Revised Common Lectionary (Semicontinuous)
स्मरण दिवसाचे दावीदाचे स्तोत्र.
38 परमेश्वरा, तू माझ्यावर टीका करतोस तेव्हा रागावू नकोस
तू मला वळण लावतोस तेव्हा क्रोधित होऊ नकोस.
2 परमेश्वरा, तू मला इजा केलीस
तुझे बाण माझ्या शरीरात खोलवर रुतले आहेत.
3 तू मला शिक्षा केलीस. आता माझे सर्व शरीर दुखत आहे.
मी पाप केले आणि तू मला शिक्षा केलीस.
त्यामुळे माझी सर्व हाडे दुखत आहेत.
4 मी दुष्कृत्य करण्याचा अपराध केला आहे
आणि तो अपराध माझ्या खांद्यावर खूप मोठे ओझे असल्यासारखा आहे.
5 मी मूर्खपणा केला आता
मला दुर्गंधीयुक्त जखमांनी पछाडले आहे.
6 मी धनुष्यासारखा वाकलो आहे
आणि मी दिवसभर उदास असतो.
7 मला ताप आला आहे
आणि माझे सर्वशरीर दुखत आहे.
8 मी फार अशक्त झालो आहे
मी वेदनांमुळे कण्हत आहे आणि ओरडत आहे.
9 प्रभु तू माझे ओरडणे ऐकलेस माझे
उसासे तुझ्यापासून लपून राहिले नाहीत.
10 माझे हृदय धडधडत आहे.
माझी शक्ती निघून गेली आहे
आणि माझी दृष्टीही जवळ जवळ गेलेली आहे.
11 माझ्या आजारपणामुळे माझे मित्र
आणि शेजारी मला भेटायला येत नाहीत.
माझे मित्र आप्तही माझ्याजवळ येत नाहीत.
12 माझे शत्रू माझ्याविषयी वाईट बोलतात.
ते असत्य आणि अफवा पसरवीत आहेत.
ते सदैव माझ्याबद्दलच बोलत असतात.
13 परंतु मी काहीही ऐकू न येणाऱ्या बहिऱ्यामाणसासारखा आहे.
मी बोलू न शकणाऱ्या मुक्यामाणसासारखा आहे.
14 लोक ज्याच्याबद्दल वाईल बोलतात परंतु त्याला मात्र ते ऐकू येत नाही अशा माणसासारखा मी आहे.
मी वादविवाद करुन माझे शत्रू चूक आहेत हे सिध्द करु शकत नाही.
15 म्हणून परमेश्वरा तू माझा बचाव कर.
देवा, तूच माझ्यावतीने बोल.
16 मी जर काही बोललो तर माझे शत्रू मला हसतील.
मी आजारी आहे हे ते बघतील आणि मला चुका केल्याची शिक्षा मिळत आहे असे म्हणतील.
17 मी चूक केल्याबद्दल अपराधी आहे.
हे मला माहीत आहे मला माझे दु:ख विसरता येत नाही.
18 परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले.
मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.
19 माझे शत्रू जिंवत आहेत व निरोगी आहेत
आणि त्यांनी (माझ्याबद्दल) बरेच खोटेनाटे सांगितले आहे.
20 माझे शत्रू माझ्याविरुध्द वाईट गोष्टी करतात
आणि मी मात्र त्यांच्यासाठी चांगल्या गोष्टी केल्या.
मी केवळ सत्कर्म करण्याचा प्रयत्न केला
परंतु ते लोक माझ्यावर उलटले.
21 परमेश्वरा, मला सोडू नकोस.
देवा माझ्याजवळ राहा.
22 लवकर ये आणि मला मदत कर.
माझ्या देवा मला वाचव!
चुकून घडलेली वेगळी पापे
5 “एखाद्याने इतरांस सांगण्यासारखी सूचना ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहीत असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;
2 “किंवा कोणी अशुद्ध वस्तूला किंवा मेलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला वा अशुद्ध सरपटणाऱ्या गोष्टींना जरी न कळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तरीही तो दोषी ठरेल.
3 “माणसाच्या आंतून बाहेर पडणाऱ्या स्राव इत्यादि अनेक गोष्टी अशुद्ध असतात; एखादा माणूस दुसऱ्या माणसाच्या अशा अशुद्ध गोष्टीला न कळत शिवला व आपण अशुद्ध झालो आहो असे त्याला नंतर कळाले तर तो दोषी ठरेल.
4 “किंवा एखादी बरी किंवा वाईट गोष्ट करण्यासंबंधी कोणी घाईघाईने शपथ घेतली आणि नंतर ती पूर्ण करण्यास तो विसरला; परंतु नंतर त्याला ती आठवली तर आपली शपथ पूर्ण न केल्यामुळे तो दोषी होईल. 5 तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी; 6 आणि केलेल्या पापाबद्दल परमेश्वरासमोर त्याने दोषार्पण म्हणून मेंढी आणावी; आणि मग याजकाने त्या माणसाच्या पापाबद्दल प्रायश्चित करावे.
7 “त्याला कोंकरु देण्याची ऐपत नसेल तर आपण केलेल्या पापाबद्दल त्याने दोषार्पण म्हणून दोन होले किंवा पारव्याची दोन पिले परमेश्वरासमोर आणावी; त्यापैकी एकाचे पापार्पण व दुसऱ्याचे होमार्पण करावे. 8 त्याने ती याजकापाशी आणावी; मग याजकाने पहिल्याने त्यातील पापार्पण अर्पावे; त्याने पक्ष्याची मुंडी मुरगाळून मोडावी परंतु त्याचे दोन भाग करु नयेत. 9 पापार्पणाचे काही रक्त वेदीच्या भोंवती शिंपडावे व बाकीचे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे; हे पापार्पण होय. 10 मग याजकाने दुसऱ्या पक्ष्याचा विधीप्रमाणे होम करावा; ह्याप्रमाणे त्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या माणसाकरिता प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील.
11 “जर दोन होले किंवा पारव्याची दोन पिले देखील देण्याची त्याला ऐपत नसेल तर आपल्या पापाबद्दल त्याने एका एफाचा दहावा भाग मैदा त्याचे पापार्पण म्हणून आणावा; ते पापार्पण असल्यामुळे त्याने त्यावर तेल घालू नये किंवा त्याच्यावर धूप ठेवू नये. 12 त्याने तो मैदा याजकाकडे आणावा आणि याजकाने त्याच्यातून मूठभर मैदा घेऊन त्याचा स्मारक भाग म्हणून परमेश्वराकरिता होम करावा; हे पापार्पण होय. 13 अशा प्रकारे याजकाने त्याच्यासाठी प्रायश्चित करावे; आणि मग देव त्याला क्षमा करील; अन्नार्पणाप्रमाणे पापार्पणाचा उरलेला मैदा याजकाचा होईल.”
पाप आणि क्षमादान(A)
17 येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “ज्या गोष्टी लोकांना देवापासून दूर नेतात त्या येणे निश्चित आहे, परंतु ज्याच्यामुळे त्या येणार त्याची वाईट दशा होवो! 2 त्याने या लहानातील एकाला पाप करावयास लावण्यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्याला समुद्रात फेकणे हे त्याच्यासाठी अधिक बरे होईल. 3 स्वतःकडे लक्ष द्या!
“जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्याला धमकावा. आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्याची क्षमा करा. 4 जर तो तुझ्याविरुद्ध दिवसातून सात वेळा पाप करतो आणि सात वेळा तुमच्याकडे येतो व म्हणतो, ‘मी पश्चात्ताप करतो,’ त्याला क्षमा करा.”
2006 by World Bible Translation Center