Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे एक स्तुतीगीत.
110 परमेश्वर माझ्या प्रभुला म्हणाला,
“मी तुझ्या शत्रूंना तुझ्या नियंत्रणाखाली ठेवीन.
माझ्याजवळ माझ्या उजव्या बाजूला बस.”
2 परमेश्वर तुझे राज्य वाढवायला मदत करेल.
तुझे राज्य सियोनपाशी सुरु होईल आणि ते तू तुझ्या शत्रूंवर त्यांच्या देशात जाऊन राज्य करशील.
3 तू तुझ्या सैन्याची जमवाजमव करशील
त्यावेळी तुझे लोक स्वयंसेवक बनून दाखल होतील.
त्यांचा खास पोशाख परिधान करतील आणि भल्या पहाटे एकत्र जमतील.
हे तरुण लोक जमिनीवर जसे दव पडते त्याप्रमाणे तुझ्याभोवती असतील. [a]
4 परमेश्वराने वचन दिले आहे
आणि आता तो त्याचे मन बदलणार नाही.
“तू सदैव याजक राहिला आहेस
मलकिसदेक होता तसा याजक तू आहेस.”
23 “मी जे बोलतो ते कुणीतरी लक्षात ठेवून पुस्तकात लिहून ठेवावे असे मला वाटते.
माझे शब्द पाषाणात कोरुन ठेवायला हवेत असे मला वाटते.
24 मी जे बोलतो ते लोखंडी कलमाने शिश्यावर
किंवा पाषाणावर कोरुन कायम करायला हवे असे मला वाटते.
25 माझा बचाव करणारा कोणी तरी आहे याची मला खात्री आहे.
तो हयात आहे हे मला माहीत आहे.
आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील
आणि माझा बचाव करील.
26 मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा
आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.
27 मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन.
अन्य कुणी नाही, तर मी स्वतःच त्याला पाहीन.
आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
आपल्या जीवनाचे रहस्य
14 मी तुझ्याकडे लवकरच येण्याची इच्छा धरून असलो तरी मी तुला या गोष्टी लिहीत आहे. 15 यासाठी की, जरी मला उशीर झाला तरी देवाच्या घरात म्हणजे जिवंत देवाच्या मंडळीत एखाद्या व्यक्तीने कसे वागावे हे तुला माहीत असावे. ती मंडळी सत्याचा खांब व पाया अशी आहे. 16 आणि आपल्या सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे:
तो मानवी शरीरात दिसला;
आत्म्याने तो नीतिमान ठरविला गेला,
देवतूतांनी त्याला पाहीले होते;
राष्ट्रांमध्ये तो गाजविला गेला.
जगाने त्याच्यावर विश्वास ठेवला
आणि स्वर्गामध्ये तो गौरवाने घेतला गेला.
2006 by World Bible Translation Center