Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र तो यहुदाच्या रानात होता त्या वेळचे
63 देवा, तू माझा देव आहेस
आणि तू मला खूप हवा आहेस.
माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,
बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले.
मी तुझी शक्ती आणि तुझे गौरव पाहिले.
3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे.
माझे ओठ तुझी स्तुती करतात.
4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन
तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन,
आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल,
मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
7 तू मला खरोखरच मदत केली आहेस.
तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो
आणि तू माझा हात धरतोस.
इस्राएल देवाचे नंदनवन
5 मी माझ्या मित्रासाठी (देवासाठी) गाणे गाईन. हे गाणे, माझ्या मित्राच्या द्राक्षमळ्याच्या (इस्राएलच्या) प्रेमासंबंधी असेल.
माझ्या मित्राचा द्राक्षमळा अतिशय
सुपीक जमिनीत होता.
2 माझ्या मित्राने खणून जमीन साफसूफ केली.
तिच्यामध्ये अतिशय उत्तम प्रतीच्या द्राक्षाची लागवड केली.
त्याने मळ्याच्या मध्यभागी
एक मनोरा बांधला.
द्राक्षाचे उत्तम पीक येईल अशी त्याला आशा होती
पण त्यातून निकृष्ट प्रतीचीच फळे आली.
3 म्हणून देव म्हणाला, “यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनो व यहूदात राहणाऱ्या लोकांनो,
माझा आणि माझ्या द्राक्षमळ्याचा जरा विचार करा.
4 माझ्या द्राक्षमळ्यासाठी मी आणखी काय करू शकलो असतो?
मला जे करणे शक्य होते ते सर्व मी केले
मी चांगल्या पिकाची आशा केली
पण पीक वाईट आले.
असे का झाले?
5 “आता मी माझ्या द्राक्षमळ्याचे काय करणार आहे
ते तुम्हाला सांगतो.
मळ्याच्या संरक्षणासाठी लावलेले काटेरी कुंपण काढून
मी जाळून टाकीन.
त्याच्या आवाराची दगडी भिंत फोडून
दगड पायाने तुडवीन.
6 मी माझा द्राक्षमळा उजाड करीन.
कोणीही वेलीची काळजी घेणार नाही.
कोणीही त्या मळ्यात काम करणार नाही.
त्यात तण व काटेकुटे माजतील.
तेथे पाऊस न पाडण्याची मी ढगांना आज्ञा करीन.”
7 सर्वशक्तिमान परमेश्वराच्या मालकीचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएल हा देश होय. ज्या द्राक्षवेली परमेश्वराला प्रिय आहेत त्या म्हणजे यहुदी लोक होत.
परमेश्वराने न्यायाची आशा केली
पण तेथे फक्त हत्याच घडली.
परमेश्वराने प्रामाणिकपणाची आशा धरली
पण तेथे फक्त वाईट रितीने वागविलेल्या लोकांचे आक्रोश होते.
दोन प्रकारची फळे(A)
43 “कोणतेही चांगले झाड असे नाही की जे वाईट फळ देते, किंवा कोणतेही वाईट झाड असे नाही की जे चांगले फळ देते. 44 कारण प्रत्येक झाड हे त्याच्या फळावरुन ओळखले जाते. लोक काटेरी झुडुपातून अंजिरे गोळा करीत नाहीत तसेच काटेरी झुडुपातून ते द्राक्षे गोळा करीत नाहीत. 45 चांगला मनुष्य त्याच्या अंतःकरणात ज्या चांगल्या गोष्टी साठविलेल्या असतात त्याच काढतो आणि दुष्ट मनुष्य त्याच्या अंतःकरणात जे वाईट आहे तेच बाहेर काढतो. कारण मनुष्याच्या अंतःकरणात जे असते तेच तो मुखाद्वारे बोलतो.
2006 by World Bible Translation Center