Revised Common Lectionary (Semicontinuous)
दावीदाचे स्तोत्र.
35 परमेश्वरा माझ्या लढाया लढ.
माझे युध्द कर.
2 परमेश्वरा ढाल आणि साऱ्या शरीराचे रक्षण करणारी मोठी ढाल उचल.
ऊठ आणि मला मदत कर.
3 भाला आणि भाल्यासारखे दिसणारे शस्त्र यांनी
माझा पाठलाग करणाऱ्या लोकांशी लढ
परमेश्वरा, माझ्या जीवाला सांग, “मी तुझे रक्षण करीन.”
4 काही लोक मला मारायचा प्रयत्न करीत आहेत
त्यांची निराशा करुन त्यांना शरम वाटेल असे कर.
त्यांना पाठ फिरवून पळून जायला लावते
लोक मला दुख द्यायच्या योजना आखत आहेत.
त्यांना गोंधळात अडचणीत टाक.
5 त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव.
परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे.
6 परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे.
परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे.
7 मी काहीही चूक केली नाही तरी
त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.
8 म्हणून परमेश्वरा, त्यांना त्यांच्याच सापळ्यात अडकू दे.
त्यांना त्यांच्याच जाळ्यात अडकून पडू दे.
एखादे अनामिक संकट त्यांच्यावर कोसळू दे.
9 नंतर मी परमेश्वराचा आनंद लुटीन.
त्याने माझे रक्षण केले की मी आनंदी होईन.
10 माझी सर्व हाडे म्हणतील,
“परमेश्वरा, तुझ्यासारखा कोणीही नाही परमेश्वरा,
तू सामर्थ्यवान लोकांपासून गरीबांना वाचवतोस.
तू सामर्थ्यवानां पासून वस्तू घेऊन त्या गरीबांना आणि असहाय लोकांना देतोस.”
बालाम आणि मवाबचा राजा
22 नंतर इस्राएल लोक मवाबमधल्या यार्देन नदीच्या खोऱ्याकडे निघाले. यरिहोच्या पलिकडे असलेल्या यार्देन नदीजवळ त्यांनी तळ दिला.
2-3 सिप्पोराच्या मुलाने, बालाक याने इस्राएल लोकांनी अमोरी लोकांचे काय केले ते पाहिले होते. मवाबचा राजा खूप घाबरला कारण इस्राएलचे लोक खूप होते. मवाब त्यांना खरोखरच भीत होता.
4 मवाबचा राजा मिद्यानींच्या नेत्यांना म्हणाला, “गाय जशी शेतातले सगळे गवत खाऊन टाकते तसेच हे लोक आपला नाश करतील.”
त्यावेळी सिप्पोराचा मुलगा बालाक मवाबचा राजा होता. 5 त्याने बौराचा मुलगा बलाम ह्याला बोलवायला काही माणसे पाठवली. बलाम फरात नदीकाठी पथोर शहरात रहात होता. इथेच बलामचे लोक रहात असत. बालाकाचा निरोप हा होता:
“एका नवीन राष्ट्राचे लोक मिसर मधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. त्यांनी माझ्याजवळच तळ ठोकला आहे. 6 ये आणि मला मदत कर. मला एकट्याला हे लोक खूप भारी आहेत. तुझ्याजवळ खूप शक्ति आहे हे मला माहीत आहे. जर तू एखाद्याला आशीर्वाद दिलास तर त्याच्या बाबतीत चांगल्या गोष्टी घडतात. आणि जर एखाद्याला शाप दिलास तर त्याच्या बाबतीत वाईट गोष्टी घडतात. म्हणून ये आणि या लोकांविरुद्ध बोल. कदाचित त्यानंतर मी त्यांचा पराभव करु शकेन. मी त्यांना माझा देश सोडायला भाग पाडू शकेन.”
7 मवाब आणि मिद्यानचे पुढारी बलामशी बोलायला गेले. त्याच्या कामाचा [a] मोबदला म्हणून त्यांनी बरोबर पैसै नेले. नंतर त्यांनी बालाक काय म्हणाला ते बलामाला सांगितले.
8 बलाम त्यांना म्हणाला, “रात्री इथे रहा. मी परमेश्वराशी बोलेन आणि तो काय उत्तर देतो ते तुम्हाला सांगेन.” मवाबचे पुढारी त्या रात्री बलामबरोबर राहिले.
9 देव बलामकडे आला आणि त्याने विचारले, “तुझ्याकडे हे कोण लोक आले आहेत?”
10 बलाम देवाला म्हणाला, “सिप्पोरचा मुलगा बालाकने, मवाबच्या राजाने यांना माझ्याकडे एक निरोप देऊन पाठवले आहे. 11 तो निरोप हा: एका नवीन राष्ट्राचे लोक मिसरमधून आले आहेत. ते इतके आहेत की ते सगळा प्रदेश व्यापून टाकतात. म्हणून ये आणि त्या लोकांविरुद्ध बोल. नंतर कदाचित मी त्या लोकांचा पराभव करु शकेन. आणि त्यांना माझ्या देशातून जायला भाग पाडू शकेन.”
12 पण देव बलामला म्हणाला, “त्यांच्याबरोबर जाऊ नकोस. तू त्या लोकांविरुद्ध बोलू नकोस. ती माझा आशीर्वाद मिळालेली माणसे आहेत.”
