Revised Common Lectionary (Semicontinuous)
146 परमेश्वराची स्तुती करा.
माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर.
2 मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन.
मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
3 तुमच्या नेत्यांवर मदतीसाठी अवलंबून राहू नका.
लोकांवर विश्वास टाकू नका.
का? कारण लोक तुम्हाला वाचवू शकत नाहीत.
4 लोक मरतात आणि त्यांचे दफन केले जाते
आणि नंतर मदतीच्या त्यांच्या सगळ्या योजनाही जातात.
5 पण जे लोक देवाला मदतीबद्दल विचारतात ते सुखी असतात.
ते लोक परमेश्वरावर, त्यांच्या देवावर अवलंबून असतात.
6 परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली.
परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या.
परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील.
7 जे लोक दु:खी कष्टी आहेत.
त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो.
तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.
8 परमेश्वर आंधळ्यांना पुन्हा दिसू लागण्यासाठी मदत करतो.
संकटात असलेल्या लोकांना परमेश्वर मदत करतो.
परमेश्वराला चांगले लोक आवडतात.
9 परमेश्वर आपल्या देशातल्या परक्यांचे रक्षण करतो.
परमेश्वर विधवांची आणि अनांथांची काळजी घेतो.
परंतु परमेश्वर वाईट लोकांचा नाश करतो.
10 परमेश्वर सदैव राज्य करील
सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील
परमेश्वराची स्तुती करा.
घरी परततात
18 रूथचा आपल्या बरोबरच यायचा निर्धार आहे हे पाहिल्यावर नामीने तिचे मन वळवायचा प्रयत्न सोडून दिला. 19 त्या दोघी मजल दरमजल करत बेथलेहेमपर्यंत आल्या. त्यांना पाहून बेथलेहेममधील लोकांना एकदम भरून आले. “ही नामी की काय” असे ते म्हणू लागले.
20 पण नामी म्हणाली, “मला नामी (आनंदी) का म्हणता? ‘मारा’(म्हणजे कष्टी दु:खी)म्हणा. सर्वशक्तिमान देवाने मला फार दु:ख दिले आहे. 21 येथून मी गेले तेव्हा सर्व काही माझ्याकडे पुष्कळ होते.आता परमेश्वराने मला रिकाम्या हाताने परत आणले आहे. परमेश्वरानेच मला दु:खी केले. तेव्हा मला ‘आनंदी’ कशाला म्हणता? सर्वशक्तिमान देवाने मला फार वाईट दिवस दाखवले.”
22 अशा प्रकारे सातूच्या पिकाच्या हंगामाच्या सुरूवातीला नामी आणि तिची मवाबातील सून रूथ या दोघी मवाबातून बेथलेहेम यहूदा येथे परतल्या.
जुन्या कराराप्रमाणे उपासना
9 पहिल्या करारात उपासनेसंबंधी काही नियम होते आणि मनुष्यांनी बनविलेले एक पवित्रस्थान होते. 2 कारण दीपस्तंभ व अर्पणाच्या विशेष भाकरी ठेवण्यासाठी पहिल्या मंडपामध्ये एक मेज ठेवण्यात आला होता. हा जो पहिला मंडप होता त्याला पवित्र स्थान असे म्हणतात. 3 दुसऱ्या पडद्यामागे एक खोली (मंडप) होती, त्याला परमपवित्रस्थान म्हणत [a] 4 त्यामध्ये ऊद जाळण्यासाठी सोन्याची वेदी होती. आणि कराराची पेटी (कोष). [b] ही पेटी (कोष) संपूर्ण सोन्याने मढवलेली होती त्या पेटीत (कोषात) एका सोन्याच्या भांड्यात मान्रा होता, तसेच अहरोनाची काठी जिला पाने फुटलेली होती व कराराच्या दगडी पाट्या होत्या. 5 या पेटीवर (कोषावर) गौरवाचे करूबीम दयासनावर [c] सावली करीत होते. परंतु या गोष्टींबाबत सविस्तर चर्चा आता आपण करू शकत नाही.
6 या व्यवस्थेनुसार याजकगण आपल्या कर्तव्यकर्मासाठी पहिल्या मंडपात प्रवेश करीत असत. 7 पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या खोलीत (मंडपात) जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वतःसाठी (स्वतःच्या पापांसाठी) व लोकांच्या अज्ञानाच्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.
8 याद्वारे पवित्र आत्मा हे दर्शवितो की, पहिला मंडप उभा आहे तोपर्यंत परमपवित्रस्थानात जाण्याचा मार्ग खुला नाही. 9 हे सर्व आजच्या काळात प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्याला वाहिलेली अर्पणे यामुळे उपासकाची सदसदविवेकबुद्धि परिपूर्ण होऊ शकत नाही. 10 हे विधी केवळ बाह्य बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत.
नव्या करारामप्रमणे उपासना
11 पण आता ख्रिस्त हा घडून आलेल्या चांगल्या गोष्टींचा मुख्य याजक म्हणून आला आहे. तो मनुष्याच्या हातांनी बांधला नव्हता अशा महान तसेच सर्व दृष्टींनी परिपूर्ण अशा मंडपामध्ये, या निर्मितीमधील, 12 बकरे किंवा वासरू यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन परमपवित्रस्थानात गेला; व त्याने सर्व काळासाठी स्वतःच एकदाच अर्पण करून आपल्याला कायमचे तारण मिळवून दिले.
2006 by World Bible Translation Center