Revised Common Lectionary (Semicontinuous)
बेथ
9 तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल?
तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
10 मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो.
देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
11 मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का?
म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.
12 परमेश्वरा, तुझे कल्याण असो
मला तुझे नियम शिकव.
13 मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
14 तुझ्या कराराचा अभ्यास करणे
मला इतर कशाही पेक्षा आवडते.
15 मी तुझ्या नियमांबद्दल चर्चा करेन.
मी तुझी जीवन जगण्याची पध्द्त आचरेन.
16 मला तुझे नियम आवडतात.
मी तुझे शब्द विसरणार नाही.
परमेश्वर हाच खरा देव आहे
44 “याकोबा, तू माझा सेवक आहेस. माझे ऐक इस्राएल, मी तुला निवडले आहे. मी काय म्हणतो ते ऐक. 2 मी परमेश्वर आहे. मी तुला निर्माण केले. तुला तुझे हे रूप देणारा मी आहे. तू आईच्या गर्भात असल्यापासून मी तुला मदत केली. याकोबा, माझ्या सेवका, घाबरू नकोस. यशुरूना, मी तुझी निवड केली.
3 “मी तहानेलेल्यांसाठी पाण्याचा वर्षाव करीन. मी कोरड्या जमिनीवर झरे निर्माण करीन. मी तुझ्या संततीमध्ये माझा आत्मा घालीन. आणि वंशजांना आशीर्वाद देईन. ते वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे असतील. 4 झऱ्याकाठी वाढणाऱ्या झाडांप्रमाणे ते जगातील लोकांत वाढतील.
5 “एकजण म्हणेल, ‘मी परमेश्वराचा आहे’ दुसरा ‘याकोबाचे’ नाव लावील आणखी एक आपली सही ‘मी परमेश्वराचा’ अशी करील, तर आणखी एक स्वतःला ‘इस्राएल’ म्हणवून घेईल.”
6 परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाहीत. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे. 7 माझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. जर असा कोणी असेल, तर त्याने आता बोलावे. त्याने यावे व तो माझ्यासारखा आहे हे सिध्द् करावे. मी ह्या लोकांना निर्माण केल्यापासून जे घडले आणि जे अनंत काळ घडत राहील ते काय ते त्याने मला सांगावे. भविष्यात काय घडणार आहे हे त्याला माहीत असल्याचे त्याने काही खुणेने पटवून द्यावे.
8 “घाबरू नका. काळजी करू नका. मी काय घडणार हे नेहमीच तुम्हाला सांगितले आहे. तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. दुसरा कोणीही देव नाही. मीच एकमेव देव आहे. दुसरा कोणीही ‘खडक’ नाही. मला माहीत आहे की मी एकमेव आहे.”
पेत्राचे लोकांपुढे भाषण
14 मग पेत्र अकरा प्रेषितांसह उठून उभा राहिला. आणि तेथे असलेल्या लोकांना ऐकू जावे म्हणून मोठ्याने बोलला. तो म्हणाला, “माझ्या यहूदी बंधूंनो, आणि तुम्ही सर्व यरुशलेमचे रहिवासी, माझे ऐका, मी जे सांगतो, ते तुम्हांला समजणे जरुरीचे आहे, काळजीपूर्वक ऐका. 15 सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि तुम्हांला वाटते तसे हे लोक द्राक्षारसाच्या धुंदीत बोलत नाहीत! 16 परंतु आज येथे ज्या गोष्टी घडताना तुम्ही पाहत आहात त्याविषयी योएल संदेष्ट्याने लिहीले होते. योएल असे लिहिले:
17 ‘देव म्हणतो: शेवटल्या दिवसात
मी अखिल मानवांवर आपला आत्मा ओतीन
तुमचे पुत्र व कन्या भविष्य सांगतील
तुमच्या तरुणांना दृष्टांत [a] होतील;
तुमच्या वृद्धांना विशेष स्वप्ने पडतील.
18 त्यावेळी मी माझा आत्मा माझ्यासेवकांवर,
पुरुषांवर व स्त्रियांवर ओतीन
आणि ते भविष्य सांगतील.
19 वर आकाशात मी अद्भुत गोष्टी दाखवीन,
खाली पृथ्वीवर मी पुरावे देईन.
तेथे रक्त, अग्नि आणि दाट धूर असतील.
20 सूर्य अंधारामध्ये बदलला जाईल
चंद्र रक्तासारखा लाल होईल
नंतर प्रभुचा महान व गौरवी दिवस येईल.
21 प्रत्येक व्यक्ति जी प्रभुवर विश्वास ठेवते ती वाचेल.’ (A)
22 “माझ्या यहूदी बांधवानो, हे शब्द ऐका: नासरेथचा येशू हा एक फार विशेष मनुष्य होता. देवाने तुम्हांला हे स्प्टपणे दाखविले आहे. देवाने येशूच्या हातून मोठ्या सामर्थ्यशाली व अदुभुत गोष्टी तुमच्यामध्ये करुन हे सिद्ध केले. तुम्ही सर्वांनी या गोष्टी पाहिल्या. म्हणून तुम्ही हे जाणता की हे सत्य आहे. 23 तुमच्याकरिता येशूला देण्यात आले आणि तुम्ही त्याला जिवे मारले. वाईट लोकांच्या मदतीने तुम्ही येशूला वधस्तंभावर खिळले. परंतु हे सर्व होणार हे देव जाणून होता, ती देवाचीच याजना होती. फार पूर्वीच देवाने ही योजना तयार केली होती. 24 येशूने मरणाचे दु:ख सहन केले. परंतु देवाने त्याला मुक्त केले, देवाने येशूला मरणातून उठविले, मरण येशूला बांधून ठेवू शकले नाही.
2006 by World Bible Translation Center