Revised Common Lectionary (Semicontinuous)
111 परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात
त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले.
2 परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या
चांगल्या गोष्टी लोकांना हव्या असतात.
3 देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो.
त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
4 परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे
हे आपल्या लक्षात राहावे म्हणून देव अद्भुत गोष्टी करीत असतो.
5 देव त्याच्या भक्तांना अन्न देतो.
देवाला त्याचा करार नेहमी आठवतो.
6 देवाने ज्या सामर्थ्यवान गोष्टी केल्या
त्यावरुन तो आपल्या माणसांना त्यांची जमीन देत आहे हे कळून आले.
7 देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते.
त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते.
8 देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात.
त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
9 देव आपल्या माणसांना वाचवतो.
देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे.
10 शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते.
जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात.
देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
कनानमध्ये मोशेला प्रवेशबंदी
23 “मग मी माझ्यासाठी काहीतरी विशेष करण्यासाठी परमेश्वराची आळवणी केली. मी म्हणालो, 24 ‘परमेश्वरा, मी तुझा दास आहे. तुझ्या थक्क करुन टाकणाऱ्या पराक्रमाची तू मला फक्त चुणूक दाखवली आहेस. तुझ्यासारखे थोर प्रताप करणारा स्वर्गात किंवा पृथ्वीवर दुसरा कोण आहे? 25 तेव्हा कृपा करुन मला यार्देन नदी पलीकडची सुपीक भूमी, चांगला डोंगराळ प्रदेश आणि लबानोन पाहू दे.’
26 “पण तुमच्यापायी परमेश्वर माझ्यावर रुष्ट झाला होता. त्याने माझे म्हणणे ऐकले नाही. तो म्हणाला, ‘पुरे, आता एक शब्दही बोलू नको. 27 पिसगाच्या शिखरावर जा. आणि तेथून पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा चारी दिशांना बघ. तेथून तुला सर्व काही दिसेल पण यार्देनच्या पलीकडे तू पाऊल ठेवू शकणार नाहीस. 28 यहोशवाला मात्र तू सूचना दे. त्याला उत्तेजन देऊन समर्थ कर. कारण तोच लोकांना पलीकडे नेईल. तू तो देश पाहशील पण यहोशवाच त्यांना ती जमीन राहाण्यासाठी मिळवून देईल.’
29 “आणि म्हणून आम्ही बेथ-पौराच्या समोरच्या खोऱ्यात राहिलो.”
6 परंतु देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही. कारण सर्व जण जे इस्त्रएलापासून आले आहेत ते खरोखरच इस्राएली आहेत असे नाही. 7 याचा अर्थ असाही नाही की, ते अब्राहामापासून आलेले आहेत, म्हणून खरोखरच ती अब्राहामाची मुले आहेत, तर देवाने म्हटल्याप्रमाणे, “इसहाकाच्या वंशातील लोकांना तुझे संतान म्हटले जाईल.” [a] 8 म्हणजे देहदृष्ट्या जन्मली ती देवाची मुले आहेत असे नाही तर वचनाच्या मुलांना संतान म्हटले आहे. 9 “नेमलेल्या वेळी मी परत येईन त्यावेळेला सारेला पुत्र होईल.” [b] आणि हे ते वचन आहे.
10 इतकेच नव्हे तर रिबेकासुद्धा एकाकडून म्हणजे आपला पूर्वज इसहाक याच्याकडून गरोदर झाली. 11 मुले जन्माला येण्यापूर्वी आणि त्यांनी काही बरे किंवा वाईट केले नव्हते, तेव्हा निवडीवरुन असणारा देवाचा पूर्वसंकल्प कायम राहावा, म्हणजे कर्मावरुन नाही तर बोलावणाऱ्याच्या इच्छेवरुन घडावे. 12 म्हणून तिला सांगितले होते की, “वडील धाकट्याची सेवा करील.” [c] 13 पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “मी याकोबावर प्रेम केले आणि एसावाचा द्वेष केला.” [d]
14 तर मग आपण काय म्हणावे? देवाच्या ठायी अन्याय नाही. आहे काय? खात्रीने नाही. 15 कारण तो मोशेला म्हणाला, “ज्याच्यावर मला दया करायची त्यावर मी दया करीन, आणि ज्याच्यावर करुणा करायची त्याच्यावर करुणा करीन.” [e] 16 म्हणून ते इच्छा करणाराऱ्या वर किंवा पाळणाऱ्यावर नव्हे तर दयाळू देवावर अवलंबून आहे. 17 कारण पवित्र शास्त्रात देव फारोला म्हणाला, “याच हेतूसाठी मी तुला उच्च केले यासाठी की मी तुझ्यामध्ये आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर गाजविले जावे.” [f] 18 म्हणून देव ज्याच्यावर दया करायची त्यास दया करतो आणि ज्यास कठीण करायचे त्यास कठीण करतो.
2006 by World Bible Translation Center