Revised Common Lectionary (Semicontinuous)
वर मंदिरात जाण्याच्या वेळचे स्तोत्र.
132 परमेश्वरा, दावीदाला किती त्रास झाला त्याची आठवण ठेव.
2 दावीदाने परमेश्वराला वचन दिले.
दावीदाने याकोबाच्या सर्वशक्तिमान देवाला खास वचन दिले.
3 दावीद म्हणाला “मी माझ्या घरात जाणार नाही.
मी माझ्या अंथरुणावर झोपणार नाही.
मी झोपणार नाही.
4 माझ्या डोळ्यांना विश्रांती घेऊ देणार नाही.
5 मी या पैकी कुठलीही गोष्टी, जो पर्यंत परमेश्वरासाठी,
याकोबाच्या सर्वशक्तिमान देवासाठी, घर सापडत नाही तो पर्यंत करणार नाही.”
6 आम्ही याबद्दल एफ्राथात ऐकले.
आम्हाला कराराची पेटी किरिआथ येआरिम मध्ये सापडली.
7 आपण पवित्र तंबूत जाऊ.
या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
8 परमेश्वरा, तुझ्या विश्रांतीस्थानावरुन
तुझ्या शक्तिमान कोशासह उठ.
9 परमेश्वरा, तुझे याजक चांगुलपणा ल्याले आहेत.
तुझे भक्त खूप आनंदी आहेत.
10 तुझा सेवक दावीद याच्या भल्यासाठी,
निवडलेल्या राजाला नकार देऊ नकोस.
11 परमेश्वराने दावीदाला वचन दिले.
परमेश्वराने दावीदाशी प्रामाणिक राहाण्याचे वचन दिले.
राजे दावीदाच्या कुटुंबातूनच येतील असे वचन परमेश्वराने दिले.
12 परमेश्वर म्हणाला, “दावीद, जर तुझ्या मुलांनी माझा करार पाळला आणि
मी त्यांना शिकवलेले नियम पाळले तर तुझ्या कुटुंबातील कुणीतरी नेहमी राजा होईल.”
13 परमेश्वराने त्याच्या मंदिरासाठी सियोनपर्वत निवडला.
त्याच्या वस्ती साठी त्याला ती जागा पाहिजे होती.
14 परमेश्वर म्हणाला, “ही जागा सदैव माझी राहील,
मी माझ्यासाठी ही जागा निवडली. मी नेहमी इथे राहीन.
15 मी या शहराला भरपून अन्न मिळो असा आशीर्वाद देईन.
गरीब लोकांना देखील भरपूर खायला मिळेल.
16 मी याजकांना तारणाचे वस्त्र लेववीन.
आणि माझे भक्त इथे खूप आनंदी होतील.
17 मी या जागेवर दावीदाला बलवान बनवीन.
मी माझ्या निवडलेल्या राजाला दिवा देईन.
18 मी दावीदाच्या शत्रूंना लाजेने झाकून टाकीन
परंतु मी दावीदाचे राज्य वाढेल असे करीन.”
11 नियमशास्त्रातील वचने ऐकून राजाने अतीव दु:ख प्रदर्शित करण्यासाठी आपली वस्त्रे फाडली. 12 मग त्याने याजक हिल्कीया, शाफानचा मुलगा अहीकाम, मिखायाचा मुलगा अखबोर, शाफान चिटणीस आणि सेवक असाया यांना आज्ञा केली की, 13 “आता जाऊन परमेश्वराचा कौल घ्या. मी, आपले लोक आणि सर्व यहूदा यांच्या वतीने त्याला या पुस्तकातील वचनांविषयी विचारा. परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. कारण आपल्या पूर्वंजांनी या पुस्तकातील वचनांचा भंग केला आहे. आपल्यासाठी लिहून ठेवलेल्या सर्व गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या नाहीत.”
योशीया आणि संदेष्ट्री हुल्दा
14 मग हिल्कीया याजक, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया हे सर्व हुल्दा या संदेष्ट्रीकडे गेले. हरहसचा मुलगा तिकवा याचा मुलगा शल्लूम याची ती बायको. शल्लूम याजकांच्या कपड्यांचे खाते सांभाळी, हुल्दा यरुशलेममध्ये दुसऱ्या भागात राहात होती. हे सर्वजण तिच्याकडे गेले आणि तिच्याशी बोलले.
