Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
यशया 6:1-8

देव यशयाला संदेष्टा होण्यास बोलावतो

उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते. देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत. ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते. त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले.

मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द् नाहीत. [a] तरीसुध्दा् राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.”

तेथे वेदीवर अग्नी प्रज्वलित केलेला होता एका सराफ देवदूताने चिमट्याने त्यातील निखारा उचलला. सराफ देवदूत तो निखारा घेऊन माझ्याकडे उडत आला. त्या निखांऱ्याचा स्पर्श त्याने माझ्या तोंडाला केला नंतर तो देवदूत म्हणाला, “हे बघ! ह्या निखाऱ्याच्या स्पर्शाने तुझी सर्व दुष्कृत्ये नाहिशी झाली आहेत. तुझी पापे आता पुसली गेली आहेत.”

नंतर मला माझ्या परमेश्वराचा आवाज ऐकू आला. परमेश्वर म्हणाला, “मी कोणाला पाठवू! आमच्यासाठी कोण जाईल?”

मग मी म्हणालो, “हा मी तयार आहे, मला पाठव.”

यशया 6:9-13

नंतर परमेश्वर म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांग: ‘काळजीपूर्वक ऐका पण समजून घेऊ नका. काळजीपूर्वक पाहा पण शिकू नका.’ 10 लोकांना गोंधळात टाक, लोक जे ऐकतील आणि पाहतील ते त्यांना समजणार नाही असे कर. तू असे केले नाहीस तर कदाचित् लोक जे कानांनी ऐकतील आणि डोळ्यांनी पाहतील, तेच खरे समजतील. असे जर झाले तर ते मला शरण येतील आणि बरे होतील.”

11 नंतर मी विचारले, “प्रभू, मी हे असे किती दिवस करू?”

परमेश्वर उत्तरला, “लोक पळून जाऊन शहरे निर्जन होईपर्यंत, आता भरलेली घरे निर्मनुष्य होईपर्यंत, किंबहुना ही सर्व भूमी उजाड व वैराण होईपर्यंत तू असे कर.”

12 परमेश्वर लोकांना दूर पळवून लावील ह्या देशात खूप मोठी ओसाड जमीन तयार होईल. 13 पण लोकसंख्येचा दहावा हिस्सा ह्या भूमीवर राहतील. त्यांचा नाश होणार होता तरीही ते परमेश्वराकडे परत येतील. हे लोक एलाच्या झाडाप्रमाणे असतील. एलाचे झाड कापले तरी बुडखा शिल्लक राहतोच. हे राहिलेले लोक त्या बुडख्याप्रमाणे असतील. हे लोक खास बीज म्हणजेच देवाची लाडकी लेकरे असतील.

स्तोत्रसंहिता 138

दावीदाचे स्तोत्र.

138 देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो.
    मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन.
देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो.
    मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो.
तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस.
    आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.
देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली
    आणि तू मला होकार दिलीस.
    तू मला शक्ती दिलीस.

परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील
    तेव्हा ते तुझी स्तुती करतील.
ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील
    कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे.
देव फार म्हत्वाचा आहे पण तो दुबळ्यालोकांचा कैवारी आहे
    गर्विष्ठ लोक काय करतात ते देवाला माहीत आहे
परंतु तो त्यांच्यापासून दूर राहातो.
देवा, मी जर संकटात सापडलो तर मला जिवंत ठेव.
    जर माझे शत्रू माझ्यावर रागावले तर त्यांच्यापासून माझे रक्षण कर.
परमेश्वरा, तू कबूल केलेल्या वस्तू मला दे.
    परमेश्वरा, तुझे खरे प्रेम सदैव असते.
    परमेश्वरा, तू आमची निर्मिती केलीस, आता आम्हाला सोडू नकोस.

