Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 29

दावीदाचे स्तोत्र.

29 देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा.
    त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा.
परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा.
    तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.
परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो
    गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो.
परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते.
    त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
परमेश्वराच्या आवाजामुळे खूप मोठा देवदारुवृक्ष तुकडे तुकडे होऊन पडतो.
    परमेश्वर लबोनानच्या देवदार वृक्षाचे तुकडे करतो.
परमेश्वर लबोनानचा थरकाप उडवतो, तो छोट्या वासराप्रमाणे नाचत आहे असे वाटते.
    सिर्योन थरथरतो तो छोट्या करड्या प्रमाणे उड्या मारत आहे असे वाटते.
परमेश्वराचा आवाज विजेच्या चकचकाटासहित आघात करतो.
परमेश्वराचा आवाज वाळवंटाला कंपित करतो
    कादेशचे वाळवंट परमेश्वराच्या आवाजाने हादरते.
परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो.
    परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात.

10 महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता
    आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
11 परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करो.
    परमेश्वर त्याच्या माणसांना आशीर्वाद देवो.

यशया 5:15-24

15 लोक हीनदीन होतील. गर्विष्ठ माणसांच्या माना खाली जातील. 16 सर्वशक्तिमान परमेश्वर प्रामाणिकपणाने योग्य न्याय करील आणि लोकांना त्याची महानता कळेल. पवित्र देव योग्य त्याच गोष्टी करेल आणि लोक त्याचा आदर करतील. 17 देव इस्राएल लोकांना त्यांचा देश सोडून जाण्यास भाग पाडेल. सर्व भूमी ओसाड होईल. शेळ्या-मेंढ्यांना मोकळे कुरण मिळेल. एकेकाळी श्रीमंतांची मालकी असलेल्या जमिनीवर कोकरे चरतील.

18 त्या लोकांकडे पाहा लोक दोरांनी गाड्या खेचून नेतात तसे ते आपले गुन्हे व पापे वाहून नेत आहेत. 19 ते लोक म्हणतात, “देवाने त्याच्या इच्छेप्रमाणे जे करायचे ते लवकरात लवकर करावे, म्हणजे आम्हाला काय घडणार आहे ते तरी कळेल. परमेश्वराची इच्छा लवकर पूर्ण व्हावी म्हणजे आम्हांला त्याची योजना कळेल.”

20 ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते. 21 ते स्वतःला फार चलाख समजतात. त्यांना वाटते आपण फार बुध्दिमान आहोत. 22 मद्य पिण्यात त्यांची प्रसिध्दी आहे आणि मद्याचे मिश्रण करण्यात ते तरबेज आहेत. 23 जर त्यांना पैसे चारले तर गुन्हेगारालाही ते माफ करतील पण ते सज्जनांना प्रामणिकपणे न्याय मिळू देणार नाहीत. 24 अशा लोकांचे वाईट होईल. ज्याप्रमाणे आगीमध्ये पाने आणि गवत जळून भस्मसात होते त्याप्रमाणे त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे नाश होईल. अंकुर मरून धुळीला मिळावा अथवा आगीत फूल जळून त्याची राख वाऱ्यावर कोठल्या कोठे उडून जावी तसाच त्यांच्या वंशजांचा समूळ नाश होईल.

त्या लोकांनी, सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला. इस्राएलच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.

योहान 15:18-20

येशू त्याच्या अनुयायांना सूचना देतो

18 “जर जग तुमचा द्वेष करते, तर लक्षात ठेवा की, पहिल्यांदा जगाने माझासुध्दा द्वेष केलेला आहे. 19 तुम्ही जर जगाचे असता तर जगाने तुम्हावर, जशी ते स्वतःवर करतात तशी प्रीति केली असती, पण तुम्ही जगाचे नसल्याने, आणि तुमची जगातून निवड केल्याने, जग तुमचा द्वेष करते.

20 “जे शब्द तुम्हांला सांगितले ते लक्षात ठेवा. कोणताही नोकर आपल्या मालकापेक्षा श्रेष्ठ नसतो. त्यांनी जर माझी छळणूक केली तर ते तुमचीही करतील, त्यांनी जर माझी शिकवण पाळली तर ते तुमचीसुद्या पाळतील.

योहान 15:26-27

26 “पित्यापासून मी साहाय्यकर्ता पाठवीन, साहाय्यकर्ता हा सत्याचा आत्मा आहे. तो पित्यापासून येतो. जेव्हा तो येतो तेव्हा तो माझ्याविषयी सांगतो. 27 आणि तुम्हीसुद्या माझ्याविषयी लोकांना सांगाल. कारण तुम्ही माझ्याबरोबर सुरुवातीपासून आहात.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center