15 तेव्हा हुल्दा त्यांना म्हणाली, “इस्राएलचा देव परमेश्वर म्हणतो: तुम्हाला माझ्याकडे ज्याने पाठवले त्याला सांगा: 16 ‘परमेश्वराचे म्हणणे आहे की, हा प्रदेश आणि तेथे राहणारे लोक यांच्यावर आता मी अरिष्ट आणणार आहे. यहूदाच्या राजाने त्या पुस्तकात वाचली तीच संकटे येतील. 17 यहूदाच्या लोकांनी माझा त्याग केला. इतर दैवतांपुढे त्यांनी धूप जाळला. त्यांनी मला संताप आणला. त्यांनी अनेक मूर्तींही केल्या. म्हणून या प्रदेशावर माझा राग आहे. न विझवता येणाऱ्या अग्निसारखा माझा संताप असेल.’
18-19 “यहूदाचा राजा योशीया याने तुम्हाला परमेश्वराचा कौल घ्यायला पाठवले. योशीयाला हे सांगा: ‘इस्राएलाचा देव परमेश्वराची वचने तू ऐकलीस. हा प्रदेश आणि येथील लोक यांच्याविषयी मी सांगितले ते ऐकलेस. तू मृदू मनाचा आहेस. या गोष्टी ऐकून तुला दु:ख झाले. यरुशलेमवर अरिष्ट येईल असे मी म्हणालो तेव्हा शोकाने तू वस्त्रे फाडलीस आणि रडलास. म्हणून मीही तुझे ऐकले आहे.’ हे परमेश्वराचे शब्द आहेत. 20 ‘मी तुझी तुझ्या पूर्वजांशी भेट करुन देईन. तुला मरण येईल आणि तू सुखाने कबरीत पडशील. यरुशलेमवर येणारे अरिष्ट तुला आपल्या डोळ्यांनी पाहावे लागणार नाही.’”
मग याजक हिल्कीया, अहीकाम, अखबोर, शाफान, असाया यांनी हा संदेश राजाला सांगितला.
20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे. 21 कारण ज्याअर्थी मनुष्याद्वारे मरण आले त्याप्रमणे मृतांचे पुनरुत्थानसुद्धा मनुष्याद्वारेच आले. 22 कारण जसे आदामाद्वारे सर्व मरण पावतात तसेच सर्वजण ख्रिस्ताद्वारे जिवंत केले जातील. 23 पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले, 24 मग शेवट येईल प्रत्येक अधिपती, प्रत्येक सत्ता, व प्रत्येक सामर्थ्य जेव्हा ख्रिस्त नाहीसे करील, तेव्हा ख्रिस्त देवपित्याला राज्य देईल.
25 कारण देवाने ख्रिस्ताचे शत्रू ख्रिस्ताच्या पायाखाली ठेवीपर्यंत ख्रिस्ताने राज्य केले पाहिजे. 26 शेवटचा शत्रू असल्यासारखा मृत्यूचा नाश केला पाहिजे. 27 कारण “देवाने सर्व काही त्याच्या अधिकारात ठेवले आहे.” आता जेव्हा पवित्र शास्त्र म्हणते की, “सर्व गोष्टी” अंकीत केल्या आहेत तेव्हा सर्व स्पष्ट आहे की, ज्याने सर्व गोष्टी त्याच्या अंकीत केल्या आहेत, तो देव सोडून इतर सर्व गोष्टी त्याच्या अधिकार क्षेत्रात आहेत. 28 आणि सर्व गोष्टी जेव्हा स्वाधीन केलेल्या आहेत, तेव्हा पुत्रसुद्धा देवाच्या, ज्याने सर्व गोष्टी स्वाधीन केल्या आहेत, स्वतः स्वाधीन केला जाईल यासाठी की, देव सर्वांवर संपूर्णपणे अधिपती असावा.
2006 by World Bible Translation Center