Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी “पहाटेचे हरिण” या सुरांवर बसवलेले दावीदाचे स्तोत्र.
22 माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास?
तू इतका दूर आहेस की मला मदत करु शकणार नाहीस.
तू इतका दूर आहेस की मी मदतीसाठी मारलेल्या हाका तुला ऐकू येणार नाहीत.
2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली
परंतु तू उत्तर दिले नाहीस
आणि मी रात्रीही तुला हाका मारणे चालूच ठेवले.
3 देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस
तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला.
होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस.
5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी बोलावले आणि त्यांची शत्रूंपासून सुटका झाली.
त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला पण त्यांची निराशा झाली नाही.
6 म्हणून मी कीटक आहे का?
मी मनुष्य नाही का?
लोकांना माझी लाज वाटते, लोक माझा तिरस्कार करतात.
7 माझ्याकडे जो बघतो तो माझा उपहास करतो.
ते त्यांचे डोके हलवतात आणि जीभ बाहेर काढून मला वेडावून दाखवतात.
8 ते मला म्हणतात “तू परमेश्वराला तुला मदत करायला सांग.
कदाचित् तो तुला मदत करेल.
तू जर त्याला इतका आवडत असशील तर कदाचित् तो तुझी सुटका करेल.”
9 देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस.
मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस.
मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस.
आणि माझे सांत्वन केले आहेस.
10 मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस
मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.
11 तेव्हा देवा मला सोडू नकोस, संकटे जवळ आली आहेत
आणि मला मदत करायला कोणीही नाही.
12 माझ्याभोवती लोक आहेत
ते बळकट बैलासारखे माझ्या चहू बाजूला आहेत.
13 प्राण्यांवर गुरगुर करणाऱ्या व त्यांना फाडणाऱ्या
सिंहासारखे त्यांचे तोंड उघडे आहे.
14 माझी शक्ती जमिनीवर सांडलेल्या
पाण्यासारखी नाहीशी झाली आहे,
माझी हाडे वेगवेगळी झाली आहेत
माझे धैर्यही नाहीसे झाले आहे.
15 फुटलेल्या खापरा प्रमाणे माझे तोंड सुकले आहे.
माझी जीभ टाळूला चिकटली आहे.
तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहेस.
सोफर उत्तर देतो
20 नंतर नामाथीचा सोफर म्हणाला:
2 “ईयोब, तुझे त्रस्त झालेले विचार मला तुला उत्तर द्यायला भाग पाडत आहेत.
माझ्या मनात कोणते विचार चालले आहेत ते मी तुला लगेच सांगायला हवे.
3 तुझ्या उत्तरांनी तू आमचा अपमान केला आहेस परंतु मी शहाणा आहे.
उत्तर कसे द्यायचे ते मला माहीत आहे.
4-5 “वाईट मनुष्याचा आनंद जास्त काळ टिकत नाही तुला हे माहीत आहे.
आदाम या पुथ्वीतलावर आला त्या अतिप्राचीन काळापासूनचे हे सनातन सत्य आहे.
जो माणूस देवाची पर्वा करीत नाही तो फारच थोडा काळ सुखी होतो.
6 दुष्ट माणसाचा अहंकार गगनाला जाऊन भिडेल
आणि त्याचे मस्तक ढगांपर्यत पोहोचू शकेल.
7 परंतु त्याच्या विष्ठेप्रमाणे त्याचा मात्र नाश झालेला असेल.
जे लोक त्याला ओळखतात ते विचारतील, ‘तू कुठे आहे?’
8 तो एखाद्या स्वप्नासारखा [a] उडून जाईल व तो कोणालाही सापडणार नाही.
त्याला घालवून देण्यात येईल आणि एखाद्या दु:स्वप्नासारखा तो विसरलाही जाईल.
9 ज्या लोकांनी त्याला पाहिले होते, त्यांना तो पुन्हा दिसणार नाही.
त्याचे कुटुंब पुन्हा कधी त्याच्याकडे बघणार नाही,
10 दुष्ट माणसाने गरीब लोकांकडून जे काही घेतले होते ते त्याची मुले परत करतील.
दुष्ट माणसाचे स्वतःचे हातच त्याची संपत्ती परत करतील.
11 तो तरुण होता तेव्हा त्याची हाडे मजबूत होती.
परंतु आता इतर अवयवांप्रमाणे त्यांची सुध्दा माती होईल.
12 “दुष्टाला वाईट गोष्टी चांगल्या वाटतात.
तो त्यांची चव नीट कळावी म्हणून त्या आपल्या जिभेखाली ठेवतो.
