Revised Common Lectionary (Semicontinuous)
106 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या.
देवाचे प्रेम सदैव राहील.
2 परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही.
देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
3 जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात ते सुखी असतात.
ते लोक सदैव चांगली कृत्ये करतात.
4 परमेश्वरा, तू जेव्हा तुझ्या माणसांशी दयाळू असतोस तेव्हा माझी आठवण ठेव.
मलाही वाचवायचे आहे हे लक्षात ठेव.
5 परमेश्वरा, तू तुझ्या माणसांसाठी
ज्या चांगल्यागोष्टी करतोस त्यांत मला वाटेकरी होऊ दे.
मला तुझ्या माणसांबरोबर आनंदी होऊ दे.
मला ही तुझ्या माणसांबरोबर तुझा अभिमान वाटू दे.
6 आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले.
आम्ही चुकलो.
आम्ही दुष्कृत्ये केली.
7 परमेश्वरा, मिसरमधले आमचे पूर्वज
तू केलेल्या चमत्कारांपासून काहीही शिकले नाहीत.
ते लाल समुद्राजवळ होते तेव्हा
आमचे पूर्वज तुझ्याविरुध्द गेले.
8 परंतु देवाने आमच्या पूर्वजांचा उध्दार केला तो केवळ त्याच्या नावा खातर,
देवाने त्याची महान शक्ती दाखविण्यासाठी त्यांना वाचवले.
9 देवाने आज्ञा केली आणि लाल समुद्र कोरडा झाला.
देवाने आमच्या पूर्वजांना खोल समुद्रातून वाळवंटासारख्या कोरड्या प्रदेशात नेले.
10 देवाने आमच्या पूर्वजांना त्यांच्या शत्रूंपासून वाचवले.
देवाने त्यांची त्यांच्या शत्रूंपासून सुटका केली.
11 देवाने त्यांच्या शत्रूंना समुद्रात झाकून टाकले.
शत्रूंपैकी एकही जण सुटू शकला नाही.
12 नंतर आमच्या पूर्वजांचा देवावर विश्वास बसला.
त्यांनी त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली.
12 “ऊठ दबोरा,
जागी हो, गाणे म्हण!
बाराका ऊठ,
अबीनवामाच्या मुला शत्रूंना बंदिवान कर.
13 “उरलेल्या मानकऱ्यांनो आता आपल्या नेत्यांकडे जा.
परमेश्वराचे लोकहो, तुम्ही माझ्यासाठी सैनिकांबरोबर जा.
परमेश्वराने इस्राएलच्या वीरांना विजय मिळवून दिला.
इस्राएलमधील जिवंत राहिलेले लोक बलवान लोकांवर विजयी झाले.
14 “अमालेकच्या डोंगराळ प्रदेशातून एफ्राइमचे लोक आले.
हे बन्यामीन तुमच्या पाठोपाठ ते आले
माखीरच्या वंशातूनही सेनापती आले.
जबुलूनच्या लोकांतील सरदार तांब्याचा अधिकारदंड घेऊन आले.
15 इस्साखारच्या नेत्यांचा दबोराला पाठिंबा होता.
तसेच ते बाराकशीही प्रामाणिक होते.
ते खोऱ्यात पायी चालत आले.
“रऊबेनी, तुमच्याही सैन्यात अनेक शूर सैनिक आहेत.
16 मग तुमच्या मेंढवाड्याच्या कुंपणाजवळ [a] बसून का राहिलात?
शूर रऊबेनी टोळीच्या सैनिकांनी युध्दाचा गांभीर्याने विचार केला.
पण तरी शेव्व्यामेंढ्यांसाठी वाजवलेला पावा ऐकत ते घरीच थांबले.
17 गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले.
आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलबतांजवळ नुसते बसून का राहिलात?
आशेर लोक समुद्रकाठी,
सुरक्षित बंदरात तळ ठोकून राहिले.
18 “पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युध्दात प्राणांची
पर्वा न करता पराक्रम केला.
19 कनानी राजेही लढाईत उतरले.
कनानच्या राजांनी तनाखमध्ये,
मगिद्दोच्या जलाशयाजवळ लढाई केली.
पण कोणतीही लूट बरोबर घेऊन ते गेले नाहीत.
20 स्वर्गातून आकाशातील तारे आपल्या
कक्षेतून सीसराशी लढले.
21 किशोन या प्राचीन नदीने सीसराच्या
सैन्याला वाहून नेले.
चला, प्राणपणाने झुंजू या.
आता आपल्याला अनंतकाळचे जीवन आहे
13 जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हाला अनंतकाळचे जीवन आहे, याविषयी तुम्ही निश्र्चिंत असावे, 14 आणि आम्हांला देवामध्ये खात्री आहे की, जेव्हा आम्ही एखाद्या गोष्टीसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे प्रार्थना करतो, तेव्हा तो आमचे ऐकतो. 15 आणि आम्हांला हे माहीत आहे की जर तो आमचे ऐकतो, तर कोणत्याही कारणासाठी जरी आम्ही प्रार्थना केली, तर आम्हांस माहीत आहे की, जे काही आम्ही मागितले आहे ते आम्हांला मिळालेच आहे.
16 जर एखाद्याला त्याचा भाऊ पापांत पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम अनंतकाळचे मरण नसेल तर त्या भावासाठी त्याने प्रार्थना करावी. आणि देव त्याला जीवन देईल. ज्या गोष्टीचा परिणाम अनंतकाळचे मरण नाही अशा पापामध्ये पडणाऱ्यासाठी जे जीवन (देव देतो) त्या जीवनाविषयी मी हे बोलत आहे. ज्या पापाचा परिणाम मरण आहे. अशा तऱ्हेच्या पापाबाबत तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही. 17 सर्व अनीति हे पाप आहे, पण असे पाप आहे ज्याचा परिणाम मरण नाही.
18 आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही. 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, जरी संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे. 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्या देवाला आम्ही ओळखावे. आणि आपणास माहीत आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त आला आहे व जो खरा देव आणि देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याजमध्ये आम्ही राहात आहोत. पिता हा खरा देव आहे आणि तो अनंतकाळचे जीवन आहे. 21 माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तिपूजेपासून दूर राखा.
2006 by World Bible Translation Center