Revised Common Lectionary (Semicontinuous)
परमेश्वर बोलावितो आणि योना आज्ञा पाळतो
3 मग परमेश्वर योनाशी पून्हा बोलला. परमेश्वर म्हणाला, 2 “त्या मोठ्या नगरीला, निनवेला जा आणि मी सांगतो तो संदेश सांग.”
3 मग योनाने परमेश्वराची आज्ञा पाळली. तो निनवेला गेला. निनवे फार मोठी नगरी होती. नगरीच्या एका टोकापासून दूसऱ्या टोकापर्यंत जाण्यास तीन दिवस चालावे लागे.
4 योना नगरी मध्यभागी जाऊन लोकांना उपदेश करु लागला. योना म्हणाला, “चाळीस दिवसानंतर निनवेचा नाश होईल.”
5 निनवेच्या लोकांनी परमेवराच्या संदेशावर विश्वास ठेवला. त्यांनी काही काळ उपवास करण्याचे ठरविले आणि आपल्या पापांचा विचार करण्याचा निश्चय केला. त्यांनी खेद प्रदर्शित करणारे खास कपडे घातले. नगरीतल्या सर्व लोकांनी असे केले. मग तो राव असो की रंक.
10 लोकांचे वागणे परमेश्वराने पाहिले. लोकांनी दुष्कृत्ये करावयाचे सोडून दिले हेही परमेश्वराने पाहिले. मग परमेश्वराचे मन बदलले व त्याने ठरविल्याप्रमाणे केले नाही. परमेश्वराने लोकांना शिक्षा केली नाही.
5 मी अगदी धीर धरुन देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे.
देव माझी एकुलती एक आशा आहे.
6 देव माझा किल्ला आहे. देव मला तारतो,
देव माझी उंच डोंगरावरील सुरक्षित जागा आहे.
7 माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो
तो माझा भक्कम किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे.
8 लोक हो! देवावर सदैव विश्वास ठेवा.
तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा.
देव आपली सुरक्षित जागा आहे.
9 लोक खरोखरच मदत करु शकत नाहीत.
तुम्ही मदतीसाठी लोकांवर खरोखरच विश्वास टाकू शकत नाही.
देवाशी तुलना करता ते हवेतल्या
फुंकरीसारखे न गण्य आहेत.
10 बळजबरीने वस्तू हिसकावून घेण्यात शक्तीवर विसंबून राहू नका.
चोरी केल्यामुळे तुमच्या पदरात काही पडणार आहे
असे समजू नका ,आणि तुम्ही श्रीमंत झाल्यामुळे तुमची श्रीमंती आता
तुमच्या कामी येईल याचाही भरंवसा ठेवू नका.
11 फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे
असे देव म्हणतो “शक्ती देवापासून येते.”
12 प्रभु, तुझे प्रेम खरे आहे.
माणूस ज्या गोष्टी करतो त्या नुसार तू त्याला बक्षिस देतोस वा शिक्षा करतोस.
29 हेच मी म्हणत आहे, बंधूनो, वेळ थोडा आहे. येथून पुढे ज्यांना पत्न्या आहेत त्यांनी त्या नसल्यासारखे राहावे. 30 जे शोक करीत आहेत त्यांनी शोक करीत नसल्यासारखे, जे आनंदी आहेत त्यांनी आनंदी नसल्यासारखे, जे वस्तु विकत घेत आहेत, त्यांनी जणू काही त्यांच्याकडे स्वतःचे काहीच नाही 31 आणि जे लोक जग त्यांना ज्या त्यांना ज्या गोष्टी देऊ करते व त्या गोष्टींचा जे उपयोग करुन घेतात, त्यांनी जणू काय त्या गोष्टींचा पूर्ण उपयोग करुन घेतला नाही, असे राहावे. कारण या जगाची सध्याची स्थिती लयास जात आहे.
येशू गालीलात त्याच्या कामाचा प्रारंभ करतो(A)
14 यानंतर, योहानाला तुरुंगात टाकण्यात आले. येशू गालीलास गेला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने सांगितली. 15 येशू म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे. देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
येशू काही शिष्य निवडतो(B)
16 येशू गालीलाच्या सरोवराजवळून जात होता तेव्हा त्याने शिमोन [a] व शिमोनाचा भाऊ अंद्रिया याला सरोवरात जाळे टाकताना पाहिले कारण ते मासे धरणारे होते. 17 येशू त्यांना म्हणाला, “माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हांला माणसे धरणारे करीन.” 18 मग ते लगेचच जाळी सोडून त्याच्यामागे चालू लागले.
19 आणि तो थोडा पुढे गेल्यावर त्याला जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान हे दिसले. ते त्यांच्या नावेत होते व आपली जाळी तयार करीत होते. 20 त्याने लगेच त्यांना हाक मारली. मग त्यांनी आपले वडील जब्दी व नोकरचाकर यांना नावेत सोडले आणि ते त्याच्या मागे गेले.
2006 by World Bible Translation Center