Revised Common Lectionary (Semicontinuous)
15 काही दिवसांनी विश्वासणाऱ्यांची एक सभा झाली. (तेथे सुमारे 120 जण होते.) तेव्हा पेत्र उभा राहिला आणि म्हणाला, 16-17 “बंधुंनो, पवित्र शास्त्रामध्ये पवित्र आत्मा दावीदाकरवी बोलला ते, काहीतरी घडणे आवश्यक आहे. आपल्या गटातील एक जण जो यहूदा त्याच्याविषयी तो बोलत होता. ते असे की, यहूदा आपल्याबरोबर सेवा करीत होता. आत्मा म्हणाला की, येशूला धरुन देण्यासाठी यहूदा लोकांचे पुढारीपण करील.”
21-22 “म्हणून आता दुसऱ्या व्यक्तीने आमच्यात आले पाहिजे आणि येशूच्या मरणानंतर झालेल्या पुनरुत्थानाचे साक्षीदार व्हावे. प्रभु येशू आपल्याबरोबर असलेल्या संपूर्ण काळात आपल्या गटात राहिलेल्यांपैकी तो मनुष्य असायला पाहिजे, योहान लोकांचा बाप्तिस्मा करीत असे त्या काळापासून ते येशूला आपल्यातून वर स्वर्गात घेण्यात आले त्या वेळेपर्यंत आपल्यामध्ये राहत असलेल्यांपैकीच हा मनुष्य असला पाहिजे.”
23 प्रेषितांनी दोन मनुष्यांना गटासमोर उभे केले. एक जण योसेफ बर्सबा होता. (त्याचे उपनाव युस्त होते.) व दुसरा मत्थिया होता. 24-25 प्रेषितांनी प्रार्थना केली, “प्रभु, तू सर्वांची मने जाणतोस. या दोघांपैकी हे काम करण्यासाठी तू कोणाची निवड केलेली आहेस हे आम्हांला सांग. यहूदाने या सेवेकडे पाठ फिरवली. आणि ज्या ठिकाणचा तो होता तिकडे गेला.” 26 नंतर दोघातील एकाची निवड करण्यासाठी प्रेषितांनी फासे (सोंगट्या) टाकले. फाशावरुन प्रभुला मत्थिया पाहिजे होता हे दिसून आले. म्हणून तो इतर अकरा शिष्यांसह प्रेषित झाला.
भाग पहिला
(स्तोत्रसंहिता 1-41)
1 माणसाने जर वाईट लोकांचा सल्ला मानला नाही, तो पापी लोकांसारखा राहिला नाही
आणि देवावर [a] विश्वास न ठेवणाऱ्या लोकांबरोबर राहाणे त्याला आवडले नाही
तर तो माणूस खरोखरच सुखी होईल.
2 चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते
तो त्या बद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
3 त्यामुळे तो माणूस ओढ्याच्या कडेला लावलेल्या झाडासारखा शक्तिशाली होऊ शकतो
तो योग्यवेळी फळे येणाऱ्या झाडासारखा असतो तो पाने असलेल्या व न मरणाऱ्या झाडासारखा असतो.
तो जे काही करतो ते यशस्वी होते.
4 परंतु वाईट लोक असे नसतात ते वाऱ्यावर उडून
जाणाऱ्या फोलपटासारखे असतात.
5 न्यायालयातील खटल्याचा निवाडा करण्यासाठी जर चांगले लोक एकत्र आले
तर वाईट लोकांना अपराधी ठरविले जाईल ते पापीलोक निरपराध ठरविले जाणार नाहीत.
6 का? कारण परमेश्वर चांगल्यांचे रक्षण करतो
आणि वाईटाचे निर्दालन करतो.
9 जर आम्ही मनुष्यांनी दिलेली साक्ष स्वीकारतो, तर देवाने दिलेली साक्ष त्यांच्या साक्षीहून अधिक महान आहे हे आपण ओळखले पाहिजे. देवाने आपणास दिलेली साक्ष ही त्याच्या एकुलत्या एका पुत्राविषयीची आहे. 10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवीत नाही, त्याने देवाला लबाड ठरविले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. 11 आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला अनंतकाळचे जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्रामध्ये आहे. 12 ज्याच्याजवळ पुत्र आहे त्याला खरे जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्याला खरे जीवन नाही.
आता आपल्याला अनंतकाळचे जीवन आहे
13 जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हाला अनंतकाळचे जीवन आहे, याविषयी तुम्ही निश्र्चिंत असावे,
6 “ज्यांना तू मला या जगातून दिलेस, त्यांना मी तुला प्रगट केले. ते तुझे होते, व तू त्यांना माझ्या स्वाधीन केलेस. आणि त्यांनी तुझे वचन पाळले, 7 आता त्यांना माहीत आहे की, जे काही तू मला दिले आहेस ते तुझ्यापासून येते. 8 कारण जी वचने तू मला दिली आहेस ती मी त्यांना दिली. आणि त्यांनी ती स्वीकारली, त्यांना निश्चितार्थाने माहीत होते की, मी तुझ्यापासून आलो आहे. आणि त्यांनी विश्वास ठेवला की तू मला पाठविले आहेस. 9 मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, मी जगासाठी प्रार्थना करीत नाही. तर ज्यांना तू माझ्या स्वाधीन केलेस, त्यांच्यासाठीच कारण ते तुझे आहेत. 10 माझ्याकडे जे काही आहे ते तुझे आहे आणि जे तुझे आहे ते माझे आहे. आणि त्यांच्याद्वारे गौरव माझ्याकडे आले आहे.
11 “आणि यापुढे मी जगात नाही, ते जगात आहेत, आणि मी तुझ्याकडे येत आहे, हे पवित्र पित्या, जे नाव तू मला दिले आहेस, त्या तुझ्या नावात त्यांना राख, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. 12 मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्थंत जे नाव तू मला दिलेस त्या तुझ्या नावात मी त्यांना राखले. आणि मी त्यांना संभाळले आणि ज्याने नाशाचा मार्ग निवडला होता त्याच्याशिवाय त्यांच्यातील कोणी नाश पावला नाही, हे यासाठी झाले की शास्त्रलेख पूर्ण व्हावा.
13 “पण आता मी तुझ्याकडे येत आहे. आणि त्यांच्यामध्ये माझा आनंद पूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी सांगतो.” 14 “मी त्यांना तुझे शब्द दिले आहेत आणि जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी या जगाचा नाही तसे तेही या जगाचे नाहीत.
15 “या जगातून तू त्यांना काढून घ्यावेस अशी माझी प्रार्थना नाही, पण दुष्टांपासून तू त्यांचे रक्षण करावेस. 16 जसा मी या जगाचा नाही, तसे तेसुद्धा या जगाचे नाहीत. 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर, कारण तुझा शब्द हेच सत्य आहे. 18 जसे तू मला या जगात पाठविले तसे मी त्यांना या जगात पाठवितो. 19 त्यांच्यासाठी मी स्वतःला पवित्र करतो यासाठी की तेसुद्वा खऱ्या अर्थाने पवित्र व्हावेत.
2006 by World Bible Translation Center