Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 135

135 परमेश्वराची स्तुती करा.
परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
    परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा.
त्याचे गुणवर्णन करा.
    परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो,
    आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा.
परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
    त्याच्या नावाचे गुणगान करा.
    कारण तो चांगला आहे.

परमेश्वराने याकोबाला निवडले.
    इस्राएल देवाचा आहे.
परमेश्वरा महान आहे हे मला माहीत आहे.
    आमचा प्रभु सगळ्या देवांपेक्षा महान आहे.
परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात
    आणि खोल महासागरात करत असतो.
देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो.
    विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो.
देवाने मिसर मधले सगळे पहिल्यांदा
    जन्माला आलेले पुरुष आणि प्राणी मारुन टाकले.
देवाने मिसरमध्ये अनेक अद्भूत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या.
    देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या.
10 देवाने पुष्कळ राष्ट्रांचा पराभव केला.
    देवाने शक्तिशाली राजांना मारले.
11 देवाने अमोऱ्याच्या सिहोन राजाचा पराभव केला.
    देवाने बाशानच्या ओग राजाचा पराभव केला.
    देवाने कनानमधल्या सर्व राष्ट्रांचा पराभव केला.
12 आणि देवाने त्यांची जमीन इस्राएलला दिली.
    देवाने ती जमीन त्याच्या लोकांना दिली.

13 परमेश्वरा, तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील.
    परमेश्वरा, लोकांना तुझी नेहमी आठवण येईल.
14 परमेश्वराने राष्ट्रांना शिक्षा केली.
    पण परमेश्वर त्याच्या सेवकांबरोबर दयाळू होता.
15 दुसऱ्या लोकांचे देव केवळ सोन्याचांदीचे पुतळे होते.
    त्यांचे देव म्हणजे लोकांनी केलेले पुतळे होते.
16 त्या पुतळ्यांना तोंड होते पण ते बोलू शकत नव्हते.
    त्या पुतळ्यांना डोळे होते पण ते पाहू शकत नव्हते.
17 पुतळ्यांना कान होते पण ते ऐकू शकत नव्हते.
    त्या पुतळ्यांना नाक होते पण ते वास घेऊ शकत नव्हते.
18 आणि ज्या लोकांनी हे पुतळे केले तेही या पुतळ्यांसारखेच होतील.
    का? कारण त्यांनी त्या पुतळ्यांवर मदतीसाठी विश्वास टाकला होता.

19 इस्राएलाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
    अहरोनाच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
20 लेवीच्या कुटुंबांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
    परमेश्वराच्या भक्तांनो, परमेश्वराचे स्तोत्र गा.
21 परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या
    यरुशलेममधून धन्यवाद मिळोत.

परमेश्वराची स्तुती करा.

दानीएल 6

दानीएल आणि सिंह

सर्व राज्याचा कारभार करण्यासाठी 120 प्रांताधिकारी (सत्रप) नेमल्यास चांगले होईल असा विचार दारयावेशाने केला. ह्या 120 प्रांताधिकाऱ्यांवर (सत्रपांवर) लक्ष ठेवण्यासाठी त्याने जे तीनजण नेमले, त्यातील एक दानीएल होता. कोणी राजाला फसवू नये व राज्याचे काहीही नुकसान होऊ नये म्हणून दारयावेशने तिघांची नेमणूक केली. दानीएल दुसऱ्या दोघांपेक्षा उजवा ठरला. कारण दानीएलचे चारित्र्य चांगले होते व त्याच्याजवळ प्रचंड क्षमता होती. दानीएलची राजावर इतकी छाप पडली की सर्व राज्याचा कारभार त्याच्या हाती सोपविण्याचा बेत त्याने केला. पण इतर दोघा पर्यवेक्षकांना आणि सर्व प्राताधिकाऱ्यांना (सत्रपांना) ह्या बेताविषयी कळताच ते दानीएलचा द्वेष करू लागले. दानीएलला दोष देण्यासाठी काहीतरी कारण शोधण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. त्यासाठी दानीएल राज्यकारभार करताना ज्या ज्या गोष्टी करी त्या त्या प्रत्येक गोष्टीवर त्यांनी नजर ठेवली. पण त्यांना दानीएलची चूक सापडली नाही. त्यामुळे ते दानीएलला दोषी ठरवू शकले नाहीत. दानीएल अतिशय प्रामाणिक व विशवासू होता. क्ष्याने राजाला फसविले नाही. तो अतिशय कष्ट करीत असे.