13 दुष्ट माणसाला वाईट गोष्टी आवडतात म्हणून तो त्यांना सोडीत नाही.
गोडगोळीसारखे तो त्या आपल्या तोंडात ठेवतो.
14 परंतु त्या वाईट गोष्टीच त्याच्या पोटात विष होतील.
त्याच्या आत त्याचे सर्वाच्या विषासारखे कडू जहर होईल.
15 दुष्ट माणसाने श्रीमंती गिळली तरी तो ती ओकून टाकेल.
देव त्याला ती ओकायला भाग पाडेल.
16 दुष्ट माणसाचे पेय म्हणजे सर्पाचे विष.
सर्पाचा दंशच त्याला मारुन टाकील.
17 नंतर दुष्ट मनुष्य मधाने आणि दुधाने भरुन
वाहाणाऱ्या नद्या बघण्याचे सौख्य अनुभवू शकणार नाही.
18 दुष्ट माणसाला त्याचा नफा परत करणे भाग पडेल.
त्याने जे सुख मिळवण्यासाठी कष्ट केले ते सुख भोगण्याची परवानगी त्याला मिळणार नाही.
19 का? कारण त्याने गरीबांना कष्ट दिले.
त्यांना वाईट वागवले.
त्याने त्यांची काळजी घेतली नाही.
त्यांच्या वस्तू हिसकावून घेतल्या.
दुसऱ्यांनी बांधलेली घरे त्याने बळकावली.
20 “दुष्ट माणूस कधीही समाधानी नसतो.
त्याची श्रीमंती त्याला वाचवू शकत नाही.
21 तो खातो तेव्हा काहीही शिल्लक ठेवीत नाही.
त्याचे यश टिकणार नाही.
22 दुष्ट मनुष्याकडे जेव्हा भरपूर असेल तेव्हा तो संकटांनी दबून जाईल.
त्याच्या समस्या त्याच्यावर कोसळतील.
23 दुष्ट माणसाने त्याला हवे तितके खाल्ल्यानंतर
देव त्याचा क्रोधाग्नी त्याच्यावर फेकेल.
देव दुष्टावर शिक्षेचा पाऊस पाडेल.
24 दुष्ट मनुष्य तलवारीला भिऊन पळून जाण्याचा प्रयत्न करेल.
परंतु पितळी बाण त्याचा बळी घेईन.
25 पितळी बाण त्याच्या शरीरातून आरपार जाईल.
त्याचे चकाकणारे टोक त्याचे आतडे भेदील
आणि तो भयभीत होईल.
26 त्याच्या खजिन्याचा नाश होईल.
मानवाने उत्पन्न केला नाही असा अग्नी त्याचा नाश करेल.
अग्नी त्याच्या घरातल्या सर्व वस्तूंचा नाश करेल.
27 दुष्ट माणूस अपराधी आहे हे स्वर्ग सिध्द करेल.
पृथ्वी त्याच्याविरुध्द् साक्ष देईल.
28 देवाच्या क्रोधाने निर्माण झालेल्या पुरात
त्याच्या घरातली चीजवस्तू वाहून जाईल.
29 दुष्ट माणसाच्या बाबतीत हे करायचे असे देवाने ठरवले आहे.
देवाने ठरवलेले हे त्याचे प्रारब्ध आहे.”
देवाची आज्ञा आणि माणसांनी बनवलेले नियम(A)
15 तेव्हा यरूशलेमाहून काही परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक येशूकडे आले व म्हणाले, 2 “तुमचे शिष्य पूर्वजांनी घालून दिलेले नियम का पाळत नाहीत? कारण तुमचे शिष्य जेवणापूर्वी हात धूत नाहीत.”
3 येशूने उत्तर दिले, “आणि तुम्ही तुमच्या परंपरा चालविण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता? 4 कारण देवाने सांगितले आहे की, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख’ [a] आणि जो कोणी आपल्या आईवडिलांबद्दल वाईट बोलतो, ‘त्याला जिवे मारावे.’ [b] 5 पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, तुला जे काही दिल्याने तुझा जो फायदा झाला असता, ते मी देवाला अर्पण केले आहे 6 ते देवाचे नियम मोडीत आहेत. आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे. 7 अहो ढोंग्यानो, तुम्हांविषयी यशया संदेष्ट्यांने योग्य सांगितले आहे. तो म्हणतो.
8 ‘हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात
पण त्यांचे ह्रदय माझ्यापासून दूर आहे.
9 आणि ते माणसाचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवितात
आणि व्यर्थच माझी उपासना करतात.’” (B)
2006 by World Bible Translation Center