Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
इतर देशांतील लोक म्हणतील,
“इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
तर आपण खूप आनंदी होऊ.
4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5 एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6 तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
देव नेहमीच त्याच्या लोकांबरोबर असतो
43 याकोबा, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्राएला, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, “भिऊ नकोस मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे. तू माझा आहेस. 2 जेव्हा तू अडचणीत असतोस, तेव्हा मी तुझ्या पाठीशी असतो. जेव्हा तू नद्या ओलांडशील तेव्हा इजा होणार नाही. आगीमधून चालताना तुला भाजणार नाही. ज्वाळा तुला पोळणार नाहीत. 3 का? कारण मी स्वतः तुझा परमेश्वर आहे. मी, इस्राएलचा पवित्र देव तुझा तारणहार आहे. मी तुझ्या मोबदल्यात मिसर देश दिला. तुला माझा करण्यासाठी मी इथिओपिआ व सेबा यांचे दान केले. 4 तू माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहेस. म्हणून मी तुझा आदर करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो. तुझ्यासाठी मी सर्व लोक आणि सर्व राष्ट्रे दान करीन.
5 “म्हणून घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझ्या सर्व मुलांना गोळा करून तुझ्याकडे आणीन, मी त्यांना पूर्व आणि पश्चिम दिशेकडून गोळा करीन. 6 मी उत्तरेला म्हणेन: माझे लोक मला परत दे. मी दक्षिणेला सांगेन, माझ्या लोकांना तुरूंगात ठेवू नको. दूरदूरच्या ठिकाणांहून माझ्या मुलांमुलींना माझ्याकडे परत आण. 7 जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत.”
तीमथ्यी व एपफ्रदीत यांच्याविषयी बातमी
19 पण मला आशा आहे, प्रभु येशूच्या साहाय्यने मी लवकरच तीमथ्यीला तुमच्याकडे पाठवीन यासाठी की, तुमच्याविषयीच्या बातमीने मला उत्तेजन मिळावे. 20 तोच एक आहे ज्याला पाठविण्याची माझी इच्छा आहे कारण माझ्यासारख्याच भावना असणारा दुसरा कोणी माझ्याजवळ नाही आणि त्याला तुमच्या कल्याणाची मनापासून कळकळ आहे. 21 सर्व जण त्यांच्या हिताकडेच लक्ष देतात व ख्रिस्ताच्या हिताकडे लक्ष देत नाहीत. 22 आणि तुम्हांला त्याचा स्वभाव माहीत आहे, सुवार्ता वाढविण्यासाठी जसे मुलगा पित्याची सेवा करतो तशी त्याने त्याच्या योग्यतेने माझ्याबरोबर सेवा केली आहे. 23 त्याला तुमच्याकडे पाठविण्याविषयी मी आशा करीत आहे. माझ्याबाबतीत काय होते ते कळताच त्याला तुमच्याकडे पाठविन. 24 आणि माझा असा विश्वास आहे की, देवाच्या साहाय्याने मला स्वतःलासुद्धा तुमच्याकडे येणे लवकरच शक्य होईल.
2006 by World Bible Translation Center