Revised Common Lectionary (Semicontinuous)
एक गाणे कोरहाच्या मुलांचे स्तोत्र
48 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात,
त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
2 देवाचे पवित्र शहर सुंदर आहे.
त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते
सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे.
हे त्या महान राजाचे शहर आहे.
3 इथे त्या शहराच्या राजवाड्यांत
देवाला किल्ला म्हणतात.
4 एकदा काही राजे भेटले.
त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली
ते सगळे चालून आले.
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
ते घाबरले आणि पळत सुटले.
6 भयाने त्यांना घेरले,
भीतीने त्यांचा थरकाप झाला.
7 देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास
आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात,
आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
10 देवा तू प्रसिध्द आहेस.
पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात
तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे
यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
12 सियोन भोवती फिरा,
शहर बघा, बुरुज मोजा.
13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवाड्याचे कौतुक करा.
नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल.
तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.
31-32 दावीदाने यवाब व त्याच्या बरोबरचे सर्व लोक यांना सांगितले, “तुमची ही वस्त्रे फाडा आणि शोक झाला असल्याचे दाखवणारी वस्त्रे घाला. अबनेरच्या मृत्युबद्दल दु:ख व्यक्त करा.” त्यांनी हेब्रोन येथे अबनेरचे दफन केले. दावीद अत्यंविधीला हजर होता. अबनेरच्या कबरीपाशी राजा आणि इतर सर्व जण यांनी विलाप केला.
33 तेथे दावीद राजाने हे शोकगीत म्हटले
“एखाद्या मूढ गुन्हेगाराप्रमाणे अबनेर मेला, नाही का?
34 अबनेर, अरे, तुझ्या हातात बेड्या नव्हत्या,
पाय साखळदंडांनी बांधले नव्हते
नाही रे, तुला कपटी लोकांनी मारले.”
मग पुन्हा सर्वांनी अबनेरसाठी शोक व्यक्त केला. 35 दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. “सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको” असे तो बोलला होता. 36 लोकांनी हे सर्व पाहिले आणि दावीद राजाची वर्तणूक पाहून त्यांना आनंद झाला. 37 दावीदाने अबनेरला मारलेले नाही याबद्दल यहूदा आणि इस्राएल लोकांची खात्री पटली.
38 दावीद राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज एक महत्वाचा पुढारी इस्राएलमध्ये मारला गेला हे तुम्ही जाणताच.
येशूला अनुसरणे(A)
18 आपल्या भोवती खूप लोक आहेत हे येशूने पाहिले तेव्हा त्याने त्यांना सरोवराच्या पलीकडे जाण्याची आज्ञा केली. 19 मग एक नियमशास्त्राचा शिक्षक त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “गुरुजी, आपण जेथे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.”
20 येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना राहायला बिळे आणि आकाशातील पाखरांना घरटी आहेत. परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके सुद्धा टेकावयास जागा नाही.”
21 मग येशूच्या शिष्यांपैकी आणखी एक जण येशूला म्हणाला, “प्रभु, पहिल्यांदा मला जाऊ द्या व माझ्या वडिलांना पुरून येऊ द्या.”
22 पण येशू त्याला म्हणाला, “तू माझ्या मागे ये. जे मेलेले आहेत त्यांना त्यांच्या मेलेल्यांना पुरू दे.”
2006 by World Bible Translation Center