Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी यदुथुनासाठी दावीदाचे स्तोत्र
39 मी म्हणालो, “मी जे बोलेन त्याबद्दल काळजी घेईन
मी माझ्या जिभेला पाप करु देणार नाही.”
2 मी दुष्टांबरोबर असलो की माझे तोंड बंद ठेवीन.
मी बोलायला नकार दिला मी काही चांगलेसुध्दा बोललो नाही.
मी फार चिडलो होतो.
3 मी फार रागावलो होतो
आणि मी जितका जास्त त्याचा विचार करत गेलो तितका अधिक मी रागावत गेलो.
म्हणून मी काही तरी बोललो.
4 माझे काय होईल?
हे परमेश्वरा, मला सांग मी किती दिवस जगेन?
ते मला सांग, माझे आयुष्य किती लहान आहे ते मला कळू दे.
5 परमेश्वरा, तू मला अगदी कमी आयुष्य दिलेस.
माझे आयुष्य म्हणजे तुझ्या दृष्टीने काहीच नाही.
प्रत्येकाचे आयुष्य केवळ ढगासारखे असते.
कुणीही सदासर्वकाळ जगत नाही.
6 आपण जे आयुष्य जगतो ते खोट्या प्रतिबिंबासारखे असते.
आपली सगळी संकटे निष्कारणच असतात.
आपण नेहमी वस्तू गोळा करीत असतो
पण त्या कोणाला मिळणार आहेत ते आपल्याला माहीत नसते.
7 तेव्हा प्रभु, मला काही आशा आहे का?
तूच माझी आशा आहेस!
8 परमेश्वरा, तूच मला मी केलेल्या पापांपासून वाचव. तू
मला दुष्ट माणसाला वागवितात तसे वागवू नकोस.
9 मी माझे तोंड उघडणार नाही.
मी काही बोलणार नाही.
परमेश्वरा जे करायला हवे होते ते तू केलेस.
10 देवा, आता मला शिक्षा करणे सोडून दे जर
तू ते सोडून दिले नाहीस तर तू माझा नाश करशील.
11 परमेश्वरा, तू चूक केल्याबद्दल शिक्षा करतोस.
त्या रीतीने तू लोकांना जगण्याचा योग्य मार्ग दाखवतोस आमची शरीरे म्हातारी होऊन
कसरीने खाल्लेल्या कापडासारखी जीर्ण होतात तसेआमचे आयुष्य चटकन् नाहीसा होणाऱ्या ढगासारखे आहे.
12 परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक,
मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ.
या आयुष्यात तुझ्या बरोबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे.
माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे
केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
13 परमेश्वरा, माझ्याकडे बघू नकोस.
मरण्याच्या आधी मला आनंदी राहू दे.
मी थोड्याच वेळात जाणार आहे.
ईयोब बिल्ददला उत्तर देतो
26 नंतर ईयोबाने बिल्ददला उत्तर दिले:
2 “बिल्दद, सोफर आणि अलीफज तुम्ही दुर्बल माणसासाठी खूप मोठे साहाय्य आहात.
हो तुम्हीच दुबळ्या हातांना पुन्हा जोमदार बनवले.
(हे ईयोबाचे बोलणे उपरोधक आहे)
3 विद्वत्ताहीन माणसाला तुम्ही फार चांगला उपदेश केला.
तुम्ही किती विद्वान आहात ते तुम्ही दाखवून दिलेत.
4 हे बोलण्यासाठी तुम्हाला कुणाची मदत मिळाली?
कुणाच्या आत्म्याने तुम्हांला याची प्रेरणा दिली?
5 “मेलेल्या माणसाचा आत्मा भयाने
पृथ्वीच्या खाली पाण्यात घाबरतो.
6 परंतु देव मृत्युलोकात स्वच्छपणे बघू शकतो.
मृत्यु देवापासून लपून राहात नाही.
7 देवाने रिकाम्या पोकळीत दक्षिणेकडचे आकाश सरकवले.