शेवटी ते सर्व म्हणू लागले, “दानीएलाला त्याच्या चुकीबद्दल दोषी ठरविणे आम्हाला कधीच जमणार नाही. तेव्हा त्याच्या देवाच्या नियमांच्या संदर्भात आम्हाला तक्रार करण्याजोगे काहीतरी शोधले पाहिजे.”

तेव्हा मग ते दोन पर्यवेक्षक प्रांताधिकाऱ्यांसह राजाकडे गेले व राजाला म्हणाले, “दारयावेश राजा, चिरंजीव होवो! एक ठराव करण्याबाबत पर्यवेक्षक मुलकी अधिकारी, प्रांताधिकारी, सल्लागार व राज्यपाल यांचे एकमत झाले आहे. आमच्या मते राजा तू असा हुकूम काढावास की तुझ्याशिवाय, इतर दैवतांची वा माणसाची प्रार्थना जो कोणी पुढील 30 दिवसांत करील त्याला सिंहाच्या गुहेत (पिंजऱ्यात) टाकण्यात येईल. सर्वांनी हा कायदा पाळलाच पाहिजे. तेव्हा राजा आताच्या आता हुकूम लिहून त्याच्यावर शिक्कामोर्तब कर. म्हणजे तो कोणीही बदलू शकणार नाही का? कारण मेदी का पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत किवा बदलूही शकत नाहीत.” मग दारयावेश राजाने असा लेखी कायदा करून त्यावर सही केली.

10 दानीएल दररोज तीन वेळा देवाची प्रार्थना करीत असे. दिवसातून तीन वेळा गुडघे टेकून तो देवाची प्रार्थना करी व स्तुतिस्तोत्र गाईर् नव्या कायद्याविषयी ऐकताच, दानीएल आपल्या घरी गेला. त्याने छतावरच्या त्याच्या खोलीची यरुशलेमच्या बाजूची खिडकी उघडली आणि नेहमीप्रमाणे गुडघे टेकून प्रार्थना केली.

11 मग ते सगळे लोेक एकत्र जमले व त्यांनी दानीएलला देवाची प्रार्थना करताना आणि करूणा भाकताना पकडले. 12 मग ते राजाकडे गेले. राजाशी त्याने केलेल्या कायद्याविषयी ते बोलले. ते म्हणाले दारयावेश राजा पुढील 30 दिवसात, तुझ्याशिवाय, देवताची वा माणसाची जो कोणी प्रार्थना करील, त्याला सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकण्यात येईल, असा लेखी कायदा करून त्यावर तू सही केलीस हे खरे की नाही?

राजा म्हणाला “हो! मी त्यावर सही केली आणि मेदी व पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत वा त्यात बदल होऊ शकत नाही.”

13 मग ते लोक राजाला म्हणाले, “दानीएल तुझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे राजा! तो यहूदाच्या कैद्यांपैकी एक आहे, तो तु केलेल्या कायद्याकडे लक्ष देत नाही अजूनही दिवसातून तीन वेळा तो त्याच्या देवाची प्रार्थना करतो.”

14 हे ऐकून राजा फार दु:खी व अस्वस्थ झाला. राजाने दानीएलला वाचवायचे ठरविले. सुर्यांस्तापर्यंत राजाने दानीएलला वाचाविण्यासाठी काही मार्ग निघतो का ह्याचा विचार केला 15 मग ते लोक एकत्र जमून राजाकडे गेले व त्याला म्हणाले, “हे राजा मेदी व पारसी यांनी शिक्कामोर्तब केलेला कायदा किंवा हुकूम कधीही रद्द होत नाही किंवा बदलू शकत नाही हे लक्षात ठेव.”

16 अखेर दारयावेश राजाने हुकूम दिला. मग त्यांनी दानीएलला आणून सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकले. राजा दानीएलला म्हणाला “तू ज्या देवाची उपासना करतोस तो तुझा देव तूला वाचवील अशी मी आशा करतो”. 17 गुहेच्या तोंडावर एक मोठी शिळा आणून बसविण्यात आली. मग राजाने त्या शिळेवर आपल्या अंगठीने आपली मुद्रा उमटविली. तसेच इतर दहबाऱ्यांच्या अंगठ्यांनी त्याने त्यांच्याही मुद्रा उमटविल्या. ह्याचा अर्थ कोणीही शिळा सरकवून दानीएलला सिंहाच्या गुहेच्या (पिजऱ्यांच्या) बाहेर काढू शत नव्हता. 18 मग दारयावेश राजवाड्यात परतला. त्या रात्री त्याने अन्नाला स्पर्श केला नाही. कोणी येऊन आपले मनोरंजन करावे असे त्याला वाटले नाही, त्याला त्या रात्री झोपही आली नाही.

