Revised Common Lectionary (Semicontinuous)
11 माझा परमेश्वरावर विश्वास आहे, मग तू मला पळून जाऊन लपावयास का सांगितलेस?
तू मला म्हणालास “पक्ष्यासारखा उडून तुझ्या डोंगरावर जा.”
2 दुष्ट लोक शिकाऱ्यासारखे असतात.
ते अंधारात लपून बसतात. ते धनुष्याची दोरी खेचतात.
ते त्यांचा बाण लक्ष्यावर रोखतात आणि तो चांगल्या आणि सत्यवादी माणसाच्या ह्रदयात सरळ सोडतात.
3 त्यांनी सगळ्या चांगल्या गोष्टींचा [a] असा नाश केला तर काय होईल?
मग चांगली माणसे काय करतील?
4 परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो.
तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो
आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो
ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
5 परमेश्वर चांगल्या लोकांचा शोध घेतो.
दुष्टांना दुसऱ्यांना त्रास द्यायला आवडते आणि परमेश्वर अशा दुष्ट लोकांचा तिरस्कार करतो.
6 तो त्यांच्यावर जळते निखारे आणि तप्त गंधक ओतेल.
दुष्टांना फक्त तप्त आणि चटका देणारा वाराच मिळेल.
7 परंतु परमेश्वर चांगला आहे आणि चांगले कृत्य करणारे लोक त्याला आवडतात.
चांगले लोक त्याच्याजवळ असतील आणि त्याचे दर्शन घेतील.
13 शलमोनाने वेठबिगारीवर इस्राएलची 30,000 माणसे या कामासाठी नेमली. 14 अदोनीराम नावाच्या माणसाला त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. शलमोनाने या लोकांचे तीन गट केले. प्रत्येक गटात 10,000 माणसे होती. प्रत्येक गट लबानोनमध्ये एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत. 15 ऐंशी हजार लोकांना शलमोनाने डोंगराळ भागात कामाला लावले. त्यांना पाथरवटाचे काम होते. दगड वाहून नेणारी माणसे सत्तर हजार होती. 16 या कामकऱ्यांवर देखरेख करणारी तीन हजार तीनशे माणसे होती. 17 त्यांना शलमोनाने मोठे, मौल्यवान चिरे मंदिराच्या पायासाठी म्हणून कातायला सांगितले. ते फार काळजीपूर्वक कापण्यात आले. 18 मग शलमोन आणि हिरामच्या बांधकाम करणाऱ्यांनी आणि गिबलोस येथल्या लोकांनी ते चांगले घडवले. मंदिर उभारणीसाठी घडीव चिरे आणि ओंडके त्यांनी तयार केले.
पती-पत्नी
21 ख्रिस्ताच्या भयात एकमेकांच्या अधीन असा.
22 पत्नींनो, जशा तुम्ही प्रभुच्या अधीन होता, तशा आपल्या पतींच्या अधीन असा. 23 कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे. ख्रिस्त स्वतःच शरीराचा तारणारा आहे. 24 पण, ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे.
25 पतींनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीति करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीति करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, 26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन निर्मळ करावे. 27 यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
28 याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नींवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. 29 कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा द्वेष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. 30 कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. 31 शास्त्र सांगते त्याप्रमाणे, “म्हणून मनुष्य त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील. आणि ते दोघे एकदेह होतील.” [a] 32 हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. 33 तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. व पत्नी नेही पतीचा मान राखाला पाहिजे.
मुले आणि आईवडील
6 मुलांनो, प्रभूशी प्रामणिक राहून आपल्या आईवडिलांच्या आज्ञा पाळा. कारण ते योग्य आहे. 2 “तुझ्या वडिलाचा व आईचा मान राख.” [b] 3 अभिवचनाबरोबरची ही पहिली आज्ञा असल्याने, “तुझ्यासाठी सर्व काही चांगले असावे आणि पृथ्वीवर तुला दीर्घ आयुष्य लाभावे.” [c]
4 आणि वडिलांनो, आपल्या मुलांना राग येईल असे करु नका. उलट, देवापासून जी माहिती व शिक्षण येते त्यान त्यांना वाढवा.
गुलाम आणि मालक
5 गुलामांनो, तुमच्या पृथ्वीवरील मालकांची आज्ञा आदराने, थरथर कांपत, आणि तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने पाळा. ज्याप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पाळा. 6 जेव्हा माणसे तुमच्याकडे पाहत असतील तेव्हाच फक्त काम करु नका. मनुष्याला पसंत पडावे यासाठी प्रयत्न करु नका. उलट ख्रिस्ताच्या गुलामासारखे काम करा, कारण (ख्रिस्ताचे गुलाम) देवाची इच्छा आपल्या अंतःकारणापासून पूर्ण करतात. 7 गुलाम म्हणून उत्साहाने जणू काय माणसांची नव्हे, तर प्रभुची सेवा करीत आहात, असे काम करा. 8 लक्षात ठेवा की, तुम्हांतील प्रत्येकजण जर काही चांगले करतो तर तो गुलाम असो किंवा स्वतंत्र असो, ते त्याला प्रभूकडून परत मिळेल.
9 आणि मालकांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा आणि धमकाविण्याचे सोडून द्या. लक्षात ठेवा की तुमचा आणि त्यांचा धनी स्वर्गात आहे. आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही.
2006 by World Bible Translation Center