देवाने पृथ्वी निराधार टांगली, अधांतरी ठेवली.
8 देव घनदाट ढगांना पाण्याने भरतो.
परंतु त्या वजनाने तो ढगांना फुटू देत नाही.
9 देव पूर्ण चंद्राचा चेहरा झाकून टाकतो.
तो त्याच्यावर ढग पसरवतो आणि त्याला लपवतो.
10 देवाने सागरावर एक वर्तुळ आखले
आणि प्रकाश काळोखापासून वेगळा करण्यासाठी क्षितिज निर्माण केले.
11 देव जेव्हा धमकी देतो
तेव्हा आकाशाला आधार देणारा पाया भयाने थरथरायला लागतो.
12 देवाची शक्ती सागराला शांत करते.
देवाच्या विद्वत्तेने राहाबाच्या मदतनीसांना नष्ट केले.
13 देवाचा नि:श्वास आकाश स्वच्छ करतो.
देवाच्या हातांनी पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले.
14 देव ज्या काही अनामिक गोष्टी करतो त्यापैकी या काही गोष्टी आहेत.
आपण देवाची एखादी लहानशी कुजबुज ऐकतो, देव किती सामर्थ्यवान आणि शक्तिशाली आहे.
हे कोणालाच कळत नाही.”
मोठा समुदाय
9 यानंतर मी पाहिले, तेव्हा अफाट लोकसमुदाय मला दिसला. तेथे इतके लोक होते की, कोणालाही ते मोजता आले नसते. ते प्रत्येक राष्ट्राचे, वंशाचे, जमातीचे, आणि भाषेचे लोक होते, हे लोक सिंहासनासमोर आणि कोकऱ्यासमोर उभे होते. त्या सर्वांनी पांढरे शुभ्र झगे घातले होते आणि त्यांच्या हातात झावळ्याच्या फांद्या होत्या. 10 ते मोठ्याने ओरडत होते, “तारण आमच्या देवाचे आहे. व आमच्या कोकऱ्याचे आहे, जो सिंहासनावर बसतो.”
11 सर्व देवदूत सिंहासनाभोवती उभे होते आणि वडिलजनांच्या आणि चार प्राण्यांच्या भोवती उभे होते. ते सिंहासनासमोर पालथे पडले आणि त्यांनी देवाची आराधना केली. 12 ते म्हणाले, “आमेन! स्तुति गौरव, शहाणपण, आभार, सन्मान, सामर्थ्य आणि पराक्रम अनंतकाळासाठी आमच्या देवाची आहेत. आमेन!”
13 मग वडीलांपैकी एकाने मला विचारले, “हे पांढरे झगे घातलेले कोण आहेत? व कोठून आले आहेत?”
14 मी म्हणालो, “महाराज, आपणाला माहीत आहे.”
आणि तो वडील म्हणाला, “हे लोक मोठ्या त्रासातून बाहेर आलेले आहोत, त्यांनी त्यांची वस्त्रे कोकऱ्याच्या रक्तात धुतली आहेत. आता स्वच्छ व शुभ्र झाले आहेत. 15 म्हणून आता हे लोक देवाच्या सिंहासनासमोर आहेत. हे लोक देवाची त्याच्या मंदिरात रात्रंदिवस सेवा करतात आणि जो सिंहासनावर बसलेला आहे, तो त्यांचे रक्षण करील. 16 त्या लोकांना पुन्हा केव्हाच भूक लागणार नाही. त्यांना पुन्हा केव्हाच तहान लागणार नाही, सूर्यामुळे त्यांना बाधा होणार नाही. कोणतीही उष्णता त्यांना जाळून टाकणार नाही. 17 सिंहासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ असेल. ज्या झऱ्यांचे पाणी जीवन देते तेथे तो त्यांना नेईल. आणि देव त्यांच्या डोळ्यांतील सर्व अश्रु पसून टाकील.”
2006 by World Bible Translation Center