Revised Common Lectionary (Semicontinuous)
देव त्याच्या लोकांचे पुन्हा रक्षण करील
16 परमेश्वर समुद्रातून मार्ग काढील. त्याच्या लोकांकरिता खवळलेल्या पाण्यातून तो रस्ता तयार करील. देव म्हणतो, 17 “जे लोक रथ, घोडे व सैन्ये यांच्यानिशी माझ्याशी लढतात त्यांचा परा़भव होईल. ते पुन्हा उठणार नाहीत त्यांचा नाश होईल. पण त्यातील ज्योत मावळावी तसे ते नाहीसे होतील. 18 म्हणून आरंभी घडलेल्या गोष्टी आठवू नका. फार पूर्वी घडलेल्या गोष्टींचा विचार करू नका. 19 का? कारण मी आता नव्या गोष्टी घडवून आणीन. आता तुम्ही कोवळ्या रोपटयाप्रमाणे वाढाल. हे सत्य आहे, हे नक्कीच तुम्हाला माहीत आहे. मी खरोखरच वाळवंटातून रस्ता तयार करीन. कोरड्या भूमीवर नद्या निर्माण करीन. 20 हिंस्र पशुसुध्दा् माझे आभार मानतील. मोठे प्राणी आणि पक्षी मला मान देतील. मी जेव्हा वाळवंटात पाणी आणि कोरड्या जमिनीवर नद्या निर्माण करीन तेव्हा ते माझा आदर करतील. मी निवडलेल्या. माझ्या लोकांना पाणी मिळावे म्हणून मी हे करीन. 21 ह्या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील.
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
इतर देशांतील लोक म्हणतील,
“इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
तर आपण खूप आनंदी होऊ.
4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5 एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6 तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
4 जरी मला स्वतःला जगिक गोष्टींवर विश्वास ठेवण्यास जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला जगिक गोष्टीवर विश्वास ठेवण्यास कारण आहे असे वाटते. 5 तर मला अधिक वाटते. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो, तेव्हा माझी सुंता झाली. मी इस्राएल देशाचा आहे. बन्यामिन वंशाचा आहे. इब्री आईवडिलांपासून झालेला मी इब्री आहे. नियमशास्त्राच्या माझ्या दष्टिकोनाबद्दल म्हणाला तर मी परुशी आहे. 6 माझ्या आस्थेविषयी म्हणाल तर मी मंडळीचा छळ केला. नियमशास्त्राने ठरवून दिलेल्या नीतिमत्वाविषयी मी निर्दोष आहे.
7 त्याऐवजी जो मला लाभ होता तो आता मी ख्रिस्तासाठी नुकसान असे समजतो. 8 शिवाय माझ्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या विषयीच्या सर्वश्रेष्ठ ज्ञानामुळे मी इतर सर्व काही हानि समजतो. त्याच्यासाठी सर्व काही मी गमावलेले आहे. ख्रिस्ताला मिळविण्यासाठी मी सर्व काही कचरा समजतो. 9 आणि त्याला शोधण्यासाठी माझे नीतिमत्त्व नसताही म्हणजे नियमशास्त्रावर आधारित नव्हे, परंतु नीतिमत्व जे ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे प्राप्त होते ते देवापासून प्राप्त होणारे आणि विश्वासावर आधारित आहे. 10 मला ख्रिस्ताला जाणून घ्यायचे आहे आणि जेव्हा तो मरणातून पुन्हा उठला तेव्हा जे सामर्थ्य प्रगट झाले त्याचा अनुभव घ्यायचा आहे, मला त्याच्या दु:खसहनामध्ये सुद्धा त्याचा अनुभव घेण्यासाठी त्यात भाग घ्यायचा आहे आणि त्याच्या मरणाशी अनुरुप व्हायचे आहे. 11 या आशेने की, मला मृतांमधून पुनरुत्थान मिळावे.
ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न
12 हे असे नाही की मी अगोदरच बक्षिस मिळविले आहे किंवा अगोदरच परिपूर्ण झालो आहे. ज्या बक्षिसासाठी ख्रिस्त येशूने मला ताब्यात घेतले ते बक्षिस मिळविण्याचा मी प्रयत्न करतो. 13 बंधूंनो, ते मी मिळविले असे मानीत नाही, परंतु एक गोष्ट आहे की, जी करण्याचा मी निश्चय करतो, जे भूतकाळात आहे ते मी विसरतो, आणि ते माझ्यापुढे आहे ते मिळविण्याचा प्रयत्न करतो. 14 ख्रिस्त येशूमध्ये वरील पाचारण जे देवाचे बक्षीस त्या उद्दीष्टासाठी मी झटतो.
येशू आपल्या मित्रांबरोबर बेथानी येथे(A)
12 मग येशू वल्हांडण सणाच्या अगोदर सहा दिवस असताना बेथानीस आला. येशूने ज्याला मेलेल्यातून उठविले होते तो लाजर तेथे होता. 2 म्हणून तेथे त्यांनी त्याच्यासाठी संध्याकाळचे भोजन आयोजित केले. मार्था जेवण वाढत होती आणि लाजर त्यांच्याबरोबर जेवायला बसला होता. 3 तेव्हा मरीयेने अर्धा किलो शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या पायावर ओतले व आपल्या केसाने त्याचे पाय पुसले व सर्व घर त्या सुवासाने भरले.
4 पण त्याच्या शिष्यांपैकी एक, यहूदा इस्कर्योत ज्याने नंतर त्याचा विश्वासघात केला होता, त्याने विरोध केला. म्हणून तो म्हणाला, 5 “हे सुगंधी द्रव्य विकून आलेले पैसे गरिबांना का देण्यात आले नाहीत? ते तेल चांदीच्या तीनशे रुपयाच्या किमतीचे होते.” 6 गरिबांचा कळवळा आला म्हणून त्याने असे म्हटले नाही, तर तो चोर होता आणि त्याच्याजवळ पेटी होती व तिच्यात जे पैसे टाकण्यात येत, ते तो चोरून घेई म्हणून तो असे म्हणाला.
7 “तिला एकटे सोडा,” येशूने उत्तर दिले, “मला पुरण्याच्या दिवसासाठी ते तेल राखून ठेवण्यात आले. 8 तुमच्यात गरीब नेहमीच असतील, पण मी तुमच्यात नेहमी असणार नाही.”
2006 by World Bible Translation Center