Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचा मंदिर बांधायचा बेत
7 राजा दावीद आपल्या नवीन घरात राहू लागला आणि परमेश्वराने त्याला भोवतालच्या सर्व शत्रूपासून विसावा दिला. 2 एकदा नाथान या संदेष्ट्यास दावीद म्हणाला, “इथे मी गंधसरुच्या लाकडापासून केलेल्या डौलदार घरात राहतोय आणि परमेश्वराचा पवित्र कोश मात्र अजूनही राहुटीतच आहे. त्या पवित्र कोशा साठी आता चांगला निवारा बांधायाला हवा.”
3 नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हाला साथ आहे.”
4 पण त्यादिवशी रात्री नाथानला परमेश्वराचे वचन ऐकू आले. परमेश्वर म्हणाला,
5 “दावीद या माझ्या सेवकाला जाऊन सांग: ‘परमेश्वराचा निरोप असा आहे. माझ्यासाठी निवासस्थान बांधणारा तू नव्हेस. 6 इस्राएल लोकांना मिसरमधून मी बाहेर काढले,त्यावेळी मी कुठल्या ही घरात राहात नव्हतो, मी राहूटीतूनच फिरलो. तेच माझे घर. 7 इस्राएल लोकांबरोबर मी जेथे जेथे गेलो, त्या त्या ठिकाणी, माझ्या इस्राएल लोकांचे मेंढपाळ व्हा म्हणून ज्यांना मी सांगितले त्या इस्राएल वंशातील कोणालाही मी कधीही. माझ्यासाठी तू गंधसरूचे, घर का बांधले नाहीस? असे विचारले नाही.’
8 “शिवाय दावीदाला हे ही सांग: ‘सर्वशक्तीमान परमेश्वर असे म्हणतो. तू कुरणात मेंढरांमागे फिरत होतास तेव्हाच मी तुला निवडले आहे. तेथून तुला काढून मी तुला इस्राएल लोकांचा नेता केले. 9 तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन. 10-11 माझ्या इस्राएल लोकांसाठी मी जागेची निवड केली. त्यांना राहायला हक्काची जागा दिली. त्यांना रुजवले. त्यांना जागोजाग भटकंती करायला लागू नये म्हणून मी हे केले. पूर्वी मी त्यांच्यावर शास्ते नेमले पण दुर्जनांनी त्यांना त्रास दिला. आता तसे घडणार नाही. तुझ्या सर्व शंत्रूपासून मी तुला शांती देतो. मी तुला असे अभिवचन देतो की तुझे घराणे कायमचे राजघराणे होईल.
12 “तुझे जीवन संपुष्टात आले म्हणजे मृत्यूनंतर तुझ्या पूर्वजांशेजारी तुझे दफन होईल. पण मी तुझ्या मुलांपैकीच कोणालातरी राजा करीन. 13 तो माझ्या नावाप्रीत्यर्थ घर (मंदिर) बांधील. त्याचे राज्य मी नेहमीसाठी मजबूत करीन. 14 मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर लोकाकडून मी त्याला शासन घडवीन. तेच माझे चाबूक
20 माझा सेवक दावीद मला सापडला
आणि मी त्याला माझ्या खास तेलाने अभिषेक केला.
21 मी दावीदाला माझ्या उजव्या हाताने आधार दिला
आणि माझ्या शक्तीने मी त्याला बलवान केले.
22 त्या निवडलेल्या राजाचा शत्रू पराभव करु शकला नाही.
दुष्टलोक त्याचा पराभव करु शकले नाहीत.
23 मी त्याच्या शत्रूंना संपवले, जे लोक माझ्या निवडलेल्या
राजाचा तिरस्कार करीत होते त्यांचा मी पराभव केला.
24 माझ्या निवडलेल्या राजावर मी नेहमी प्रेम करीन आणि त्याला मदत करीन.
मी त्याला नेहमी सामर्थ्यवान बनवेन.
25 मी माझ्या निवडलेल्या राजाला समुद्राच्या हाती सोपवले,
तो नद्यांना काबूत ठेवेल.
26 तो मला म्हणेल, ‘तुम्ही माझे वडील आहात
तू माझा देव आहेस माझा खडक माझा तारणारा आहेस.’
27 आणि मी त्याला माझा पहिला मुलगा बनवेन.
तो पृथ्वीवरचा महान राजा असेल.
28 माझे प्रेम त्या राजाचे सदैव रक्षण करेल
त्याच्या बरोबरचा माझा करार कधीही संपणार नाही.
29 त्याचा वंश सदैव चालू राहील.
स्वर्ग असेपर्यंत त्याचे राज्य असेल.
