Revised Common Lectionary (Semicontinuous)
147 परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा.
आपल्या देवाचे गुणगान करा.
त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
2 परमेश्वराने यरुशलेम बांधले,
इस्राएलाच्या ज्या लोकांना कैदी म्हणून नेले होते.
त्यांना देवाने परत आणले.
3 देव त्यांच्या विदीर्ण ह्रदयावर फुंकर घालतो
आणि त्यांच्या जखमांना मलम पट्टी करतो.
4 देव तारे मोजतो आणि
त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते.
5 आपला प्रभु खूप मोठा आहे.
तो फार शक्तीवान आहे.
त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.
6 परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो.
परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.
7 परमेश्वराला धन्यावाद द्या.
आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.
8 देव ढगांनी आकाश भरुन टाकतो.
देव पृथ्वीसाठी पाऊस निर्माण करतो.
देव डोंगरावर गवत उगवतो.
9 देव प्राण्यांना अन्न देतो,
देव लहान पक्ष्यांना अन्न भरवतो.
10 युध्दातले घोडे आणि बलवान सैनिक
त्याला आनंद देत नाहीत.
11 जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो.
जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.
20 देवाने हे दुसऱ्या कोणत्याही देशासाठी केले नाही.
देवाने दुसऱ्या लोकांना त्याचे नियम शिकवले नाहीत.
परमेश्वराची स्तुती करा.
10 चांगला माणूस त्याच्या प्राण्यांची काळजी घेतो. पण दुष्ट माणूस दयाळू असू शकत नाही.
11 जो शेतकरी आपल्या शेतात कष्ट करतो त्याच्याकडे पुरेसे अन्न असते. पण जो माणूस फालतू गोष्टीत वेळ घालवतो तो मूर्ख असतो.
12 दुष्ट माणसाजवळ नेहमी चुकीच्या गोष्टी करायला असतात. पण चांगल्या माणसाजवळ जी शक्ती असते ती मुळाप्रमाणे खोल गेलेली असते.
13 दुष्ट माणूस मूर्ख गोष्टी करतो. स्वतःच शब्दात अडकतो. पण चांगला माणूस त्या प्रकारच्या संकटातून सुटतो.
14 जो चांगल्या गोष्टी सांगतो त्याबद्दल त्याला बक्षीस मिळते. त्याचप्रमाणे तो जे काम करतो ते त्याला लाभ मिळवून देते.
15 मूर्ख माणसाला नेहमी स्वतःची पध्द्त सर्वश्रेष्ठ वाटते. पण विद्वान माणूस दुसरे लोक जे सांगतात तेही ऐकतो.
16 मूर्ख माणसाला फार लवकर राग येतो. पण हुशार माणूस कुणी काही चुकीचे बोलले तर चटकन् क्षमा करतो.
17 जर एखादा माणूस खरे बोलत असेल तर तो ज्या गोष्टी सांगतो त्यातही तो प्रामाणिक असतो. पण जर एखादा खोटं बोलत असेल तर त्याचे बोलणे संकटाकडे नेते.
18 जर एखादा माणूस विचार न करता बोलत असेल तर ते शब्द तलवारीसारखे लागतात. पण शहाणा माणूस काळजी पूर्वक बोलतो. त्याचे शब्द दु:खावर फुंकर मारतात.
19 जर माणूस खोटे बोलला तर त्याचे शब्द लगेचच वाया जातात. पण सत्य मात्र सदैव राहाते.
20 दुष्ट लोक नेहमी संकटे आणतात. पण जे लोक शांततेसाठी काम करतात ते आनंदी असतात.
21 चांगल्या लोकांवर दुर्दैव कोसळत नाही. पण दुष्टांवर मात्र अनेक संकटे येतात.
2 ऐका! मी पौल, तुम्हांला सांगत आहे की, जर सुंता करुन घेऊन तुम्ही नियमशास्त्राकडे वळला तर ख्रिस्त तुमच्यासाठी कोणत्याही किंमतीचा नाही. 3 सुंता करुन घेणाऱ्या प्रत्येक माणसाल मी पुन्हा एकदा जाहीर करतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे, 4 तुमच्यापैकी जे नियमशास्त्राने नीतिमान ठरु पाहतात, त्यांचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध तुटला आहे. देवाच्या दयेच्या बाहेर आता तुम्ही आहात. 5 आम्ही तर आत्म्याने विश्वासाकडून न्यायीपणाच्या आशेची वाट पाहात आहोत. 6 कारण ख्रिस्त येशूमध्ये सुंता झालेले व सुंता न झालेले यांना काही अर्थ नाही तर विश्वास जो प्रीतीद्वारे कार्य करतो त्याला आहे.
7 तुम्ही इतकी चांगली ख्रिस्ती शर्यत धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडथळा केला? 8 सत्यापासून मन वळवणारे तुमचे कठोर वर्तन ज्याने तुम्हांला बोलाविले त्या देवापासून येत नाही. 9 “थोडेसे खमीर कणकेचा गोळा फुगवून टाकते.” 10 प्रभूमध्ये मला तुमच्याविषयी खात्री आहे की, जे मी तुम्हांला शिकविले त्याच्याशिवाय इतर विचार तुम्ही करणार नाही. परंतु जो तुम्हांला त्रास देत आहे, तो कोणी का असेना, दंड भोगील.
11 बंधूजनहो, काही जण असा आरोप करतात की, अजूनही सुंतेची गरज आहे असा उपदेश मी करतो. जर तसे आहे तर अजूनही माझा छळ का होत आहे? आणि जर मी सुंतेच्या आवश्यकतेविषयी उपदेश करीत असतो तर वधस्तंभाविषयीची तत्वे राहिली नसती. 12 माझी इच्छा आहे की, जे तुम्हामध्ये अस्थिरता उत्पन्र करतात त्यांनी सुंतेबरोबर स्वतःला नामर्द करुन घ्यावे.
13 परंतु स्वतंत्रतेमध्ये राहावे म्हणून तुम्हा बंधूना देवाने बोलावले आहे. फक्त तुमच्या देहाला जे आवडते ते करण्याची एक सबब म्हणून तुमच्या स्वातंत्र्याचा उपयोग करु नका. त्याऐवजी प्रीतिमध्ये एकमेकांची सेवा करा (दास व्हा). 14 कारण संपूर्ण नियमशास्त्राचा सारांश एकाच वचनात सामावला आहे. ते सांगते, “जसे आपणांवर तसे आपल्या सोबतीच्या व्यक्तीवरही प्रेम करा.” 15 पण जर तुम्ही एकमेकांना चावत राहिला व खाऊन टाकीत असला, तर एकमेकांना गिळून टाकणार नाही, याविषयी सावध राहा.
2006 by World Bible Translation Center