Revised Common Lectionary (Semicontinuous)
24 परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस.
तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे.
तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते.
25 समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे!
आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात.
तिथे लहान मोठे प्राणी आहेत.
मोजता न येण्याइतके.
26 समुद्रात जहाजे जातात आणि लिव्याथान,
तू निर्माण केलेला समुद्रप्राणी, समुद्रात खेळतो.
27 देवा, या सगळ्या गोष्टी तुझ्यावर अवलंबून आहेत.
तू त्यांना योग्य वेळी अन्न देतोस.
28 देवा, तू सर्व प्राणीमात्रांना त्यांचे अन्न देतोस.
तू तुझे अन्नाने भरलेले हात उघडतोस आणि ते त्यांची तृप्ती होईपर्यंत खातात.
29 आणि जेव्हा तू त्यांच्यापासून दूर जातोस तेव्हा ते घाबरतात.
त्यांचे आत्मे त्यांना सोडून जातात.
ते अशक्त बनतात आणि मरतात आणि त्यांच्या शरीराची परत माती होते.
30 पण परमेश्वरा, तू जेव्हा तुझा आत्मा पाठवतोस तेव्हा ते सशक्त होतात
आणि तू जमीन पुन्हा नव्या सारखी करतोस.
31 परमेश्वराचे वैभव सदैव राहो!
परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो.
32 परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते.
त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल.
33 मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन.
मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन.
34 मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते.
मी परमेश्वराजवळ आनंदी आहे.
35 पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो.
दुष्ट लोक कायमचे निघून जावोत.
माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वराची स्तुती कर.
परमेश्वर देश पुन्हा उभा करील
18 मग, देशासाठी, परमेश्वराच्या भावना उत्तेजित झाल्या.
त्याला, त्याच्या लोकांबद्दल वाईट वाटले.
19 परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलला.
तो म्हणाला, “मी तुमच्याकडे पुन्हा धान्य, द्राक्षरस आणि तेल पाठवीन.
तुम्ही तृप्त व्हाल.
ह्यापुढे, इतर राष्ट्रांत तुमची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही.
20 मी उत्तरे [a] कडून आलेल्या लोकांना तुमचा देश सोडायला भाग पाडीन.
मी त्यांना रूक्ष आणि ओसाड देशात जायला लावीन.
त्यातील काही पूर्व समुद्राकडे जातील.
तर काही पश्चिम समुद्राकडे जातील.
त्या लोकांनी फारच भयंकर कृत्ये केली आहेत.
ते मृतांप्रमाणे व सडलेल्या गोष्टींसारखे होतील.
तेथे भयंकर दुर्गधी पसरेल.”
देश पुन्हा नव्याने घडविला जाईल
21 हे भूमी, घाबरू नकोस.
सुखी आणि हर्षाल्लासित हो!
कारण परमेश्वर महान गोष्टी घडवून आणणार आहे.
22 रानातल्या प्राण्यानो, घाबरू नका.
कारण वाळवंटातील कुरणांत हिरवळ उगवेल,
झाडांना फळे लागतील.
अंजिराची झाडे व द्राक्षवेली फळांनी लगडतील.
23 म्हणून सियोनवासीयांनो, आनंदित व्हा.
तुमच्या परमेश्वर देवामध्ये संतोष माना.
तो कृपावंत होऊन, पाऊस देईल.
तो पूर्वाप्रमाणेच, आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडील.
24 खळी गव्हाने भरून जातील,
आणि पिंपे द्राक्षरसाने व जैतुनच्या तेलाने भरून वाहतील.
25 “मी, परमेश्वराने, माझे सैन्य तुमच्याविरुध्द पाठविले.
तुमचे जे काही होते ते,
नाकतोडे, टोळ, कुसरूड
व घुले यांनी खाल्ले. [b]
पण, मी, परमेश्वर,
तुमच्या संकटांच्या वर्षाची भरपाई करीन.
26 मग तुम्हाला भरपूर खायला मिळेल.
तुम्ही तृप्त व्हाल.
तुम्ही, तुमच्या परमेश्वर देवाची, स्तुती कराल.
त्याने तुमच्यासाठी आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत.
माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.
27 मी इस्राएलच्या बाजूने आहे हे तुम्हाला समजेल.
मीच परमेश्वर म्हणजे तुमचा देव आहे,
हेही तुम्हाला कळून येईल.
माझ्याशिवाय दुसरा कोणताच परमेश्वर नाही.
माझ्या लोकांना पुन्हा कधीही लज्जित व्हावे लागणार नाही.”
परमेश्वर, स्वतःचा आत्मा सर्व लोकांत घालण्याचे वचन देतो
28 “ह्यांनंतर मी
माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन).
तुमची मुले-मुली भविष्य सांगतील
तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील.
तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील.
29 त्या वेळी, मी माझा आत्मा
पुरूष व स्त्री सेवकांमध्येसुध्दा ओतीन.
4 आध्यात्मिक दाने विभागलेली आहेत पण तोच आत्मा ही विभागणी करतो. 5 सेवेचे प्रकार आहेत, पंरतु ज्याची आम्ही सेवा करतो तो एकच आहे. 6 कार्य करण्याचे वेगवेगळे विभाग आहेत पण ह्या सेवा एकाच देवाकडून येतात.
7 कारण प्रत्येकाच्या फायद्यासाठी एकेकाला आत्म्याचे प्रकटीकरण दिले आहे. 8 एका व्यक्तीला आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाचे वचन सांगण्याचे शहाणपण दिले जाते. आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याच आत्म्याच्या द्वारे दैवी ज्ञानाने बोलण्याचे, 9 कोणाला त्याच आत्म्याने विश्वास व दुसऱ्याला फक्त त्याच एका आत्म्याद्वारे बरे करण्याचे दान दिले आहे. 10 दुसऱ्या कोणाला अद्भुत कार्ये करण्याची शक्ति व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ति, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, दुसऱ्या कोणाला वेगवेगळ्या भाषा बोलण्याची, दुसऱ्याला भाषांतर करुन अर्थ सांगण्याची शक्ति दिली आहे. 11 परंतु तो एकच आत्मा जो त्याच्या इच्छेप्रमाणे एकेकाला वाटून देऊन ही सर्व कार्ये पूर्णत्वास नेतो.
2006 by World Bible Translation Center