Revised Common Lectionary (Semicontinuous)
प्रमुख गायकासाठी कोरहाच्या मुलांचे स्तोत्र
47 लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा.
तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा.
2 सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे.
तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
3 त्याने आपल्याला दुसऱ्या लोकांचा पराभव करायला मदत केली.
त्याने ते देश आपल्या अधिपत्याखाली आणले.
4 देवाने आपल्यासाठी आपल्या प्रदेशाची निवड केली.
त्याने त्याला आवडणाऱ्या याकोबासाठी हा अद्भुत रम्य देश निवडला.
5 परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात
आपल्या सिंहासनाकडे जातो.
6 देवाचे गुणगान करा.
आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा.
7 देव सर्व जगाचा राजा आहे.
त्याच्या स्तुतिपर गाणे गा.
8 देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो.
तो सगळ्या देशांवर राज्य करतो.
9 देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात.
सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत.
देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे. [a]
मोशेचा मृत्यू
34 मवाबातील यार्देन खोऱ्यातून पिसग पर्वताच्या माथ्यावरील नबो नामक शिखरावर मोशे चढून गेला. यरीहो समोरील यार्देन पलीकडचा हा भाग. परमेश्वराने मोशेला गिलादपासून दानपर्यंत सर्व प्रदेश दाखवला. 2 नफताली, एफ्राईम व मनश्शेचा सर्व प्रदेश दाखवला. पश्चिमेकडल्या भूमध्य समुद्रापर्यंतचा यहूदाचा सर्व प्रदेश दाखवला. 3 तसेच नेगेव आणि सोअरा पासून यरीहो या खजुराच्या झाडांच्या नगरापर्यंतचे खोरे हे ही दाखवले. 4 परमेश्वर मोशेला म्हणाला, “अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना कबूल केलेला हाच तो प्रदेश. त्यांच्या वंशजांना तो द्यायचे मी त्यांना वचन दिले आहे. तुला मी तो पाहू दिला पण तू तेथे जाणार नाहीस.”
5 मग परमेश्वराचा सेवक मोशे त्या मवाबाच्या प्रदेशात मरण पावला. असे घडणार हे परमेश्वराने त्याला सांगितले होतेच. 6 मवाबात मोशेचे परमेश्वराने दफन केले. बेथ-पौरासमोरच्या खोऱ्यात हा भाग आला. पण मोशेची कबर नेमकी कोठे आहे हे आजतागायत कोणाला कळलेले नाही. 7 मोशे वारला तेव्हा एकशेवीस वर्षाचा होता. तेव्हाही त्याची तब्बेत ठणठणीत होती व दृष्टी चांगली होती.
4 मी तुम्हांला आता या गोष्टी सांगितल्या आहेत, म्हणून या गोष्टी घडण्याची वेळ येईल.
पवित्र आत्म्याचे कार्य
“तेव्हा मी तुम्हांला त्यांच्यविषयी सावध केले होते हे तुमच्या लक्षात येईल. 5 परंतु ज्याने मला पाठविले त्याच्याकडे आता मी जातो. ‘तरी तू कोठे जातोस’ असे तुम्हांतील कोणी मला विचारीत नाही. 6 पण या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या आहेत म्हणून तुमचे अंतःकरण दु:खाने भरले आहे. 7 तरी तुम्हांस खरे ते सांगतो, मी जातो हे तुमच्या हिताचे आहे कारण मी गेलो नाही तर साहाय्यकर्ता तुमच्याकडे येणार नाही. पण जर मी गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवीन.
8 “आणि तो येऊन पाप, धार्मिकता आणि न्याय याविषयी जग दोषी आहे हे सिद्य करील. 9 मी पापाविषयी सांगितले तर, लोक माझ्यावर विश्वास ठेवीत नाहीत. साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना त्यांची जाणीव करून देईल 10 नीतिमत्वाविषयी मी पित्याकडे जात आहे. मी देवाशी प्रामाणिक असण्याचे तो साहाय्यकर्ता (पवित्र आत्मा) त्यांना पटवून देईल 11 हा साहाय्यकर्ता जगाला न्यायाचे सत्य पटवून देईल. कारण या जगाच्या अधिपतीचा (सैतान) न्याय होऊन चुकला आहे.
2006 by World Bible Translation Center