Revised Common Lectionary (Semicontinuous)
भाग चौथा
(स्तोत्रसंहिता 90-106)
देवाचा माणूस मोशे याची प्रार्थना
90 प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस.
2 देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि
पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा,
तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
3 तूच लोकांना या जगात आणतोस आणि
तूच त्यांची पुन्हा माती करतोस.
4 तुझ्यासाठी हजारो वर्षे
म्हणजे कालचा दिवस, कालची रात्र.
5 तू आम्हाला झाडून टाकतोस. आमचे आयुष्य स्वप्नासारखे आहे.
सकाळ झाली की आम्ही मेलेलो असतो.
आम्ही गवतासारखे आहोत.
6 गवत सकाळी उगवते आणि
संध्याकाळी ते वाळते व मरणाला टेकते.
7 देवा, तू रागावतोस तेव्हा आमचा नाश होतो.
आम्हाला तुझ्या रागाची भीती वाटते.
8 तुला आमच्या सर्व पापांची माहिती आहे.
देवा, तू आमचे प्रत्येक गुप्त पाप पाहतोस.
9 तुझा राग आमचे आयुष्य संपवू शकतो एखाद्या कुजबुजी सारखे
आमचे आयुष्य विरुन जाऊ शकते.
10 आम्ही कदाचित् 70 वर्षे जगू आणि
जरा सशक्त असलो तर 80 वर्षे.
आमचे आयुष्य कठोर परिश्रम आणि दु:ख यांनी भरलेले आहे
आणि नंतर आमचे आयुष्य अवचित् संपते आणि आम्ही उडून जातो.
11 देवा, तुझ्या रागाच्या संपूर्ण शक्तीची कुणालाच जाणीव नाही.
परंतु देवा, आमची भीती आणि तुझ्याबद्दलचा आदर तुझ्या रागाइतकाच महान आहे.
12 आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे
ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.
13 परमेश्वरा, नेहमी आमच्याकडे परत
ये तुझ्या सेवकाशी दयेने वाग.
14 तुझ्या प्रेमाने आम्हांला रोज सकाळी न्हाऊ घाल.
आम्हाला सुखी होऊ दे आणि समाधानाने आयुष्य जगू दे.
15 तू आम्हाला आयुष्यात खूप संकटे आणि खिन्नता दिलीस.
आता आम्हांला सुखी कर.
16 तू तुझ्या सेवकांसाठी कोणत्या अद्भुत गोष्टी करु
शकतोस ते त्यांना बघू दे.
17 देवा, प्रभु, आमच्यावर दया कर.
आम्ही जे जे करतो त्यात आम्हाला यश दे.
24 यामुळे प्रभू, सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा सामर्थ्यवान ईश्वर म्हणतो, “माझ्या शत्रूंनो, मी तुम्हाला शिक्षा करीन. तुम्ही मला जास्त त्रास देऊ शकणार नाही. 25 चांदी स्वच्छ करण्यासाठी लोक एक रसायन वापरतात. मी तसेच करीन आणि तुझी दुष्कृते धुवून काढीन. मी तुझ्यातील सर्व निरर्थक गोष्टी काढून टाकीन. 26 सुरूवातीला होते त्याप्रमाणे मी न्यायाधीश नेमीन. पूर्वीप्रमाणेच मंत्री नेमीन मग तुला सर्वजण ‘चांगली व निष्ठावंत नगरी म्हणतील.’”
27 देव कल्याण करणारा आहे आणि तो योग्य त्याच गोष्टी करतो. म्हणूनच सीयोनचा व जे त्याला शरण येतील अशा लोकांचा, देव उध्दार करेल. 28 पण सर्व गुन्हेगारांचा आणि पापी लोकांचा नाश होईल. (हे लोक परमेश्वराचे ऐकणारे नाहीत.)
29 भविष्यात, ज्या ओकच्या झाडांची लोक पूजा करतात व ज्या खास बागांमध्ये जाऊन मूर्तींची पूजा करतात, त्या झाडांची व बागांची लोकांना लाज वाटेल. 30 असे होण्याचे कारण तुम्ही त्या पाने गळून जाणाऱ्या ओकच्या झाडांप्रमाणे किंवा पाणी नसल्याने सुकत चाललेल्या बागांप्रमाणे व्हाल. 31 बलाढ्य माणसे लहानशा वाळलेल्या लाकडाच्या ढलपीप्रमाणे होतील. त्यांची कर्मे आग लावणाऱ्या ठिणगीसारखी असतील. ती बलाढ्य माणसे व त्यांची कर्मे ह्यांना एकदमच आग लागेल आणि ती आग कोणीही विझवू शकणार नाहीत.
आम्हांला पुरावा दे(A)
29 जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे, आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही. 30 कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल.
31 “दक्षिणेकडची राणी [a] न्यायाच्या दिवशी या पिढीविरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करील. कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली, आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा कोणी एक येथे आहे.
32 “न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहतील व त्यांचा धिक्कार करतील. कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला पण आता योनापेक्षाही थोर असा कोणी येथे आहे.
2006 by World Bible Translation Center