Print Page Options
Previous Prev Day Next DayNext

Revised Common Lectionary (Semicontinuous)

Daily Bible readings that follow the church liturgical year, with sequential stories told across multiple weeks.
Duration: 1245 days
Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)
Version
स्तोत्रसंहिता 107:1-16

भाग पांचवा

((स्तोत्रसंहिता 107-150)

107 परमेश्वराला धन्यवाद द्या.
    कारण तो चांगला आहे.
    त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
परमेश्वराने ज्याचा उध्दार केला आहे अशा प्रत्येक माणसाने हे शब्द म्हटले पाहिजेत.
    परमेश्वराने त्यांना त्यांच्या शत्रूपासून वाचवले.
परमेश्वराने त्याच्या माणसांना वेगवेगळ्या देशातून गोळा करुन आणले.
    त्याने त्यांना पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण या दिशांतून आणले.

त्यांतले काही वाळवंटात फिरले.
    ते राहण्यासाठी जागा शोधत होते पण त्यांना शहर सापडले नाही.
ते खूप भुकेले आणि तान्हेले होते
    आणि अशक्त होत होते.
नंतर त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटातून वाचवले.
देव त्यांना सरळ जेथे त्यांना राहायचे होते त्या शहरात घेऊन गेला.
परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि
    तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या.
देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो.
    देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.

10 देवाची काही माणसे कैदी होती
    आणि काळ्याकुटृ तुरुंगात गजांच्या आडबंद होती.
11 का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले.
    त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला.
12 त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले.
    ते अडखळले आणि पडले.
    त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
13 ते लोक संकटात होते म्हणून त्यांनी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली
    आणि त्याने त्यांना त्यांच्या संकटापासून वाचवले.
14 देवाने त्यांना त्यांच्या अंधार कोठडीतूनबाहेर काढले,
    ज्या दोराने त्यांना बांधले होते तो दोर देवाने तोडला.
15 त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो लोकांसाठी
    ज्याअद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद द्या.
16 देव आपल्याला आपल्या शत्रूंचा पराभव करायला मदत करतो.
    देव त्यांचे तांब्याचे दरवाजे मोडू शकतो.
    देव त्यांच्या दरवाज्यावरचे लोखंडीगज तोडू शकतो.

गणना 20:1-13

मिर्याम मरण पावते

20 इस्राएलचे लोक सीनच्या वाळवंटात पहिल्या महिन्यात आले. त्यांनी कादेशला मुक्काम केला. मिर्याम तेथे मरण पावली आणि तिला तेथेच पुरण्यात आले.

मोशे चूक करतो

त्या ठिकाणी लोकांना पुरेसे पाणी नव्हते. म्हणून ते मोशे आणि अहरोनजवळ तक्रार करण्यासाठी एकत्र आले. लोकांनी मोशेशी वाद घातला. ते म्हणाले, “आमचे भाऊ जसे परमेश्वरा समोर मेले तसेच आम्हीरी मरायला हवे होते. तू परमेश्वराच्या लोकांना या वाळवंटात का आणलेस? आम्ही आणि आमची जनावरे इथे मरावी असं तुला वांटत का? तू आम्हाला मिसर देशातून का आणलेस? तू आम्हाला या वाईट ठिकाणी का आणलेस? इथे धान्य नाही. इथे अंजीर, द्राक्षे किंवा डाळिंबही नाहीत आणि इथे पिण्यास पाणीही नाही.”

म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.

परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला: “चालण्याची खास काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांना बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांना आणि त्यांच्या जनावरांना देऊ शकशील.”

चालण्याची काठी पवित्र निवास मंडपात परमेश्वरासमोर होती. परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे मोशेने काठी घेतली. 10 मोशे आणि अहरोन यांनी लोकांना त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, “तुम्ही लोक नेहमी तक्रारी करीत असता. आता माझे ऐका. मी आता या खडकातून पाणी काढीन.” 11 मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.

12 पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनला म्हणाला, “इस्राएलचे सगळे लोक एकत्र जमले होते. पण तू मला मान दिला नाहीस. पाणी निर्माण करण्याची शक्ती माझ्यामुळे आली हे तू लोकांना दाखवले नाहीस. तुझा माझ्यावर विश्वास आहे हे तू लोकांना दाखवले नाहीस. मी वचन दिल्याप्रमाणे त्या लोकांना तो प्रदेश देईन. पण तू त्यांना तिथे घेऊन जाणार नाहीस.”

13 त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.

1 करिंथकरांस 10:6-13

आणि या गोष्टी आमच्यासाठी उदाहरण म्हणून घडल्या, कारण ज्याप्रमाणे त्यांनी वाईट गोष्टींची अपेक्षा केली, त्याप्रमाणे आपण वाईटाची इच्छा धरणारे लोक होऊ नये. त्यांच्यापैकी काही जण होते तसे मूर्तिपूजक होऊ नका. पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे, “लोक खाण्यापिण्यास खाली बसले आणि ते नाचणे, मौजमजा करण्यासाठी उठले.” ज्याप्रमाणे त्यांच्यातील काही जणांनी केले तसे जारकर्म आपण करु नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. आणि त्यांच्यातील काही जणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, सापांकडून ते मारले गेले. 10 कुरकूर करु नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाल की, मृत्युदूताकडून ते मारले गेले.

11 या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या. व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात 12 म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे. 13 जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही मोहाने तुम्हाला पकडले नाही. परंतु देव विश्वासनीय आहे. तुम्हांला सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या मोहाबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हांला सहन करणे शक्य होईल.

Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

2006 by World Bible Translation Center