Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र
126 परमेश्वर जेव्हा आपली परत सुटका करील
तेव्हा ते स्वप्नासारखे असेल.
2 आपण हसत आनंदाचे गाणे गात असू.
इतर देशांतील लोक म्हणतील,
“इस्राएलाच्या लोकांसाठी परमेश्वराने फार चांगली गोष्ट केली.”
3 होय, परमेश्वराने जर आपल्यासाठी ती चांगली गोष्ट केली
तर आपण खूप आनंदी होऊ.
4 परमेश्वरा, वाळवंटातले झरे पुन्हा पाण्याने भरुन वहायला लागतात.
तसं आम्हाला पुन्हा मुक्त कर.
5 एखादा माणूस बी पेरते वेळी दु:खी असू शकेल.
पण तो जेव्हा पीक गोळा करतो तेव्हा तो आनंदी असतो.
6 तो जेव्हा बी शेतात नेतो तेव्हा तो दु:खी होईल.
पण तो जेव्हा धान्य घरी आणतो तेव्हा आनंदी असतो.
3 दुर्बल हात बळकट करा. दुर्बळ पाय घट्ट करा. 4 लोक घाबरले व गोंधळले आहेत. त्यांना सांगा, “सामर्थ्यवान व्हा. भीऊ नका.” तुमचा देव येऊन तुमच्या शत्रूला शिक्षा करील. तो येईल आणि तुमच्या वर कृपा करील. परमेश्वर तुमचे रक्षण करील. 5 मग आंधळे पुन्हा डोळस होतील. त्यांचे डोळे उघडतील. बहिरे ऐकू शकतील. त्यांना श्रवणशक्ती मिळेल. 6 पंगु हरणांप्रमाणे नाचतील. मुके आनंदगीते गाऊ लागतील. वाळवंटात झरे वाहू लागतील, तेव्हा असे होईल. कोरड्या जमिनीतून झरे वाहतील. 7 आता लोक मृगजळे पाहतात. पण त्या वेळेला खऱ्या पाण्याची तळी दिसतील. कोरड्या जमिनीत विहिरी खोदलेल्या असतील. जमिनीतून पाणी वाहील. जेथे एकेकाळी जंगली जनावरे वावरले, तेथे मोठ्या पाणवनस्पती वाढतील.
योहान प्रश्न विचारतो(A)
18 योहानाच्या शिष्यांनी योहानाला जाऊन हे सर्व सांगितले, नंतर योहानाने आपल्या दोन शिष्यांना बोलाविले 19 आणि त्याने त्यांना प्रभुकडे हे विचारण्यासाठी पाठविले की, “जो येणारा तो तूच आहेस की, आम्ही दुसऱ्या कोणाची तरी अपेक्षा करावी?”
20 जेव्हा लोक त्याच्याकडे आले, ते म्हणाले, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने आम्हांला तुमच्याकडे हे विचारण्यास पाठविले आहे की, ‘जो येणारा तो तूच आहेस की आम्ही दुसऱ्या कोणाची अपेक्षा करावी?’”
21 त्यावेळी येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील भुते काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. 22 येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा: आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात. 23 जो मला अनमान न करता स्वीकारतो, तो धन्य.”
24 योहानाचे निरोपे गेल्यावर येशू समुदायाबरोबर योहानाविषयी बोलू लागला: “वाळवंटात तुम्ही काय पाहण्यासाठी गेला होता? वाऱ्याने वाकलेल बोरु? 25 नाही, मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता? कपडे घातलेला मनुष्य? नाही. तलम कपडे घालणारे आणि ऐषारामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात. 26 पण तुम्ही बाहेर काय पाहण्यासाठी गोला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हांला सांगतो, तुम्ही संदेष्ट्यापेक्षा काही तरी अधिक पाहिले आहे! 27 हाच तो ज्याच्याविषयी पवित्र शास्त्रात लिहिले आहे,
‘पाहा, मी माझ्या संदेशवाहकाला माझ्यापुढे पाठवीत आहे.
तो तुमच्यापुढे मार्ग तयार करील.’ (B)
28 मी तुम्हांला सांगतो, जे स्त्रियांपासून जन्मले त्यात योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीही देवाच्या राज्यातील अगदी सामान्य माणूस सुध्दा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे.”
29 (जेव्हा लोकांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी मान्य केले की, देवाची शिकवण चांगली आहे. जकातदारसुद्धा सहमत झाले. या लोकांना योहानाने अगोदरच बाप्तिस्मा दिला होता. 30 पण परुशी व नियमाशास्त्राच्या शिक्षकांनी देवाची त्यांच्याविषयी असलेली योजना नाकारली. त्यांनी योहानाला त्यांचा बाप्तिस्मा करु दिला नाही.)
2006 by World Bible Translation Center