19 दुसऱ्या दिवशी फटफटताच दारयावेश राजा उठला आणि त्याने सिंहाच्या गुहेकडे (पिंजऱ्याकडे) धाव घेतली. 20 राजा खूप काळजीत होता. सिंहाच्या गुहेजवळ जाताच, त्याने दानीएलला हाक मारली. राजा ओरडला, “दानीएला जिवंत देवाच्या सेवका तुला तुझ्या देवाने, सिंहांपासून वाचविले का? तू नेहमीच देवाची सेवा करीत आलास.”

21 दानीएल उत्तरला, “राजा चिरायु असो! 22 माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी, देवदूताला पाठविले देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली. मी निरपराधी आहे,” हे माझ्या देवाला माहीत आहे म्हणूनच सिंहानी मला मारले नाही. राजा, मी तुझे कधीही काहीही वाईट केले नाही.

23 दारयावेश राजाला खूप आनंद झाला त्याने आपल्या सेवकांना दानीएलला सिंहाच्या गुहेतून (पिंजऱ्यातून) बाहेर उचलून आणण्यास सांगितले. दानीएलला बाहेर आणले तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती. दानीएलचा त्याच्या देवावर विश्वास असल्याने त्याला सिंहानी काहीही इजा केली नाही.

24 मग राजाने दानीएलला सिंहाच्या गुहेत (पिंजऱ्यात) टाकण्यासाठी त्याच्यावर दोषारोप ठेवणाऱ्या लोकांना आणण्याचा हुकूम दिला. त्या लोकांना बायकामुलांसट सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. गुहेच्या जमिनीला त्यांनी स्पर्श करण्याआधीच सिंहांनी त्यांना पकडले आणि त्यांना खाऊन टाकले. 25 मग दारयावेश राजाने पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या, निरनिराव्व्या भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांतील लोकांना पुढील पत्र पाठविले.

अभिवादन.

26 मी नवीन कायदा करीत आहे. हा कायदा राज्याच्या सर्व भागातील सर्व लोकांना लागू आहे. तुम्ही सर्वांनी दानीएलच्या देवाला भ्यायला पाहिजे आणि त्याचा मान राखला पाहिजे.

दानीएलचा देव हा जिंवत देव आहे, साक्षात देव आहे.
    तो सनातन आहे.
क्ष्याच्या राज्याचा कधीच नाश होत नाही.
    क्ष्याचा प्रभाव कधीच नाहीसा होत नाही.
27 देव माणसांना मदत करतो व त्याचे रक्षण करतो.
    स्वर्गात व पृथ्वीवर तो विस्मयकारक चमत्कार करतो.
देवानेच सिंहांपासून दानीएलाला वाचविले.

28 अशारीतीने राजा दारयावेश व पारसी राजा कोरेश या दोघांच्याही कारकिर्दोत दानीएल यशस्वी झाला.

1 योहान 2:12-17

12 प्रिय मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण ख्रिस्तामुळे तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे.
13 वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो
    कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो,
मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.
14 मुलांनो, मी तुम्हांला लिहीत आहे,
    कारण तुम्हांला पिता माहीत आहे.
वडिलांनो, मी तुम्हांला लिहिले,
    कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे.
    त्याची तुम्हांला ओळख झाली आहे.
तरुणांनो, मी तुम्हांला लिहिले,
    कारण तुम्ही सशक्त आहात;
देवाचे वचन तुमच्यामध्ये राहते,
    कारण तुम्ही दुष्टावर मात केली आहे.

15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रेम करु नका. जर कोणी जगावर प्रेम करतो, तर पित्याविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम नाही. 16 कारण जगात जे सर्व काही आहे, ते म्हणजे पापी देहाला संतोषविणारी लैंगिक वासना, डोळ्यांची वासना, व संसाराविषयीची फुशारकी हे पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. 17 जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो अनंतकाळपर्यंत जगेल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center