Revised Common Lectionary (Semicontinuous)
शलमोनासाठी स्तोत्र
72 देवा, तू राजाला तुझ्यासारखे योग्य निर्णय घेण्यासाठी मदत कर.
आणि राजाच्या मुलाला तुझ्या चांगुलपणा विषयी शिकायला मदत कर.
2 तुझ्या लोकांना चांगला न्याय मिळावा म्हणून राजाला मदत कर
तुझ्या गरीब लोकांसाठी चांगले आणि शहाणपणाचे निर्णय घेण्यासाठी त्याला मदत कर.
3 पृथ्वीवर सगळीकडे शांती,
आणि न्याय नांदू दे.
4 राजाला गरीबांविषयी न्यायी राहू दे.
त्याला असहाय लोकांना मदत करु दे.
त्यांना जे त्रास देतात त्या लोकांना त्याला शिक्षा करु दे.
5 जो वर सूर्य चमकतो आहे आणि चंद्र आकाशात आहे तोवर लोकांनी राजाला मान द्यावा आणि त्याची भीती बाळगावी असे मला वाटते.
लोक त्याला सदैव मान देतील आणि त्याची भीती बाळगतील अशी आशा मी करतो.
6 राजाला शेतात पडणाऱ्या पावसासारखे असू दे,
त्याला पृथ्वीवर पडणाऱ्या पर्जन्यासारखे असू दे.
7 तो जो पर्यंत राजा आहे तो पर्यंत चांगुलपणा उमलू दे.
जो पर्यंत चंद्र आहे तो पर्यंत शांती नांदू दे.
8 त्याचे राज्य एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत
आणि युफ्रेटस नदीपासून पृथ्वीच्या दुसऱ्या टोकापर्यत वाढू दे. [a]
9 वाळवंटात राहाणाऱ्या सर्व लोकांना त्याच्या समोर मुजरे करु दे.
त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्यापुढे घाणीत तोंड घालून मुजरे करु दे.
10 तार्शीशच्या आणि दूरदूरच्या देशांच्या राजांना त्याच्यासाठी भेटी आणू दे.
शबा आणि सबाच्या राजांना त्याच्यासाठी खंडणी आणू दे.
11 सगळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे
सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.
12 आमचा राजा असहाय्याला मदत करतो.
आमचा राजा गरीब आणि असहाय्य लोकांना मदत करतो.
13 गरीब आणि असहाय्य लोक त्याच्यावर अवलंबून असतात.
राजा त्यांना जिवंत ठेवतो.
14 जे दुष्ट लोक त्यांना दु:ख द्यायचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून राजा त्यांना वाचवतो.
राज्याला त्या गरीबांचे आयुष्य खूप मोलाचे वाटते.
15 राजा चिरायु होवो!
आणि त्याला शबाकडून सोने मिळू दे.
राज्यासाठी नेहमी प्रार्थना करा,
त्याला रोज आशीर्वाद द्या.
16 शेतात खूप धान्य पिकू द्या,
डोंगरावरही खूप धान्य उगवू द्या.
शेती लबानोन मधील शेतीसारखी सुपीक होऊ द्या
आणि शहरे गवताने भरलेल्या शेतासारखी माणसांनी भरु द्या.
17 राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या.
जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या.
त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या
आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या.
18 परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा.
फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो.
19 त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा.
त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या.
आमेन आमेन.
20 (इशायाचा मुलगा दावीद याच्या प्रार्थना इथे संपल्या.)
देव यशयाला संदेष्टा होण्यास बोलावतो
6 उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते. 2 देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत. 3 ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते. 4 त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले.
5 मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द् नाहीत. [a] तरीसुध्दा् राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.”
44 “अरण्यात आपल्या वाडवडिलांच्या बरोबर साक्षीदाखल देवाचा तंबू होता. देवाने तो जसा बनविण्यास सांगितले त्याप्रमाणे व देवाने दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे मोशेने तो बनविला. 45 नंतर यहोशवाने आपल्या वाडवडिलांचे नेतृत्व करुन इतर देशांच्या जमिनी काबिज केल्या. ती राष्टे परमेश्वराने आमच्या पुढून घालविली. जेव्हा आपले लोक या नवीन प्रदेशात गेले तेव्हा हाच तंबू त्यांनी सोबत नेला. आमच्या लोकांना हा तंबू त्यांच्या वाडवडिलांकडून मिळाला व आपल्या पूर्वजांनी दावीदाच्या काळापर्यंत तो ठेवला. 46 दावीद देवाच्या मर्जीचा असल्याने, याकोबाच्या देवासाठी मंदीर बांधण्याची इच्छा त्याने दर्शविली. 47 परंतु देवाचे मंदिर शलमोनाने बांधले.
48 “कारण सर्वेच्च देव मनुष्यांनी त्यांच्या हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. भविष्यवादी असे लिहितातः
49 ‘प्रभु म्हणतो, स्वर्ग माझे सिंहासन आहे.
पृथ्वी ही माझे पाय ठेवण्याचे आसन आहे.
तुम्ही माइयासाठी कसले घर बांधू शकता?
मला विश्रांती घेण्यासाठी दुसऱ्या ठिकाणाची गरज नाही.
50 माझ्या हातांनी या सर्व गोष्टी केल्या नाहीत काय?’” (A)
51 “तुम्ही जे ताठ मानेचे लोक आहात त्या तुमची मने व कान विदेशी लोकांसारखी असून तुम्ही नेहमीच पवित्र आत्म्याला आपल्या पूर्वजांप्रमाणेच नाकारीत आला आहात. 52 तुमच्या वाडवडिलांनी छळ केला नाही, असा कोणी एखादा भविष्यवादी होऊन गेला काय? एक धार्मिक (ख्रिस्त) येणार अशी घोषणा करणाऱ्यांचा त्यांनी वध केला. आणि आता तर तुम्ही त्याचा ही (ख्रिस्ताचा) विश्वासघात व खून केलात. 53 तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”
2006 by World Bible Translation Center