Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
35 परमेश्वरा माझ्या लढाया लढ.
माझे युध्द कर.
2 परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल.
ऊठ आणि मला मदत कर.
3 भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांशी लढ
परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”
4 काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत
त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर.
त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते
लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत.
त्यांना गोंधळात अडचणीत टाक.
5 त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव.
परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे.
6 परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे.
परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे.
7 मी काहीही चूक केली नाही तरी
त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
8 म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे.
त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे.
एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.
9 नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन.
त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन.
10 माझी सर्व हाडे म्हणतील,
“परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा,
तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस.
तू सामर्थ्यवानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देतोस.”
22 बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामपुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामला थांबवणार [a] होता.
23 बलामच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामला देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले.
24 नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या. 25 गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले.
26 नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्याला वळसा घालून जाणे शक्य नव्हते. 27 गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या चालण्याच्या काठीने मारायला सुरुवात केली.
28 नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामला म्हणाली, “तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.”
32 माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही काळजीपसून मुक्त असावे. अविवाहित पुरुष प्रभूच्या कामाविषयी आणि त्याला कसे संतोषविता येईल याबाबत काळजीत असतो. 33 परंतु विवाहित पुरुष जगिक गोष्टीविषयी आणि आपल्या पत्नीला कसे आनंदीत ठेवता येईल या काळजीत असतो. 34 त्यामुळे तो द्विधा अवस्थेत असतो. आणि एखादी अविवाहित स्त्री किंवा कुमारिका, प्रभूच्या कामाबद्दल उत्सुक असते. यासाठी की, तिने शरीराने आणि आत्म्याने पवित्र असावे. परंतु विवाहित स्त्री जगिक गोष्टी आणि तिच्या पतीला कसे आनंदी ठेवता येईल याचीच चिंता करते. 35 मी हे तुमच्याच फायद्यासाठी सांगत आहे. तुमच्यावर बंधने लादण्यासाठी सांगत नाही. आचरणातील, सुव्यवस्थेतील फायद्यासाठी व प्रभूच्या सेवेसाठी विनाअडथळा तुम्हाला समर्पण करणे शक्य व्हावे म्हणून सांगतो.
36 जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेविषयी योग्य ते करीत नाही आणि जर त्याच्या भावना तीव्र आहेत, तर त्या दोघांनी पुढे होऊन लग्न करुन घेणे आवश्यक आहे. त्याला जे वाटते ते त्याने करावे. 37 तो पाप करीत नाही. त्याने लग्न करुन घ्यावे. परंतु जो स्वतः मनाचा खंबीर आहे व जो कोणत्याही दडपणाखाली नाही पण ज्याचा स्वतःच्या इच्छेवर ताबा आहे. व ज्याने आपल्या मनात विचार केला आहे की आपल्या कुमारिकेला ती जशी आहे तशीच ठेवावी म्हणजे तिच्याशी विवाह करु नये, तर तो चांगले करतो. 38 म्हणून जो कुमारिकेशी लग्न करतो तो चांगले करतो पण जो तिच्याशी लग्न करीत नाही तो अधिक चांगले करील.
39 पति जिवंत आहे तोपर्यंत स्त्री लग्नाने बांधलेली आहे, पण तिचा पति मेला तर तिला पाहिजे त्याच्याशी परंतु केवळ प्रभूमध्ये लग्न करण्यास ती मोकळी आहे. 40 परंतु माझ्या मते ती आहे तशीच राहिली तर ती अधिक सुखी होईल आणि मला असे वाटते की, मलाही प्रभूचा आत्मा आहे.
2006 by World Bible Translation Center