Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तुतिगीत.
108 देवा, मी तयार आहे.
मी गुणगान गायला मनापासून तयार आहे.
2 वीणांनो आणि सतारींनो,
आपण सुर्याला जाग आणू या.
3 परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु.
आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु.
4 परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे.
तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे.
5 देवा, स्वर्गाच्याही वर उंच जा.
सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
6 देवा, तुझ्या मित्रांना वाचवण्यासाठी हे कर आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे.
आणि तुझी महान शक्ती उध्दार करण्यासाठी वापर.
7 देव त्याच्या मंदिरात बोलला,
“मी युध्द जिंकेन आणि विजयाबद्दल आनंदी होईन.
मी ही जमीन माझ्या माणसांत वाटून टाकीन.
मी त्यांना शखेम आणि सुक्कोथाचे खोरे देईन.
8 गिलाद आणि मनश्शे माझी असतील.
एफ्राईम माझे शिरस्त्राण असेल.
यहुदा माझा राजदंड असेल.
9 मावब माझे पाय धुण्याचे पात्र असेल.
अदोम माझी पादत्राणे नेणारा सेवक असेल.
मी पलिष्ट्यांचा पराभव करीन आणि विजयाबद्दल हर्षनाद करीन.”
10 मला शत्रूच्या किल्ल्यात कोण नेईल?
मला अदोमशी लढायला कोण नेईल?
11 देवा, फक्त तूच मला या गोष्टी करायला मदत करु शकतोस.
पण तू आम्हाला सोडून गेलास.
तू आमच्या सैन्याबरोबर गेला नाहीस.
12 देवा, आम्हाला आमच्या शत्रूंचा पराभव करायला मदत कर.
लोक आम्हांला मदत करु शकत नाहीत.
13 फक्त देवच आम्हाला बलवान करु शकतो.
देव आमच्या शत्रूंचा पराभव करु शकतो.
3 शमुवेलने तेव्हा लोकांना सांगितले, “तुम्ही खरोखरच मनःपूर्वक परमेश्वराकडे वळला असाल तर इतर देव-देवता, अष्टरोथ यांना निग्रहाने दूर सारा. परमेश्वराचीच एकचित्ताने उपासना करा. केवळ त्याचीच सेवा करा. मग परमेश्वर तुमची पलिष्ट्यांच्या तावडीतून सोडवणूक करील.”
4 तेव्हा मग इस्राएली लोकांनी बाल आणि अष्टोरोथच्या मूर्तींचा त्याग करुन फक्त परमेश्वराची सेवा करायला सुरुवात केली.
5 शमुवेल त्यांना म्हणाला, “सर्व इस्राएली मिस्पा येथे एकत्र या. मी परमेश्वराकडे तुमच्या साठी प्रार्थना करीन.”
6 मग सर्व इस्राएल लोक मिस्पा येथे जमले. त्यांनी पाणी आणून परमेश्वरापुढे ओतले. मग त्यांच्या उपासाला सुरुवात झाली. अन्नापाणी वर्ज्य करुन त्यांनी परमेश्वरापुढे आपल्या पातकांची कबुली दिली. शमुवेल त्या वेळी इस्राएलमध्ये न्याय निवाडा करत असे.
7 मिस्पा येथील इस्राएलींच्या या मेळाव्याबद्दल पलिष्ट्यांनी ऐकले. त्यांनी इस्राएली विरुध्द लढण्याची तयारी केली. पलिष्टे येत आहेत ही बातमी ऐकून इस्राएलामध्ये घबराट पसरली. 8 ते शमुवेलला म्हणाले, “आमच्यासाठी परमेश्वराकडे करायच्या प्रार्थनेत खंड पडू देऊ नकोस. पलिष्ट्यांपासून आमचे रक्षण व्हावे असे परमेश्वराकडे मागणे माग.”
9 तेव्हा शमुवेलने एक आख्खे कोकरु परमेश्वराला यज्ञात अर्पण केले. इस्राएलासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली. परमेश्वराने त्याच्या प्रार्थनेला ओ दिली. 10 हा होम चालू असताना पलिष्ट्यांनी इस्राएलवर हल्ला केला. त्यावेळी प्रंचड गडगडाट करुन परमेश्वराने पलिष्ट्यांमध्ये गोंधळ माजवला. प्रंचड गर्जनेमुळे घाबरुन ते गोंधळले. सेनापतींचा सैन्यावरचा ताबा सुटला. त्यामुळे इस्राएलींनी त्यांचा पराभव केला. 11 मिस्पापासून पलिष्ट्यांचा पाठलाग करत बेथ-कारपर्यंत नेले आणि सैन्याला कापून आणले.
इस्राएलमध्ये शांतता
12 देवाने ही जी मदत केली तिचे स्मरण लोकांना राहावे म्हणून शमुवेलने मिस्पा आणि शेन यांच्या दरम्यान एका दगडाची स्थापना केली. “परमेश्वराने आपल्याला येथवर सहाय्य केले” असे म्हणून त्याने “सहाय्य दगड” असे त्याचे नामकरण केले.
13 पराभूत झाल्यावर पुन्हा म्हणून पलिष्ट्यांनी इस्राएलच्या भूमीत पाऊल टाकले नाही. शमुवेलच्या उर्वरित आयुष्यात परमेश्वर पलिष्ट्यांच्या विरुध्द होता. 14 पलिष्ट्यांनी इस्राएलची काही नगरे काबीज केली होती. एक्रोन पासून गथपर्यंतची ही नगरे आणि त्याच्या आसपासची गावे इस्राएलींनी पुन्हा ताब्यात घेतली.
इस्राएल आणि अमोरी यांच्यातही शांततेचा करार झाला.
15 शमुवेलने आयुष्यभर इस्राएलसाठी न्यायनिवाडा केला.
एक हजार वर्षे
20 आणि मी एक देवदूत स्वर्गातून खाली येताना पाहिला. त्याच्या हातात खोल बोगद्याची किल्ली आणि एक मोठा साखळदंड होता. 2 त्या देवदूताने त्या जुनाट अजगराला म्हणजे सैतानाला धरले आणि एक हजार वर्षासाठी साखळदंडाने बांधून ठेवले. 3 त्याने एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत राष्ट्रांना आणखी फसवू नये, म्हणून त्या देवदूताने त्याला खोल बोगद्यात टाकून दिले. आणि त्या दाराला कुलूप लावून शिक्का मारला. त्या काळांनंतर पुन्हा थोडा काळ त्याला मोकळे सोडण्यात येणार होते.
4 नंतर ज्यांच्यावर लोक बसलेले आहेत, अशी काही सिंहासने मी पाहिली. या लोकांना न्यायनिवाडा करण्याचा अधिकार देण्यात आला होता आणि येशूबाबतच्या सत्याविषयी साक्ष दिल्यामुळे व प्रभु देवाच्या संदेशामुळे ज्या लोकांना जिवे मारण्यात आले, त्यांचे आत्मे मी पाहिले. त्या लोकांनी श्र्वापदाची अथवा त्याच्या मूर्तीची उपासना केली नव्हती, आणि त्यांच्या कपाळावर किंवा हातावर त्या जनावराचा शिक्का मारलेला नव्हता. ते परत जिवंत झाले. आणि त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. 5 (इतर जे मेले होते, ते एक हजार वर्षे पुरी होईपर्यंत परत जिवंत झाले नाही) जे पाहिले पुनरुत्थान ते हेच होय. 6 ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य! त्या लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता चालणार नाही; उलट ते लोक देवाचे आणि ख्रिस्ताचे याजक होतील; आणि ते त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
2006 by World Bible Translation Center