Revised Common Lectionary (Semicontinuous)
12 दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात.
दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात.
13 परंतु आपला प्रभु त्या दुष्टांना हसतो.
त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.
14 दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात.
त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे.
15 परंतु त्यांचे धनुष्य मोडेल
व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील.
16 मूठभर चांगले लोक वाईटांच्या
जमावापेक्षा चांगले असतात.
17 का? कारण दुष्टांचा नाश होईल
आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेतो.
18 परमेश्वर शुध्द माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो
त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहाते.
19 संकटाच्यावेळी चागल्या माणसांचा नाश होणार नाही.
भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल.
20 वाईट माणसे परमेश्वराचे शत्रू आहेत
आणि त्या माणसांचा नाश होणार आहे
त्यांच्या दऱ्या कोरड्या पडतील आणि जळून जातील.
त्यांचा संपूर्ण नाश होईल.
21 वाईट माणूस पैसे चटक्न उसने घेतो आणि कधीही परत करीत नाही.
परंतु चांगला माणूस उदारहस्ते इतरांना देतो.
22 जर चांगल्या माणसाने लोकांना आशीर्वाद दिले तर त्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल
परंतु जर त्याने त्यांच्या वाईटाची इच्छाप्रकट केली तर त्यांचा नाश होईल.
शलमोनाचा मृत्यू
29 शलमोनाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यागोष्टी केल्या त्या नाथान या संदेष्ट्याच्या इतिहासात तसेच, अहीया शिलोनी याच्या संदेशलेखात आणि इद्दो या भविष्यवाद्याच्या इद्दोची दर्शने यात नोंदवलेल्या आहेत. नबाटाचा मुलगा यराबाम याविषयीही इद्दोने लिहिलेले आहे. 30 शलमोनाने यरुशलेममधून इस्राएलवर चाळीस वर्षे राज्य केले. 31 मग तो आपल्या पूर्वजांना मिळाला. लोकांनी त्याचे दावीदनगरात दफन केले. शलमोनाचा मुलगा रहबाम हा पुढे शलमोनाच्या जागी राज्य करु लागला.
35 या वेळेपर्यंत बराच उशीर झाला होता आणि (दिवस मावळतीला आला होता) मग त्याचे शिष्य त्याच्याकडे आले व म्हणाले, “ही निर्जन जागा आहे व बराच उशीर झाला आहे. 36 लोकांना पाठवून द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.”
37 परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही त्यांना काहीतरी खावयास द्या.”
ते त्याला म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे दीनारांच्या [a] भाकरी विकत आणाव्या काय?”
38 तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा, की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?”
त्यांनी पाहिले तेव्हा ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
39 येशूने शिष्यांना सांगितले, “सर्व लोकांना गटागटाने हिरवळीवर बसायला सांगा.” 40 तेव्हा सर्व लोक गटागटाने बसले. प्रत्येक गटात पन्नास ते शंभर लोक होते.
41 येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेतले. त्याने त्याचे वाटे केले. त्याने तेथे आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानले. भाकरी मोडल्या व त्या लोकांना वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या. दोन मासेसुद्धा वाटून दिले.
42 मग ते सर्व जेवून तृप्त झाले. 43 त्यांनी भाकरीच्या व माशांच्या तुकड्यांनी भरलेल्या बारा टोपल्या भरल्या. 44 आणि जे पुरुष जेवले, त्यांची संख्या पाच हजार होती.
2006 by World Bible Translation Center