्वीवर खाली टाकून दिले. जी स्त्री बाळाला जन्म देणार होती त्या स्त्रीच्या समोर तो प्रचंड साप उभा राहिला. त्या सापाला त्या स्त्रीने जन्म दिलेल्या बाळाला खायचे होते.
5 त्या स्त्रीने एका मुलाला जन्म दिला. तो मुलगा लोखंडी दंडाने सर्व राष्ट्रांवर सत्ता चालविणार होता. तिच्या मुलाला देवाकडे व त्याच्या सिंहासनाकडे नेण्यात आले. 6 ती स्त्री देवाने तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या ठिकाणाकडे पळून गेली. तेथे त्या स्त्रीची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात येईल.
7 मग स्वर्गात एक युद्ध झाले. मीखाएल [a] आणि त्याचे दूत त्या प्रचंड सापाविरुद्ध लढले. साप व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. 8 पण साप तितका बलवान नव्हता. प्रचंड साप व त्याच्या दूतांना स्वर्गातील त्यांचे स्थान गमवावे लागले. 9 सापाला आकाशातून खाली फेकण्यात आले. तो प्रचंड साप, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला चकवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
10 मग मी आकाशातून एक मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, “तारण, सामर्थ्य, आमच्या देवाचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही आली आहेत. कारण आमच्या भावांना दोष लावणारा जो अहोरात्र आमच्या देवासमोर त्यांना शिव्याशाप देत होता, याला खाली फेकण्यात आले आहे. आमच्या देवासमोर तो आमच्या भावांवर दिवस आणि रात्र दोषारोप करीत होता, त्याचा 11 आमच्या भावांनी कोकऱ्याच्या रक्ताने आणि जे सत्य ते सांगत होते, त्या सत्याने पराभव केला. त्यांनी त्यांच्या जिवांवर अति प्रेम केले नाही. ते मरणाला भ्याले नाही, 12 म्हणून आकाशांनो, व जे तुम्ही तेथे राहता ते तुम्ही आनंदी असा. पण पृथ्वी व समुद्राचे वाईट होईल. कारण सैतान खाली तुमच्याकडे गेला आहे. तो रागाने भरलेला आहे. त्याला माहीत आहे की त्याच्याकडे जास्त वेळ नाही.”
2006 by World Bible Translation Center