Revised Common Lectionary (Semicontinuous)
एक गाणे कोरहाच्या मुलांचे स्तोत्र
48 परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात,
त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
2 देवाचे पवित्र शहर सुंदर आहे.
त्याचे सौंदर्य सर्व पृथ्वीवर आनंद आणते
सियोन पर्वत सगळ्यात उंच आणि पवित्र पर्वत आहे.
हे त्या महान राजाचे शहर आहे.
3 इथे त्या शहराच्या राजवाड्यांत
देवाला किल्ला म्हणतात.
4 एकदा काही राजे भेटले.
त्यांनी या शहरावर हल्ला करायची योजना आखली
ते सगळे चालून आले.
5 त्यांनी पाहिले आणि ते विस्मित झाले.
ते घाबरले आणि पळत सुटले.
6 भयाने त्यांना घेरले,
भीतीने त्यांचा थरकाप झाला.
7 देवा, तू पूर्वेकडच्या जोरदार वाऱ्याचा उपयोग केलास
आणि त्यांची मोठी जहाजे मोडलीस.
8 होय, आम्ही ती गोष्ट ऐकली पण आम्ही ते सर्वशक्तिमान परमेश्वराच्या शहरात,
आमच्या देवाच्या शहरात घडत असलेले पाहिले.
देव ते शहर सदैव सामर्थ्यवान बनवतो.
9 देवा, आम्ही तुझ्या मंदिरात तुझ्या प्रेमळ दयेचा लक्षपूर्वक विचार करतो.
10 देवा तू प्रसिध्द आहेस.
पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात
तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.
11 देवा, सियोन पर्वत आनंदी आहे
यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.
12 सियोन भोवती फिरा,
शहर बघा, बुरुज मोजा.
13 उंच भिंती बघा, सियोनच्या राजवाड्याचे कौतुक करा.
नंतर तुम्ही पुढच्या पिढीला त्याबद्दल सांगू शकाल.
14 देव खरोखरच नेहमी आपला देव असेल.
तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.
इस्राएल आणि यहूदा यांच्यात लढाई
3 दावीद आणि शौल यांच्या घराण्यांमध्ये दीर्घकाळ युध्द चालू राहिले. दिवसेंदिवस दावीदाची ताकद वाढत चालली तर शौलचे घराणे कमकुवत बनत गेले.
हेब्रोन येथे दावीदाच्या सहा मुलांचा जन्म
2 हेब्रोन येथे दावीदाला मुलगे झाले,
त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पहिला मुलगा झाला तो अम्मोन.
3 दुसरा मुलगा किलाब, हा कर्मेलची नाबालची विधवा अबीगईल हिचा मुलगा.
अबशालोम तिसरा, गशूरचा राजा तलमय याची मुलगी माका ही याची आई.
4 अदोनीया चवथा, हग्गीथ ही त्याची आई.
शफाट्या पाचवा, त्याची आई अबीटल.
5 दावीदाची बायको एग्ला हिच्यापासून सहावा इथ्राम झाला.
हेब्रोनमध्ये जन्मलेले हे त्याचे सहा पुत्र.
अबनेर दावीदाला येऊन मिळण्याचे ठरवतो
6 शौल आणि दावीद यांच्या घराण्यात चाललेल्या लढायांमध्ये शौलाच्या सैन्यातील अबनेरचे बळ वाढत चालले. 7 शौलची रिस्पा नामक उपपत्नी होती. ती अय्याची मुलगी. ईश-बोशेथ अबनेरला म्हणाला, “माझ्या वडिलांच्या दासीशी तू शरीर संबध का ठेवतोस?”
8 या बोलण्याचा अबनेरला संताप आला. तो म्हणाला, “शौलशी आणि त्याच्या घराण्याशी मी एकनिष्ठ राहिलेलो आहे. दावीदाच्या हातून मी तुमचा पराभव होऊ दिला नाही. मी विश्वासघात केला नाही. [a] पण आता तू मला या बाईच्या संदर्भात दूषण देत आहेस. 9-10 आता मात्र मी निर्धाराने सांगतो की, देवाने भाकित केल्याप्रमाणे सर्व घडेल. शौलाच्या घराण्याकडून राज्य काढून घेऊन ते दावीदाकडे सोपवण्याचे भाकित परमेश्वराने केले आहे. परमेश्वर दावीदाला इस्राएल आणि यहूदा यांचा राजा करणार आहे. दानपासून बैर-शेब्यापर्यंत त्याचे राज्य असेल. माझ्या हातून आता हे सर्व प्रत्यक्षात आले नाही तर देव खुशाल माझे वाईट करो.” 11 ईश-बोशेथ हे ऐकून इतका घाबरला की त्याने काहीही प्रत्युत्तर केले नाही.
12 अबनेरने दूतांकरवी दावीदाला निरोप पाठवला, “ह्या प्रदेशांवर कोणी राज्य करावे असे तुला वाटते? माझ्याबरोबर करार कर. म्हणजे इस्राएलचा राजा म्हणून तुला मान्यता मिळवून द्यायला मी मदत करीन.”
7 तुम्ही वरवर बघता, जर कोणी तो ख्रिस्ताचा आहे याविषयी खात्री बाळगतो तर त्याने हे लक्षात घ्यावे की जितका तो ख्रिस्ताचा आहे तितके आम्हीसुद्धा आहोत. 8 आणि जो आमचा अधिकार प्रभुने आम्हांस खाली पाडण्यास नव्हे, तर तुमच्या वाढीसाठी दिला आहे त्याविषयी जरी काही विशेष अभिमान बाळगला, तरी मी लज्जित होणार नाही. 9 हे मी यासाठी बोलतो की, मी माझ्या पत्राद्वारे तुम्हांला भीति घालणारा असा वाटू नये. 10 कोणी म्हणतो की, त्याची पत्रे वजनदार आणि जोरदार आहेत पण व्यक्तिश: तो प्रभावहीन आणि बोलण्यात कमकुवत असा आहे. 11 अशा लोकांना हे समजावे की, जेव्हा आम्ही नसतो तेव्हा आम्ही आमच्या पत्रात जे असतो तसे जेव्हा आम्ही प्रत्याक्षात हजर राहू आमच्या कृतीमध्ये सुद्धा असू.
2006 by World Bible Translation Center