Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तोत्र तो यहुदाच्या रानात होता त्या वेळचे
63 देवा, तू माझा देव आहेस
आणि तू मला खूप हवा आहेस.
माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क,
बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
2 होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले.
मी तुझी शक्ती आणि तुझे गौरव पाहिले.
3 तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे.
माझे ओठ तुझी स्तुती करतात.
4 होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन
तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन.
5 चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन,
आणि माझे तोंड तुझी स्तुती करील.
6 अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल,
मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
7 तू मला खरोखरच मदत केली आहेस.
तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे.
8 माझा आत्मा तुला धरुन ठेवतो
आणि तू माझा हात धरतोस.
19 मग नबुखद्नेस्सराला खूप राग आला. त्याने शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्याकडे तुच्छतेने पाहिले. त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट तापविण्याची आज्ञा दिली. 20 मग नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्यातील काही बलवान सैनिकांना शद्रख, मेशख व अबेद्नगो यांना बांधण्याचा हुकूम केला आणि त्यांना त्या तिघांना तापलेल्या भट्टीत टाकायला सांगितले.
21 मग त्या तिघाना बांधून भट्टीत टाकण्यात आले. त्यानी अंगरखे, विजारी, टोप्या आणि इतर कपडे घातलेले होते. 22 राजा हुकूम देतेवेळी अतिशय रागावला असल्याने त्यांनी घाईघाईन भट्टी तापविली भट्टीची आच एवढी होती की तिच्या ज्वाळांनी बलवान सैनिक मेले. शद्रख मेशख, व अबेद्नगो यांना टाकण्यासाठी ते भट्टीजवळ गेले तेव्हाच ते ज्वाळांनी भाजून मेले. 23 शद्रख, मेशख, अबेद्नगो भट्टीत पडले. त्यांना अगदी घट्ट बांधले होते.
24 मग नबुखद्नेस्सरने एड्ढदम उडी मारली. तो आश्चर्यचकीत झाला. त्याने आपल्या सल्लागारांना विचारले, “आपण तिघांनाच बांधले आणि तिघांनाच भट्टीत टाकले खरे ना?”
सल्लागार उत्तरले, “हो महाराज!”
25 मग राजा म्हणाला, “पाहा! मला अग्नीमध्ये चार माणसे चालताना दिसतात. ते बांधलेले नाहीत व जळलेलेही नाहीत. चौथा देवदूताप्रमाणे [a] दिसत आहे.”
26 मग नबुखद्नेस्सर तापलेल्या भट्टीच्या तोंडाजवळ गेला. तो ओरडला, “शद्रख, मेशख, अबेद्नगो, बाहेर या. परात्पर देवाच्या सेवकांनो, इकडे या.”
मग ती तिघे आगीतून बाहेर आले. 27 ते बाहेर येताच, प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राजाचे सल्लागार राज्यपाल ह्यांनी त्यांच्याभोवती गर्दो केली. आगीने शद्रख, मेशख व अबेद्नगो जळाले नाही हे त्यांनी पाहिले होते. त्याचे अंग, केस किंवा वस्त्रे काहीच जळाले नव्हते. एवढेच नव्हे तर ते आगीत असूनसुध्दा त्यांच्या अंगाला जळकट वास येत नव्हता.
28 मग नबुखद्नेस्सर म्हणाला शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्या देवाचे स्तवन करा.त्याने देवदूताला पाठवून आपल्या सेवकांचे आगीपासून रक्षण केले. ह्या तिघांनी आपल्या देवावर निष्ठा ठेवली त्यांनी माझा हुकूम मानला नाही आणि दुसऱ्या दैवताला भजण्या-पूजण्याऐवजी ते मरण्यास तयार झाले. 29 म्हणून मी आता असा नियम करतो की शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्या देवाच्याविरुध्द बोलणाऱ्याचे मग तो कोठल्याही राष्ट्राचा वा कोठलीही भाषा बोलणारा असो, तुक़डे तुकडे करण्यात येतील. व त्याच्या घराची राखरांगोळी करण्यात येईल. दुसरा कोठलेही दैवत आपल्या माणसांना असे वाचवू शकणार नाही. 30 मग राजाने त्या तिघांना बाबेल परगण्यात आणखी महत्वाची पदे दिली.
स्मुर्णा येथील मंडळीला
8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही:
“जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जीवनात आला.
9 “मला तुमचे क्लेश आणि गरीबी माहीत आहे. तरीही तुम्ही श्रीमंत आहात! ज्या वाईट गाष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते नाहीत, ते सैतानाची सभा आहेत. 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरु नकोस. मी तुला सांगतो, तुम्हांपैकी काहींना तुमची परीक्षा पाहण्यासाठी सैतानाकडून तुरुंगात टाकतील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हांला जीवनाचा मुगुट देईन.
11 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवितो त्याला दुसऱ्या मरणाची इजा होणारच नाही.
2006 by World Bible Translation Center