Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 118:1-2

118 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याचा सन्मान करा.
    त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.
इस्राएल, म्हण
    “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”

स्तोत्रसंहिता 118:14-24

14 परमेश्वर माझी शक्ती आणि माझे विजयगान आहे.
    परमेश्वर मला वाचवतो.
15 चांगल्या लोकांच्या घरात चाललेला विजयोत्सव तुम्ही ऐकू शकता.
    परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचे दर्शन घडवले.
16 परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत.
    परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.

17 मी जगेन आणि मरणार नाही
    आणि परमेश्वराने काय काय केले ते मी सांगेन.
18 परमेश्वराने मला शिक्षा केली
    परंतु त्याने मला मरु दिले नाही.
19 चांगल्या दरवाजांनो, माझ्यासाठी उघडा.
    मी आत येईन आणि परमेश्वराची उपासना करीन.
20 ते परमेश्वराचे दरवाजे आहेत आणि
    केवळ चांगले लोकच त्यातून आत जाऊ शकतात.
21 परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
    तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.

22 इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता
    तो कोनाशिला झाला.
23 हे परमेश्वराने घडवून आणले आहे
    आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते.
24 आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे.
    आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.

गीतरत्न 3

ती म्हणते

रात्रीच्या वेळी मी माझ्या बिछान्यात
    माझे प्रेम असलेल्या पुरुषाला मी शोधते.
मी त्याला शोधले
    पण तो मला सापडला नाही.
मी आता उठेन.
    मी शहराभोवती फिरेन.
मी रस्त्यांवर आणि चौकांत
    माझे प्रेम असलेल्या पुरुषाला शोधीन.

मी त्याला शोधले
    पण मला तो सापडला नाही.
शहरात पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांना मी सापडले.
    मी त्यांना विचारले, “माझे प्रेम असलेल्या पुरुषाला तुम्ही पाहिलेत का?”

मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते.
    इतक्यात मला माझे प्रेम असलेला पुरुष सापडला.
मी त्याला धरले. मी त्याला जाऊ दिले नाही.
    मी त्याला माझ्या आईच्या घरी नेले.
    तिच्या खोलीत जिने मला जन्म दिला, तेथे नेले.

ती स्त्रियांशी बोलते

यरुशलेमच्या स्त्रियांनो, रानहरिणी
    आणि मृगी यांच्या साक्षीने मला वचन द्या.
मी जो पर्यंत तयार होत नाही
    तो पर्यंत प्रेम जागवू नका, प्रेम जागृत करु नका.

तो आणि त्याची वधू

खूप लोकांच्या समूहाबरोबर
    वाळवंटातूनयेणारी ही स्त्री कोण आहे?
गंधरस व ऊद आणि इतर सूवासिक द्रव्ये गाळल्यानंतर होणाऱ्या धुरासारखे
    त्यांच्या मागे धुळीचे लोट उडत आहेत.

ही बघ, शलमोनाची प्रवासाला जाण्याची खुर्ची!
    साठ सैनिक, इस्राएलचे शक्तिमान
    सैनिक तिचे रक्षण करीत आहेत.

ते सगळे प्रशिक्षित लढवय्ये आहेत.
    त्यांच्या बाजूला त्यांच्या तलवारी आहेत.
    रात्री येणाऱ्या कुठल्याही संकटाचा मुकाबला करायला ते तयार आहेत.

राजा शलमोनाने स्वतःसाठी प्रवासी खुर्ची तयार केली.
    लाकूड लबानोनहून आणले.
10 चांदीचे खांब केले.
    पाठ सोन्याची केली.
बैठक जांभळ्या रंगाच्या कापडाने मढवली.
    त्यावर यरुशलेमच्या स्त्रियांनी प्रेमाने कलाकुसर केली.

11 सियोनेच्या स्त्रियांनो, बाहेर या,
    आणि राजा शलमोनाला पाहा.
ज्या दिवशी त्याचे लग्न झाले,
    ज्या दिवशी तो खूप आनंदी होता,
    त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा.

मार्क 16:1-8

येशू मरणातून उठला हे अनुयायांना कळते(A)

16 शब्बाथाचा दिवस संपला तेव्हा मरीया मग्दालिया, याकोबाची आई मरीया आणि सलोमी यांनी त्याला लावण्याकरिता सुगंधी तेल विकत आणले. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी, अगदी पहाटे सूर्योदयाच्या वेळी त्या कबरेकडे गेल्या. त्या एकमेकीस म्हणत होत्या की, “कबरेच्या तोंडावरुन आणांसाठी धोंड कोण बाजूला लोटील?”

नंतर त्यांनी वर पाहिले आणि त्यांना धोंड दूर लोटलेली आढळली. ती फारच मोठी होती. त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या भयचकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरुष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता.

तो त्यांना म्हणाला, “भयभीत होऊ नका, तुम्ही नसरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्याला ठेवले होते ती जागा पाहा. जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, ‘तो तुमच्या अगोदर गालीलात जात आहे, त्यांने तुम्हांस सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हांस दृष्टीस पडेल.’”

मग त्या बाहेर गेल्या आणि भीतीमुळे कबरेपासून पळाल्या. त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कोणाला काहीही सांगितले नाही. कारण त्या भयभीत झाल्या होत्या.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center