Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “भूकमळे” या चालीवर बसवलेले आसाफाचे स्तोत्र.
80 इस्राएलाच्या मेंढपाळा, माझे ऐक.
तू योसेफाच्या मेंढ्यांना (माणासांना) मार्ग दाखवतोस.
राजा म्हणून तू करुबांच्या आसनावर बसतोस.
आम्हाला तुला बघू दे.
2 इस्राएलाच्या मेंढपाळा, तुझे मोठेपण एफ्राइम आणि बन्यामीन व मनश्शे यांच्यासमोर दाखव.
ये आणि आम्हाला वाचव.
3 देवा, आमचा पुन्हा स्वीकार कर
आणि आम्हाला वाचव.
4 सर्वशक्तिमान परमेश्वर देवा, तू आमच्या प्रार्थना कधी ऐकशील?
आमच्यावर तू सदैव रागावलेलाच राहाणार आहेस का?
5 तू तुझ्या लोकांना अन्न म्हणून अश्रू दिलेस.
तेच त्यांचे प्यायचे पाणी होते.
6 तू आम्हाला आमच्या शेजाऱ्यांच्या भांडणाचे निमित्त केलेस.
आमचे शत्रू आम्हाला हसतात.
7 सर्वशक्तिमान देवा, पुन्हा आमचा स्वीकार कर.
आमचा स्वीकार कर आणि आम्हाला वाचव.
देवाचे स्तुतिस्तोत्र
10 परमेश्वरासाठी नवीन स्तोत्र गा.
दूरवरच्या देशांतील सर्व लोकांनो,
समुद्रावरून सफर करणाऱ्या सर्वांनो,
समुद्रातील सर्व प्राण्यांनो,
दूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, परमेश्वराची स्तुती करा.
11 वाळवंटांनो, नगरांनो, केदार मधील शेतांनो,
परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा.
सेलातील लोकांनो, आनंदाने गा.
तुमच्या उंच डोंगरकड्यावरून गा.
12 परमेश्वराचे गौरव करा.
दूरवरच्या देशातील लोकांनो, त्याची स्तुती करा.
13 परमेश्वर शूर सैनिकाप्रमाणे बाहेर जाईल लढण्यास सज्ज असलेल्या माणसाप्रमाणे तो असेल.
तो खूप उत्तेजित होईल.
तो आरोळी ठोकेल आणि मोठ्याने ओरडेल.
तो त्याच्या शत्रूंचा पराभव करील.
देव खूप संयमी आहे
14 “बराच वेळ मी काही बोललो नाही.
मी संयम ठेवला आणि गप्प राहिलो.
पण आता प्रसूतिवेदना होणाऱ्या स्त्रीसारखा मी मोठ्याने ओरडेन.
मी खूप जोराने व मोठ्याने श्वासोच्छवास करीन.
15 मी टेकड्या आणि पर्वत नष्ट करीन.
तेथे वाढणारी सर्व झाडेझुडपे मी सुकवून टाकीन.
मी नद्यांच्या जागी कोरडी जमीन निर्माण करीन.
तळी आटवीन.
16 आंधळ्यांना कधीही माहीत नसलेल्या मार्गाने मी घेऊन जाईन.
पूर्वी कधीही ते गेले नव्हते अशा स्थळी मी त्यांना नेईन.
मी त्यांच्यासाठी अंधार प्रकाशात बदलीन.
खडबडीत जमीन गुळगुळीत करीन.
मी कबूल केलेल्या गोष्टी करीन.
मी माझ्या लोकांचा त्याग करणार नाही.
17 पण काही लोकांनी मला अनुसरायचे थांबविले आहे,
त्यांच्याजवळ सोन्याने मढविलेल्या मूर्ती आहेत.
ते त्यांना म्हणतात, ‘तुम्हीच आमचे देव आहात.’
ते त्या खोट्या देवांवर विश्वास ठेवतात,
पण त्या लोकांची निराशा होईल.
देवाचे म्हणणे ऐकण्यास इस्राएलचा नकार
18 “तुम्ही बहिऱ्यांनी माझे म्हणणे ऐकावे.
आंधळ्यांनी नजर उचलून मला पाहावे.
तुम्ही आपला आनंद व धैर्य गमावू नका
32 ते पूर्वीचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हाला सुवार्तेचा प्रकाश प्राप्त झाला होता, तेव्हा तुम्ही भयंकर दु:खे सोसली. 33 काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला. आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले. 34 एवढेच नाही, तर त्यांच्यासाठी तुम्ही झीजदेखील सोसली. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही मदत केली. त्यांच्या दु:खात सहभागी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता. कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता.
35 म्हणून तुमच्यामध्ये जो टृढ विश्वास होता तो सोडू नका. कारण त्यापासून तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. 36 तुम्ही धीर धरणे जरूरीचे आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही देवाची इच्छा पूर्ण करून त्याने तुम्हांला दिलेल्या त्याच्या वचनाप्रमाणे तुम्ही प्रतिफळ मिळावे. 37 आता अगदी थोडक्या अवधीनंतर,
“जो येणारा आहे, तो येईल,
तो उशीर लावणार नाही.
38 परंतु माझा धार्मिक पुरुष
विश्वासाने वाचेल
आणि जर तो पाठ फिरवील तर
माझ्या जिवाला संतोष होणार नाही.” (A)
39 पंरतु पाठ फिरवून नष्ट झालेल्यांपैकी आपण नाही, तर आपल्या जिवाचे तारण साधून विश्वास बागळणाऱ्यांपैकी आहोत.
2006 by World Bible Translation Center