Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
25 परमेश्वरा, मी स्वत:ला तुझ्याकडे सुपूर्द करतो.
2 देवा, माझा तुझ्यावर विश्वास आहे
आणि माझी निराशा होणार नाही.
माझे शत्रू मला हसणार नाहीत.
3 एखाद्याने तुझ्यावर विश्वास टाकला तर त्याची निराशा होणार नाही
परंतु दगाबाज मात्र निराश होतील.
त्यांना काहीही मिळणार नाही.
4 परमेश्वरा तुझे मार्ग आत्मसात करण्यासाठी मला मदत कर.
मला तुझे मार्ग शिकव.
5 मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव
तू माझा देव आहेस,
माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.
6 परमेश्वरा, माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे
तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव.
7 माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस
परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठण ठेव.
8 परमेश्वर खरोखरच चांगला आहे.
तो पापी माणसांना जगण्यासाठी योग्यमार्ग दाखवतो.
9 तो दीन माणसांना त्यांचे मार्ग दाखवतो तो
त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो.
10 जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी
तो सच्चा आणि दयाळू असतो.
16 पण आमचे पूर्वज उन्मत्त झाले.
अहंमन्य बनले, आणि त्यांनी तुझ्या आज्ञांचे पालन करायचे नाकारले.
17 ते ऐकेनात तू जी आश्चर्यकारक कृत्ये
त्यांच्यासमोर केलीस ती ते विसरले.
ते हट्टी झाले.
त्यांच्या बंडखोरपणामुळे त्यांनी मिसरला परत जायचे ठरवले आणि पुन्हा गुलाम होण्यासाठी.
“पण तू क्षमाशील देव आहेस.
तू दयाळू आणि कृपाळू आहेस.
तू सहनशील व प्रेमळ आहेस
म्हणून तू त्यांना सोडले नाहीस.
18 त्यांनी सोन्याच्या वासरांच्या मूर्ती केल्या आणि
‘आम्हाला मिसर मधून सोडवणारे हेच ते देव’ असे ते म्हणाले.
तरी तू त्यांचा त्याग केला नाहीस.
19 तू कृपावंत आहेस.
म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस.
दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ
काढून घेतला नाहीस.
तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास.
रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्निस्तंभ
काढून टाकला नाहीस
त्यांच्या पुढचा मार्ग उजळत
तू त्यांना वाट दाखवत राहिलास.
20 त्यांना शहाणपण येण्यासाठी तू त्यांना आपला सदात्मा दिलास.
अन्न म्हणून त्यांना मान्ना दिलास.
त्यांना तहान लागलेली असताना त्यांना पाणी दिलेस.
21 चाळीस वर्षे तू त्यांची काळजी वाहिलीस.
वाळवंटात त्यांच्या सर्व गरजा भागल्या.
त्यांचे कपडे जीर्ण झाले नाहीत
त्यांच्या पावलांना सूज आली नाही की दुखापत झाली नाही.
22 हे परमेश्वरा, त्यांना तू राज्ये आणि राष्ट्रे दिलीस.
फार लोकवस्ती नसलेली लांबलांबची ठिकाणे दिलीस.
हेशबोनच्या राजाचा म्हणजे सिहोनचा प्रांत त्यांना मिळाला.
बाशानचा राजा ओग याचा भूभाग त्यांना मिळाला.
23 त्यांच्या वंशजांची संख्या
तू आकाशातील तारकाप्रमाणे विपुल केलीस.
त्यांच्या पूर्वजांना कबूल केलेल्या प्रदेशापर्यंत
त्यांना तू नेऊन पोचवलेस.
त्यांनी पुढे जाऊन तो प्रदेश ताब्यात घेतला.
24 या वंशजांनी तो प्रदेश घेतला.
तेथे राहणाऱ्या कनान्यांचा त्यांनी पराभव केला.
तूच त्यांच्या हातून हा पराभव करवलास.
हे देश, तिथले लोक आणि राजे यांच्याशी
तू त्यांना मन मानेल तसे वागू दिलेस
25 त्यांनी मजबूत नगरांचा कब्जा घेतला.
सुपीक प्रदेश त्यांनी मिळवला,
उत्तम वस्तूनी भरलेली घरे
त्यांना मिळाली खोदलेल्या विहिरी
त्यांना आयत्या मिळाल्या.
द्राक्षमळे, जैतूनाची झाडे आणि पुष्कळशी फळझाडे त्यांना मिळाली,
खाऊन पिऊन ते तृप्त झाले, पुष्ट झाले.
तू त्यांना दिलेल्या मनोहारी गोष्टीचा
त्यांनी उपभोग घेतला.
शेवटच्या सूचना आणि सलाम
12 परंतु बंधूंनो, आम्ही तुम्हांला विनंति करतो, की जे तुम्हामध्ये श्रम व प्रभुमध्ये मार्गदर्शन करतात आणि शिक्षण देतात, त्यांना तुम्ही मान द्या. 13 आम्ही तुम्हाला अशी विनंति करतो की, त्यांनी तुमच्याबरोबर केलेल्या कामामुळे त्यांना प्रेमाने मोठा मान द्या.
एकमेकांबरोबर शांतीने राहा. 14 बंधूंनो, आम्ही तुम्हाला आग्रह करतो की, “आळशी लोकांना ताकीद द्या.” भित्र्यांना उत्तेजन द्या आणि अशक्तांना मदत करा. व सर्व लोकांबरोबर सहनशीलतेने राहा. 15 कोणीही वाईटाची फेड वाईटाने करु नये म्हणून लक्षात ठेवा. परंतु नेहमी एकमेकांचे आणि सर्व लोकांचे चांगले करण्याचा प्रयत्न करा.
16 सर्वदा आनंद करा. 17 नेहमी प्रार्यना करीत राहा. 18 प्रत्येक परिस्थितीत देवाचे उपकार माना.
19 आत्म्याला विझविण्याचा प्रयत्न करु नका. 20 संदेष्ट्यांच्या संदेशाचा उपहास करु नका. 21 पण हे देवाकडून आले आहेत याची परीक्षा करुन खात्री करुन घेण्याची सवय करा. जे चांगले ते धरुन ठेवा. 22 दुष्टाईच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.
2006 by World Bible Translation Center