1 करिंथकरांस 15:1-11

ख्रिस्ताविषयीची सुवार्ता

15 आता बंधूंनो, मला तुम्हाला आठवण करुन द्यावीशी वाटते, की ज्या सुवार्तेविषयी मी तुम्हाला उपदेश केला व जी तुम्हीसुद्धा स्वीकारलीत व जिच्यात तुम्ही बळकट आहात. आणि जिच्यामुळे तुमचे तारण झाले आहे. ज्या वचनाने मी तुम्हांस सुवार्ता सांगितली ते तुम्ही दृढ धरता तर तुम्ही विश्वास धरल्याशिवाय काही उपयोग नाही, नाहीतर तुमची स्वीकृती व्यर्थ आहे.

कारण मलासुद्धा पहिल्यांदा जे मिळाले ते मी तुमच्या स्वाधीन केले: ते हे की ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, हे जे वचनात लिहिले आहे. व त्याला पुरण्यात आले. व तिसऱ्या दिवशी त्याला उठविण्यात आले. व तो पेत्राला दिसला, नंतर बारा प्रेषितांना, नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत. नंतर तो याकोबाला दिसला, मग पुन्हा तो सर्व प्रेषितांना दिसला. आणि शेवटी मी जो अवेळी जन्मलो, त्या मलासुद्धा तो दिसला.

कारण प्रेषितांमध्ये मी कनिष्ठ आहे, मी प्रेषित म्हणून घेण्याच्यासुद्धा योग्यतेचा नाही, कारण देवाच्या मंडळीचा मी छळ केला. 10 पण देवाच्या दयेने मी जो आहे तो मी (प्रेषित) आहे. आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक काम मी केले आहे, करणारा मी नव्हतो, तर देवाची दया जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती. 11 म्हणून, जरी मी तुम्हांला उपदेश केला किंवा त्यांनी उपदेश केला, तरी आम्ही सर्व हाच उपदेश करु, आणि तुम्ही यावरच विश्वास ठेवला.

लूक 5:1-11

पेत्र, याकोब आणि योहान येशूच्या मागे जातात(A)

मग असे झाले की, लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली होती व ते देवाचे वचन ऐकत होते आणि तो गनेसरेत सरोवराच्या काठी उभा होता, तेव्हा त्याने सरोवरातील दोन होड्या पाहिल्या, पण होड्यातील कोळी बाहेर गेले होते व त्यांची जाळी धूत होते. त्यातील, शिमोनाच्या होडीवर येशू चढला आणि त्याने ती होडी किनाऱ्यापासून थोडी दूर नेण्यास सांगितले. नंतर तो होडीत बसला व लोकांना शिक्षण देऊ लागला.

जेव्हा त्याने बोलणे संपविले, तेव्हा तो शिमोनाला म्हणाला, “खोल पाण्यात होडी ने आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड.”

शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी आपण सांगत आहात म्हणून मी जाळे खाली सोडतो.” जेव्हा त्यांनी तसे केले तेव्हा त्यांच्या जाळ्यात भरपूर मासे लागले. पण त्यांचे जाळे तुटू लागल्याने त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या जोडीदारांना मदत करण्यासाठी बोलाविले. ते आले आणि त्यांनी इतके मासे भरले की, दोन्ही होड्या बुडु लागल्या.

8-9 शिमोन पेत्राने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो येशूच्या पाया पडला आणि म्हणाला, “प्रभु, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे!” तो असे म्हणाला कारण तो आणि त्याच्या साथीदारांना इतके मासे मिळाले होते की, हे कसे झाले म्हणून ते आश्चर्यात पडले. 10 जब्दीचे पुत्र याकोब व योहान हे ही त्यांच्याप्रमाणे आश्चर्यचकित झाले होते. ते शिमोनाचे भागीदार होते.

मग येशू शिमोनाला म्हणाला, “भिऊ नको. कारण येथून पुढे तू माणसे धरशील.”

11 त्यांनी त्यांच्या होड्या किनाऱ्याला आणल्या, नंतर त्यानी सर्व काही सोडले आणि त्याच्यामागे गेले.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center