13 दुसऱ्या दिवशी बलाम उठला आणि बालाकच्या पुढाऱ्यांना म्हणाला, “तुम्ही तुमच्या देशात परत जा. परमेश्वर मला तुमच्या बरोबर जाऊ देणार नाही.”
14 त्यामुळे मवाबचे पुढारी बालाककडे परत गेले आणि त्यांनी त्याला हे सांगितले. ते म्हणाले, “बलामने आमच्या बरोबर यायला नकार दिला.”
15 म्हणून बालाकने बलामकडे दुसरे पुढारी पाठवले. यावेळी त्याने पहिल्या वेळेपेक्षा खूप जास्त पुढारी पाठवले. हे पुढारी पहिल्या पुढाऱ्यांपेक्षा अधिक महत्वाचे होते. 16 ते बलामकडे गेले आणि म्हणाले, “बालाक, सिप्पोराचा मुलगा तुला हे सांगतो: तुझ्या इथे येण्याच्या आड कुठलीही गोष्ट येऊ देवू नको. 17 मी जे सांगतो ते तू केलेस तर मी तुला नक्कीच मान देईन आणि तू मला जे काही विनवशिल ते मी करीन [b] पण तू ये व या लोकांविरुद्ध माझ्यासाठी बोल.”
18 बलामने बालाकाच्या पुढाऱ्यांना उत्तर दिले. तो म्हणाला, “मी माझ्या देवाची, परमेश्वराची आज्ञा पाळली पाहिजे. मी त्याच्या आज्ञे विरुद्ध काहीही करु शकत नाही. परमेश्वराने सांगितल्या खेरीज मी कुठलीही लहान-मोठी गोष्ट करणार नाही. बालाकाने मला त्याचे सुंदर घर सोन्या चांदीने भरुन दिले तरीही मी काही करणार नाही. 19 परंतु आजच्या रात्रीपुरते तुम्ही इथे मागच्या सारखे राहू शकता. आणि परमेश्वर मला काय सांगतो ते मला रात्रीतून कळू शकेल.”
20 त्या रात्री देव बलामकडे आला. देव म्हणाला, “तुला घेऊन जाण्यासाठी हे लोक पुन्हा आले आहेत. म्हणून तू त्यांच्या बरोबर जाऊ शकतोस. पण मी जे सांगेन तेवढेच तू कर.”
बलाम आणि त्याचे गाढव
21 दुसऱ्या दिवशी सकाळी बलाम उठला आणि त्याने आपल्या गाढवीवर खोगीर घातले. नंतर तो मवाबच्या पुढाऱ्यांबरोबर चालला.
पौल याकोबची भेट घेतो
17 आम्ही जेव्हा यरुशलेमला पोहोंचलो, तेव्हा तेथील बंधुजनांनी मोठ्या आनंदाने आमचे स्वागत केले. 18 दूसऱ्या दिवशी पौल आमच्यासह याकोबाला भेटायला आला. तेव्हा सर्व वडीलजन हजर होते. 19 पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहूदीतर लोकांत कशीकशी सेवा करुन घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
20 जेव्हा त्यांनी हे ऐकले तेव्हा त्यांनी देवाचा गौरव केला. आणि ते त्याला म्हणाले, “बंधु, तू पाहशील की हजारो यहूदी विश्वासणारे झालेत. पण त्यांना असे वाटते की, मोशेचे नियम पाळणे फार महत्वाचे आहे. 21 या यहूदी लोकांनी तुइयाविषयी ऐकले आहे की, जे यहूदी इतर देशांत राहतात त्यांना तू मोशेचे नियम पाळू नका असे सांगतोस. तसेच आपल्या मुलांची सुंता करु नका असे सांगतो व आपल्या चालीरीति पाळू नका असे सांगतो.
22 “मग आता काय केले पाहिजे? तू येथे आला आहेस हे त्यांना नक्की कळेल. 23 तेव्हा आता आम्ही सांगतो तसे कर: आमच्यातील चार लोकांनी नवस केला आहे. 24 त्या चौघांना घे व स्वतःचे त्यांच्यासह शुद्धीकरण करुन घे. त्या चौघांना त्यांच्या डोक्याचे मुंडण करता यावे म्हणून त्यांचा खर्च तू कर. मग सर्वांना हे समजेल की, त्यांनी जे काही तुझ्याबद्दल ऐकले आहे ते खरे नाही, उलट तू नियमशास्त्राचे पालन करतोस हे दिसेल.
25 “जे विदेशी विश्वासणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे.
ते असे ‘मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये.
रक्त अगर गुदमरुन मारलेले प्राणी त्यांनी खाऊ
नयेत अनैतिक कृत्ये करु नयेत.’”
Paul Is Arrested
26 मग पौलानेच त्या चार लोकांना आपल्याबरोबर घेतले. दुसऱ्या दिवशी शुद्धीकरणाच्या विधीमध्ये तो सहभागी झाला. मग तो मंदिरात गेला. शुद्धीकरणाचे दिवस केव्हा संपतील हे जाहीर केले. शेवटच्या दिवशी प्रत्येकासाठी अर्पण देण्यात येईल.
2006 by World Bible Translation Center