Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी दावीदाचे स्तोत्र.
20 जेव्हा तुम्ही संकटात असाल तेव्हा परमेश्वर तुमच्या हाकेला धावून
येवो याकोबाचा देव तुमच्या नावाला महत्व प्राप्त करुन देवो.
2 देव त्याच्या पवित्र स्थानातून तुम्हाला मदत पाठवो.
तो तुम्हाला सियोनातून साहाय्य करो.
3 तुम्ही देवाला जे जे होमबली अर्पण केले
त्याची त्याला आठवण राहो तुमचे सर्व त्याग तो स्वीकारो.
4 तुम्हाला जे काही हवे ते देव तुम्हाला देवो.
तुमच्या सगळ्या योजना तो प्रत्यक्षात आणो.
5 देव तुम्हाला मदत करेल तेव्हा आम्हाला आनंद होईल.
देवाच्या नावाचा जयजयकार करु या तुम्ही परमेश्वराला जे जे काही मागाल
ते सर्व तो तुम्हाला देवो अशी मी आशा करतो.
6 परमेश्वर त्याने निवडलेल्या राजाला मदत करतो हे आता मला कळले.
देव त्याच्या पवित्र स्वर्गात होता आणि त्याने स्वत:च निवडलेल्या राजाला उत्तर दिले.
देवाने आपल्या महान सामर्थ्याचा राजाला वाचवण्यासाठी उपयोग केला.
7 काही लोक त्यांच्या रथांवर भरंवसा ठेवतात आणि काही आपल्या सैन्यांवर विश्वास ठेवतात
परंतु आम्ही परमेश्वराच्या, आमच्या देवाच्या नावावर विश्वास ठेवतो आणि त्याच्या नावाचा धावा करतो.
8 त्या दुसऱ्या लोकांचा पराभव झाला.
ते युध्दात मारले गेले परंतु आपण जिंकलो आपण विजयी झालो.
9 परमेश्वराने त्या निवडलेल्या राजाला वाचवले.
देवाने निवडलेल्या राजाने मदतीसाठी हाक मारली आणि देवाने उत्तर दिले.
योथामची कहाणी
7 हे वर्तमान योथामने ऐकले तेव्हा तो गेला आणि गरिज्जीम डोंगरावर उभा राहून मोठयाने लोकांशी बोलू लागला.
“शखेम नगरातील अधिकाऱ्यांनो ऐका. मग परमेश्वरही तुमचे ऐकेल.
8 “एक दिवस, आपल्याला कोणीतरी राजा असावा असे सर्व झाडांच्या मनात आले. तेव्हा जैतून वृक्षाला ती झाडे म्हणाली, ‘तू आमचा राजा हो.’
9 “जैतून वृक्ष त्यांना म्हणाला, ‘सर्व माणसे आणि परमेश्वर माझ्यापासून जे तेल मिळते त्यासाठी माझी स्तुती करतात. ते तेल करायचे सोडून मी नुसता इतर झाडांवर डोलत राहू काय?’
10 “मग ती झाडे अंजीराच्या झाडाकडे गेली व म्हणाली, ‘तू आमचा राजा हो.’
11 “पण अंजीराच्या झाडाने उत्तर दिले, ‘माझी गोड आणि रसाळ फळे करायचे थांबवून मी इतर झाडांवर डोलत राहायला जाऊ की काय?’
12 “तेव्हा ती झाडे द्राक्षवेलीकडे जाऊन म्हणाली, ‘तू आम्हावर राज्य कर.’
13 “पण द्राक्षवेलीने उत्तर दिले, ‘माझ्या द्राक्षरसामुळे माणसे, राजेलोक संतुष्ट होतात. ते करायचे सोडून मी इतर झाडांवर हालत डोलत राहू का?’
14 “शेवटी ती सर्व झाडे काटेरी झुडुपाकडे जाऊन म्हणाली, ‘तू ये आणि आम्हावर राज्य कर.’
15 “ते काटेरी झुडूप त्यांना म्हणाले, ‘तुम्हाला खरोखरच मला राजा करायचे असेल तर माझ्या सावलीत आश्रयाला या. तसे केले नाहीत तर काटेरी झुडुपातून अग्नि निघून तो लबानोनचे गंधसरु भस्मसात करील.’
ख्रिस्ताच्या शंत्रूंना अनुसरु नका
18 माझ्या मुलांनो, शेवट जवळ आला आहे आणि तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताही पुष्कळ ख्रिस्तविरोधी दिसू लागले आहेत. त्यामुळेच आम्हाला कळते की, शेवट जवळ आला आहे. 19 ते आमच्यातूनच बाहेर निघाले, पण ते खऱ्या अर्थाने आमच्यातील नव्हतेच, मी हे म्हणतो कारण जर ते खरेच आमच्यातील असते तर ते आमच्यात राहिले असते. पण ते गेले यासाठी की, त्यांना आम्हांला दाखवायचे होते की त्यांच्यातील कोणीच आमचा नव्हता.
20 पण जो पवित्र असा ख्रिस्त याने तुमचा आत्म्याने अभिषेक केला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना सत्य माहीत आहे. 21 मी तुम्हांला सत्य माहीत नाही म्हणून लिहीत नाही पण तुम्हांला ते माहीत आहे कारण सत्यापासून कोणतेच असत्य येत नाही.
22 येशू हा ख्रिस्त नाही असे म्हणणारा खोटा नाही काय? असा मनुष्य ख्रिस्तविरोधी आहे. तो पिता आणि पुत्र या दोघांनाही नाकारतो. 23 जो पुत्राचा नाकार करतो त्याला पिताही नसतो, पण जो पुत्राला मानतो त्याला पिताही असतो.
24 तुमच्या बाबतीत जे तुम्ही सुरुवातीपासून ऐकले आहे, त्यामध्येच राहा, सुरुवातीपासून जे तुम्ही ऐकले त्यात जर तुम्ही राहाल, तर तुम्ही पुत्रामध्ये व पित्यामध्ये राहाल. 25 आणि देवाने आम्हांला जे देण्याचे अभिवचन दिले आहे: ते म्हणजे अनंतकाळचे जीवन होय.
26 जे तुम्हाला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हांला या गोष्टी लिहीत आहे. 27 पण तुमच्याबाबतीत म्हटले तर, ज्या (पवित्र व्यक्तीकडून) तुम्हांला अभिषेक करण्यात आला तो तुमच्यामध्ये राहतो. म्हणून दुसऱ्या कोणी तुम्हांला शिकवावे याची गरज नाही. त्याऐवजी ज्या आत्म्यासह तुमचा अभिषेक (पवित्र व्यक्तीकडून) झाला या सर्व गोष्टीविषयी तो तुम्हांला शिकवितो आणि लक्षात ठेवा की, तो खरा आहे आणि खोटा मुळीच नाही. जसे त्याने तुम्हाला जे करण्यास शिकविले आहे तसे तुम्ही ख्रिस्तामध्ये राहा.
28 म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हांला दृढविश्वास मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही.
2006 by World Bible Translation Center