30 जर त्याचे वंशज माझा कायदा पाळायचे थांबवतील आणि
माझ्या आज्ञा पाळणे बंद करतील तर मी त्यांना शिक्षा करेन.
31 जर त्या निवडलेल्या राजाच्या
वंशजांनी माझे नियम मोडले.
32 आणि माझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले
तर मी त्यांना जबरदस्त शिक्षा करेन.
33 परंतु त्या लोकांवरचे माझे प्रेम मी कधीच बाजूला करणार नाही.
मी त्यांच्याशी नेहमी निष्ठावान राहीन.
34 मी दावीदाशी झालेला माझा करार मोडणार नाही.
मी आमचा करार बदलणार नाही.
35 माझ्या पवित्रतेतून मी त्याला वचन दिले आहे
आणि मी दावीदशी खोटे बोलणार नाही.
36 दावीदाचा वंश सदैव चालू राहील.
त्याचे राज्य सूर्य असे पर्यंत राहील.
37 ते चंद्राप्रमाणे सदैव राहील.
आकाश या कराराचा पुरावा आहे त्या करारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता.”
ख्रिस्तामध्ये एक
11 म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते. 12 आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला. 13 पण आता, ख्रिस्तामध्ये जे तुम्ही एके काळी देवापासून दूर होता, ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आणलेले आहात.
14 कारण त्याच्याद्वारे आम्हांला शांतीचा लाभ झाला आहे. त्याने दोन्ही गोष्टी एक केल्या आणि आपल्या शरीराने त्याने वैराचा, दुभागणाऱ्या भिंतीचा अडथळा पाडून टाकला. 15 त्याने नियमशास्त्र त्याच्या नीतिनियमांसहित रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक मानव निर्माण करुन शांति करणे त्याला शक्य व्हावे. 16 आणि त्याच्या वधस्तंभावरील मरणाद्वारे देवाबरोबर एका शरीरात त्या दोघांमध्ये समेट घडवून आणता यावा, ज्यामुळे या दोन गोष्टीतील वैमनस्य संपवता येईल. 17 म्हणून तो आला आणि त्याने जे तुम्ही देवापासून दूर होता व जे तुम्ही देवाजवळ होता त्या तुम्हाला शांतीची सुवार्ता सांगितली, 18 कारण त्याच्या द्वारे, आम्हा दोघांचा एका आत्म्याच्या द्वारे देवाजवळ प्रवेश होतो.
19 यामुळे, तुम्ही आता परके आणि यहूदीतर नाहीत. तर तुम्ही देवाच्या लोकांबरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात. 20 तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. 21 संपूर्ण इमारात त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभुमध्ये एक पवित्र मंदिर होण्यासाठी वाढत आहे. 22 त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.
येशू पाच हजारहूंन अधिक लोकांना जेवू घालतो(A)
30 प्रेषित येशूभोवती जमले. त्यांनी जे केले आणि शिकविले ते सर्व त्याला सांगितले. 31 नंतर येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझ्याबरोबर एकांती चला आणि थोडा विसावा घ्या. तो असे म्हणाला कारण तेथे पुष्कळ लोक जात येत होते व त्यांना जेवायलाही सवड मिळत नव्हती.”
32 तेव्हा ते सर्वजण नावेत बसून निर्जन ठिकाणी गेले. 33 परंतु पुष्कळ लोकांनी त्यांना जाताना पाहिले व ते कोण आहेत हे त्यांना कळाले तेव्हा सर्व गावांतील लोक पायीच धावत निघाले व येशू तेथे येण्याअगोदरच ते तेथे पोहोंचले. 34 येशू नावेतून उतरला तेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला व त्याला त्यांचा कळवळा आला. कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टी शिकवू लागला.
येशु रोग्यानां बरे करीतो(A)
53 त्यांनी सरोवर ओलांडल्यावर ते गनेसरेतच्या किनाऱ्याला आले व नाव (होड़ी) बांधून टाकली. 54 ते नावेतुन उतरले, तेव्हा लोकांनी येशूला ओळखले. 55 लोक हे सागण्यासाठी इतर सर्व लोकांकडे पळाले आणि आजाऱ्यांना खाटेवर घालून जेथे तो आहे असे ऐकले तेथे घेऊन जाऊ लागले. 56 खेड्यात, गावात किंवा शेतात आणि, जेथे बाजाराच्या जागी कोठे तो गेला तेथे लोकांनी आपल्या आजारी माणसांना आणून ठेवले. त्यांनी त्याला फक्त त्याच्या झग्याच्या काठाला स्पर्श करू देण्याची विनंति केली. ज्यांनी त्याला स्वर्श केला ते बरे झाले.
2006 by World Bible Translation Center